समदीश भाटियाने स्कूप व्हूप का सोडलं ?

समदीश भाटिया. स्कूप व्हूप अनस्क्रिप्टेडचा माजी अँकर !
तसं तर स्कूप वूपचा युट्यूब चॅनेल आपण का पाहतो ? तर फक्त समदीश भाटियासाठी, असं सांगणारा तरुण वर्ग आपल्याकडे आहे. पण त्यानंतर अचानक समदिश या शो मधून गायब झाला आणि युट्युबवरच दुसरं चॅनेल घेऊन आला.

बेसिकली कोणी ही व्यक्ती त्याच्या बुद्धीला साजेसा विचार करुन हेच उत्तर देईल की बाबा समदीशने फुटून दुसरं चॅनेल काढलं असेल. पण हे उत्तर पुरेसं नव्हतं. समदीश बाहेर पडताना चॅनेलच्या फाउंडर सात्विक मिश्रावर लैंगिक शोषणाचे आरोप लावून बाहेर पडलाय.

काय घडलं होत त्या रात्री ?

समदीशने केलेल्या तक्रारीनुसार, ७ आणि ८ ऑक्टोबरच्या मध्यरात्री सात्विक मिश्रा याने समदीश भाटियावर त्याच्या घरात लैंगिक अत्याचार केले. ७ ऑक्टोबरला संध्याकाळी दोघेही ऑफिसमध्ये मीटिंगसाठी आले होते. ही मिटिंग ऑफिसमधून एका बारमध्ये शिफ्ट झाली. पण मग बार बंद झाल्यानंतर सात्विक मिश्रा याने समदीशला त्याच्या घरी बोलावलं.

या मीटिंगमध्ये गुड ग्लॅम ग्रुप कंपनीची इन्व्हेस्टमेंट असलेल्या ५०० करोडचा विषय सुरू होता. यात स्पिन-ऑफ म्हणून अनस्क्रिप्टेड लाँच करायचा का हा ही विचार सुरू होता. कोणाचे किती इक्विटी शेअर्स, रेव्हेन्यू मॉडेल ही सुद्धा चर्चा सुरू होती. मिटिंग मध्ये समदीशला कंपनीकडून ७.५ टक्के इक्विटी ऑफर करण्यात आली, पण त्याला २५ टक्के इक्विटी हवी होती आणि त्याने तशी मागणी ही केली. त्याच्या या मागणीवर सात्विक मिश्रा समदीशला म्हंटला की,

इक्विटी चाहिए तो चुम्मी दे,’ ‘इतना नहीं करेगा’

आणि यानंतर सात्विकने स्वतःचा टी शर्ट सोडून बाकीचे सर्व कपडे अंगावरून उतरवले. समदीश त्याच्या तक्रारीत असं ही म्हणतो की, हे सगळं सुरू असताना सात्विकच्या घरी त्याची बायको आणि कंपनीची को फाउंडर श्रीपर्ण टिकेकर सुद्धा होत्या. त्या पलीकडच्या खोलीतून हे सगळं बघत होत्या मात्र त्यांनी हा प्रकार थांबवला नाही.

ही सगळी घटना समदीशने त्याचा सिनियर अवलोक लँगरला लगेचच सांगितली. पुढे दुसऱ्या दिवशी म्हणजे ९ ऑक्टोबरला अवलोक लँगरने समदीशला सांगितलं की कंपनीच्या को फाउंडर पैकी एक, ऋषी प्रतिम मुखर्जी नाराज आहे यांना वाटतंय की, या घडलेल्या घटनेमुळे कंपनीची डिल खराब होऊ शकते. तर दुसरी को फाउंडरपैकी श्रीपर्णा नाराज होती कारण, तिच्या म्हणण्यानुसार त्या रात्री समदीशचचं वागणं योग्य नव्हतं.

पण समदीशच्या तक्रारीत म्हंटल्याप्रमाणे, १० ऑक्टोबरला पहाटे साडेचार वाजता सात्विकने झाल्या प्रकाराबद्दल व्हाट्सएप थ्रू समदीशची माफी मागितली.

पुढे २० ऑक्टोबरला समदीशने कंपनीचा राजीनामा दिला. आणि त्याच दिवशी कंपनीच्या अंतर्गत तक्रार समितीला पत्र लिहून संपूर्ण घटनेची माहिती दिली. तसेच श्रीपर्ण नसलेल्या नवीन समितीची स्थापना करावी, सात्विकला सीईओ पदावरून हटवावं आणि या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणीही या पत्राद्वारे समदिशने केली.

