Sammed Shikharji Controversy : देशभरातला जैन समाज लाखोंचे मोर्चे का काढतोय ?

 देशातल्या वेगवेगळ्या ठिकाणी सध्या जैन समाजाचे मोर्चे चालू आहे. अनेक ठिकाणी हे मोर्चे लाखोंमध्ये आहेत. आणि त्याला कारण ठरलय झारखंड मधील गिरीडीह येथील जैन तीर्थस्थळ श्री सम्मेद शिखरजी बाबत सुरू असलेला वाद.. 

नेमकं काय झालय.. 

दिल्ली, मुंबई, अहमदाबात पासून ते ठिकठिकाणच्या राज्यांच्या राजधानीच्या ठिकाणी जैन समाजाने मोर्चे काढण्यास सुरवात केली आहे. मुंबईत झालेल्या जैन समाजाच्या मोर्चामध्ये सुमारे 50 हजारहून अधिक जैन समुदायाचे लोक सहभागी झाले होते. 

अशाच प्रकारचा मोर्चा दिल्ली मध्ये देखील काढण्यात आला होता. दिल्ली येथे राष्ट्रपतींना भेटून आपल्या मागण्या पोहचवण्याचा प्रयत्न जैन मोर्चेकरांकडून करण्यात आला. विश्व जैन संगठना या मोर्चांचं नेतृत्व करत असून त्यांच्या माध्यमातूनच हे मोर्चे काढण्यात येत आहेत. दिल्ली येथील मोर्चाला इंडिया गेटवरच थांबवण्यात पोलीसांना यश आलं असल तरी काही दिवसात हे मोर्चे मोठ्या प्रमाणात सुरू होतील अस सांगण्यात येतय. 

अहमदाबाद येथे झालेला जैन समाजाचा मोर्चा तर सर्वात मोठ्ठा असल्याचं माध्यमांनी स्पष्ट केलं आहे. जैन समाजाच्या या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या लोकांमुळे सुमारे 10 किलोमीटर लांबीच स्वरूप आल्याचं सांगण्यात येतय. मध्यप्रदेश, राजस्थान राज्यात देखील लाखोंच्या संख्येत जैन समाज रस्त्यावर उतरलेला आहे. 

जैन समाजाची नेमकी मागणी काय आहे? 

झारखंड राज्यातील गिरीडीह जिल्ह्यातील पारसनाथ पर्वतांमध्ये जैन समाजाचं पवित्रस्थळ सम्मेद शिखरडी स्थान आहे. या ठिकाणाचा उल्लेख जैन समाजासाठी तीर्थराज असाही केला जातो. जैन समाजानुसार जैन समाजातील एकूण 24 तीर्थकारांपैकी 20 तीर्थकारांना इथेच मोक्ष मिळाल्याची मान्यता आहे. 

जैन धर्मातील सर्वात पहिले तीर्थकर ऋषभदेव, बारावे तीर्थकर वासुपूज्य, 22 वे नेमीनाथ आणि 24 वे तीर्थकर वर्धमान महावीर यांना सोडून बाकीच्या सर्व 20 तीर्थकारांना मोक्षप्राप्ती झाली ती याच ठिकाणी. जैन धर्माचे 23 वे तीर्थकर पार्श्वनाथ यांना याच ठिकाणी मोक्षप्राप्ती झाली होती… 

याच कारणामुळे जैन समाजासाठी हे स्थान पवित्र आहे. तीर्थक्षेत्र म्हणून जैन समाजासाठी महत्वपूर्ण असणाऱ्या पारसनाथ पर्वतांना पर्यटन क्षेत्र करण्याची घोषणा झारखंडच्या हेमंत सोरेन सरकारने केलेली आहे. सोरने सरकारच्या या निर्णयामुळेच वादाची ठिणगी पेटलेली आहे.. 

जैन समाजाचं म्हणणं काय आहे 

पारसनाथ पर्वतांना पर्यटन स्थळाचा दर्जा दिला तर या पर्वतांच पावित्र्य नष्ट होईल अस जैन समाजाचं मत आहे. धार्मिक व पावित्र नष्ट होवून या ठिकाणी वेगवेगळे पर्यटक येतील व त्यामुळे या परिसरात लॉज, बियर बार सुरू केले जातील अशा आक्षेप जैन समाजाकडून होत आहे. त्यामुळे स्वतंत्रपणे पर्यटनाचा दर्जा देवून पावित्र्य नष्ट करू नये म्हणून जैन समाजाकडून मोर्चे काढले जात आहेत.  

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.