छत्रपती शंभुराजे संस्कृत पंडित होते ‘बुधभूषण’ हा त्याचा पुरावा…

आज आपण छत्रपती संभाजी महाराजांचा असा इतिहास जाणून घेणार आहोत जे त्यांच्या पराक्रमी जीवनाची दुसरी बाजू दाखवतो.

छत्रपती संभाजी महाराज हे महापराक्रमी तर होतेच तसेच ते बुद्धिमान, उत्तम सेनानी, चारित्र्यसंपन्न,  उत्तम प्रशासक आणि प्रतिभावंत लेखक होते. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वपराक्रमावर आणि  बुद्धिमत्तेच्या जोरावर स्वराज्याच्या सीमा त्यांनी चौफर वाढवल्या.

संभाजी महाराज म्हणजे एक प्रतिभावंत साहित्यिक. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व गुणांचा वारसा संभाजी राजांकडे होताच. शिवाय शहाजी राजांचे कलागुण त्यांनी अंगी बाळगले होते.  वयाच्या अवघ्या बत्तीस वर्षाच्या जीवनात त्यांच्या साहित्याने संपूर्ण जगाला मोहिनी घालणारे ग्रंथ शंभूराजांनी लिहिले आहेत.

शंभुराजेंच्या मध्ये आलेला साहित्याचा गुण म्हणजे त्यांच्या आजोबांकडून आला असचं म्हणावं लागेल कारण शहाजीराजे संस्कृत भाषेचे तज्ञ होते, शहजीराजेंना शास्त्र यांची आवड होती..

शहजीराजेंचे गुण आत्मसात करून संभाजीराजांनी नायिकाभेद नखशिख व सातसतक यासारखे सौदर्यपूर्ण रसग्रहण करणारे ग्रंथ लिहिलेत. या ग्रंथरचनेतून संभाजीराजांच्या रसास्वादक मनाचे दर्शन मिळते.

तसेच त्यांनी रचलेल्या सातशतक या अध्यात्मवर आधारित ग्रंथरचने मधून संभाजी राजांचा अध्यात्मवादी दृष्टिकोन नजरेस येतो. याशिवाय काव्यशास्त्र, अलंकार पुराने, संगीत, धनुर्विद्या यांचाही त्यांनी सखोल अभ्यास केल्याची अनेक माहिती इतिहासात उपलब्ध आहे.

त्यांच्या या ज्ञानात जिजाऊसाहेबांनी भर घातली.

संभाजीराजांना लहानपणापासूनच जिजाऊसाहेबांनी अनेक ग्रंथ उपलब्ध करून दिले होते आणि केशव पंडिताकडून त्यांना शिकवणी उपलब्ध करून दिली होती. त्यानंतर छत्रपती संभाजी राजांना संस्कृत भाषा चांगल्या प्रकारच्या शिकवल्या गेल्या.

त्यांनी उत्तम प्रकारे ग्रंथरचना केली त्यांनी बुधभूषणम् राजनीतीवर आधारित ग्रंथ निर्माण केला व हा ग्रंथ संस्कृत श्लोकबद्ध असून त्याचे तीन भाग पाडण्यात आले आहेत. त्यापैकी पहिल्यांदा त्यांनी आपल्या पूर्वजांचा इतिहास लिहिला होता. काही लोकांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या देवतांचे स्तवन केले आहे दुसर्‍या भागामध्ये मत्स्यपुराण, विष्णूर्मोवर पुरान, महाभारत, कामंदकियनीती आणि अन्य ग्रंथांमधील राजनीती शास्त्रातील श्लोक असून राजांच्या अंगी आवश्यक असणारे गुण आणि त्यांची कर्तुत्व त्याचे प्रधान मंडळ सल्लागार मदतनीस राजपुत्र याचं शिक्षण कर्तुत्व हे सैन्य दुर्ग व राज्यकारभार इत्यादी विषयांची सविस्तर माहिती आहे.  तिसऱ्या भागांमध्ये संकीर्ण माहितीचा संग्रह असून याला मिश्रक निधी प्रकरण असे नाव आहे.

शंभुराजांची संस्कृत जाण, प्राचीन राजधर्माची जाण त्यांच्या बुद्भषणम या ग्रंथात मधूनच येते.

संभाजीराजांनी राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतल्यानंतर गागाभट्ट कडुन ई. १६८० च्या दरम्यान २८६  श्लोकांचा समनयन हा ग्रंथ पोथी स्वरूपात लिहून घेतला तो तिथिनिर्णय विषयी धर्म शास्त्रावर आधारित आहे. छत्रपती शंभूराजांच्या राजवैभवाचा क्षमाशीलतेचा, आश्रयदातृत्वाचा आणि पराक्रमाचा कीर्तीचा कुळश्रेष्ठत्वाचा व अद्वितीय विद्वत्तेचा महान गौरव प्रत्यक्ष त्यांच्या हयातीत गागाभट्ट यांनी केला आहे.

युवराज संभाजीराजे आपल्या समग्र ३२ वर्षांच्या भव्यदिव्य काळात लिहिलेले साहित्य खरंच अलौकिक आहे !

हे हि वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.