आणि नंतर याप्रकरणी समदीशने १६ नोव्हेंबर २०२१ ला न्यायालयात दावा दाखल केला. नोव्हेंबरमध्ये गुन्हा दाखल होईपर्यंत तरी कंपनीने त्यांचा राजीनामा स्वीकारला नव्हता. तसंच त्याच्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी कोणतीही कारवाई केली नाही असं समदिशचं म्हणणं आहे.

आता यावर सात्विक मिश्राचं काय म्हणणं आहे ?

सात्विक मिश्राने ६ फेब्रुवारीला इंस्टाग्रामवर एक पोस्ट टाकली. यात त्याने स्कूप वूपच्या सीईओ पदावरून त्याला हटवल्याची माहिती दिली होती. या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं होत की,

माझा एक माजी सहकारी गेल्या काही महिन्यांपासून मला धमकावतोय. माझा मानसिक छळ करतोय.

याबाबत सात्विक मिश्राने त्याची बाजू न्यूज लॉन्ड्रीला सांगितली. त्या बातमीत म्हंटलय की,

सात्विकला आठवतंय त्याप्रमाणे तरी समदिश आणि त्याच्या बोलण्यात सेक्शयुअल अंडरटोन कुठेच नव्हता. उलट समदीशला अनस्क्रिप्टेडचा को फाउंडर बनवण्यासाठी तो खूप एक्सायटेड होता. त्यामुळेच त्याला ७.५ परसेंट द्यायचं ठरलं होतं. पण समदीश नशेत होता. तो म्हणाला की अनस्क्रिप्टेड मी माझ्या हिमतीने सुरू केलंय. अनस्क्रिप्टेडचा दुसरा अँकर शाहबाज अन्सारला तुम्ही फायर करा. आणि ७.५ परसेंट देऊन तुम्ही माझा इन्सल्ट करताय, जर २५ परसेंट होत नसतील तर अनस्क्रिप्टेड संपलं म्हणून समजा.

सात्विकच्या म्हणण्यानुसार,

समदीशने सात्विकच्या घरात इतका गोंधळ घातला होता की सात्विकच्या पत्नीने घाबरून अवलोक, ऋषी आणि तिच्या भावाला बोलावून समदीशला घराबाहेर काढलं. त्या रात्री समदीशने उद्धटपणा केला म्हणून सात्विकने त्याला ढकलण्याचा प्रयत्न केला. आपल्या अशा वागणुकीचा आपल्याला पश्चाताप होत असल्याचे सात्विकने सांगितलं. त्या व्हाट्सएपवर पाठवलेल्या सॉरीच्या मॅसेजवर सात्विक म्हणतो,

त्या रात्री मी समदीशला ढकललं. हे माझं वागणं योग्य नव्हतं. खरं तर मी एक रिस्पॉन्सीबल पर्सन आहे आणि म्हणून मी सॉरी असा मेसेज समदीशला पाठवला.

सात्विक सांगतो की, या घटनेनंतर काही दिवसांनी समदीशच्या वकिलाने त्याच्याशी संपर्क साधला आणि समदीशला झालेल्या मानसिक आणि शारीरिक आघाताची भरपाई म्हणून सात कोटींची भरपाई मागितली. आणि जर त्याने नकार दिला तर त्याच्यावर लैंगिक शोषण आणि हिंसेचा गुन्हा दाखल करण्याची ही धमकी दिली.

आता यावर समदीशने त्याची बाजू मांडली आहेच !

पण या सगळ्या घटनाक्रमावर कंपनीच म्हणणं काय आहे ?

तर समदीशने केलेल्या आरोपाप्रमाणे त्याला या घटनेवर गप्प राहण्यासाठी कंपनीने अनस्क्रिप्टेड मध्ये जास्तीची इक्विटी ऑफर केली. जेव्हा समदीशने झालेल्या घटनेवर ICC इनवेस्टिगेशनची मागणी केली तेव्हा कंपनीने कंपनीच्या इमेज आणि डिलचं कारण सांगून हे इनवेस्टिगेशन टाळलं.

शेवटी सगळं प्रकरण बाहेर आलंच आहे. प्रत्येकाने आपली बाजू मांडली आहे. पण कोर्टातून निकाल येणं बाकी आहे. त्यामुळे याविषयीच्या बऱ्याच बातम्या यथावकाश बाहेर येतच राहतील. 

हे हि वाच भिडू

 

Leave A Reply

Your email address will not be published.