सुजय की संग्राम ? सोशल मिडीयावर कोण किती पाण्यात आहे..

सुजय विखे पाटील की संग्राम जगताप. महाराष्ट्रातल्या होणाऱ्या तगड्या फायटा सामन्यांपैकी हा एक सामना. आत्ता विविध प्रसारमाध्यमे तुम्हाला लोकांची मतं, गटातटाच राजकारण समजवून सांगतच असतील. पण आम्ही विचार केला तुम्हाला काहीतरी वेगळं सांगाव. आत्ता 2014 च्या इलेक्शनला सोशल मिडीयाचा कसा प्रभाव पडतो हे समजल्यामुळे सगळेच शहाणे झाले आहेत. त्यामुळे ज्याप्रकारे प्रत्यक्ष लोकसभेच्या मैदानात हे सामने रंगत आहेत त्याचप्रमाणे सोशल मिडीयावर देखील या सामन्यांनी रंगत आणली आहे.

म्हणूनच बोलभिडू तुम्हाला सांगणार आहे, सोशल मिडीयावर असणारी दोघांची परिस्थिती.

सर्वात पहिला यांच्याबद्दलची बेसिक माहिती. 

डाॅ. सुजय राधाकृष्ण विखे.

 • जन्म- २१ नोव्हेंबर १९८२.
 • शिक्षण- द डेली कॉलेज, इंदौर.
 • एम.बी.बी.एस. – जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज, बेळगाव.
 • एम.एस. (जनरल सर्जरी)- प्रवरा इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, लोणी.
 • न्युरोसर्जरी- डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, पिंपरी, पुणे.
 • टोपण नाव- दादा.
 • सध्याचा व्यवसाय- राजकारण.

संग्राम जगताप यांची कुंडली.

 • नाव- संग्राम अरूण जगताप.
 • जन्म- १२ जून १९८५
 • शिक्षण- वाणीज्य शाखेत पदवी.
 • टोपण नाव- भैय्या.
 • सध्याचा व्यवसाय- राजकारण.

सुजय विखेंची राजकीय पार्श्वभूमी.

 • सुजय विखे हे पद्मश्री बाळासाहेब विखे पाटील यांचे नातू तर विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र आहेत.
 • सुजय विखेंच्या पाठीमागे मोठा घराणेशाहीचा वारसा आहे.
 • शिक्षण पुर्ण झाल्यानंतर सुजय विखेंना जून २०११ पासून पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचं कार्यकारी संचालक म्हणून जबाबदारी दिली होती.
 • एप्रिल २०१२ पासून त्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून डॉ. पद्मश्री विठ्ठलराल विखे पाटील मेडिकल फौंडेशनची जबाबदारी दिली होती.
 • मागील तीन वर्षापासून ते राजकारणात सक्रिय झालेले आहेत.

संग्राम जगताप यांची राजकीय पार्श्वभूमी.

 • संग्राम जगताप हे राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे विद्यमान आमदार अरूणकाका जगताप यांचे पुत्र आहेत.
 • पदवीच्या शिक्षणानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला.
 • वयाच्या एकविसाव्या वर्षी संग्राम यांनी सामाजिक,धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी प्रेरणा प्रतिष्ठान ही संस्था स्थापन करून आपल्या कार्याला सुरुवात केली
 • तर वयाच्या २४ व्या वर्षी म्हणजेच २००८ ला संग्राम जगताप अहमदनगर महानगरपालिकेचे महापौर म्हणून निवडून आले होते. तर २०१३ साली संग्राम जगताप पुन्हा महापौर झाले होते.
 • २०१४ ची विधानसभा निवडणूक संग्राम जगताप यांनी राष्ट्रवादीकडून लढवली आणि ते आमदार म्हणून निवडून आले.

आत्ता मुख्य मुद्दा सोशल मिडीयावर असणाऱ्या धुरळ्याचा. 

फेसबुक. 

१) संग्राम जगताप. 

फेसबुकवर संग्राम जगताप यांच Sangram Arunkaka Jagtap नावाचं ऑफिशीयल पेज आहे. संग्राम जगताप यांच्या पेजला 29 हजार लाईक आणि तेवढेच फोलोवर्स आहेत.

लोकांपुढे जाताना दूरचा नको घरचा, खासदार नगरचा. हि टॅगलाईन वापरण्यात आली आहे. त्याद्वारे त्यांचा भर हा मतदारसंघाच्या बाहेरील उमेदवार या मुद्यावर राहणार असल्याचं दिसून येत. 

पेजवरील सुरवातीच्या तीन पोस्ट उदाहरणादाखल घेतल्या तर, 30 मार्च रोजी संध्याकाळी साडेसहा च्या सुमारास या पेजवर अरुणकाका जगताप यांनी घारगाव येथील संपर्क दौरा केल्याची, त्यानंतर डिजीटल बॅनर व त्यानंतर लोकांच्या सोबत मिसळतानाचा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. या तिन्ही पोस्टना अनुक्रमे 904, 1.3, 1.8 इतक्या लाईक्स आहेत तर 15, 25, 67 शेअर्स आहेत. सर्वसाधारण शेअर्स झालेल्या पोस्ट पाहिल्यानंतर हा आकडा 20 ते 40 च्या दरम्यान खेळत असलेला दिसून येतो.  

हे झालं ऑफिशियल अकाऊंट बाबत. मात्र संग्राम जगताप यांच फेसबुक अकाऊंट फेसबुकमार्फत ऑफिशीयल करण्यात आलेलं नाही. या अकाऊंटवरुन मात्र हे त्यांच ऑफिशियल अकाऊंट आहे अस सांगण्यात आलं आहे.

याव्यतिरिक्त संग्राम जगताप यांचे, इतके फेसबुक पेजेस आहेत. 

ऑफिशियल पेजधरून हा आकडा साधारत: 60 ते 70 हजारांच्या दरम्यान जातो.

संग्राम जगताप यांच्या नावाने येणाऱ्या फेसबुक पेजची संख्या.

फेसबुकवर असणाऱ्या संग्राम जगताप यांच्या नावाने ग्रुपची संख्या. 

यामध्ये दोन ते अडीच हजारांच्या दरम्यान सदस्य आहेत.

२) सुजय विखे पाटील. 

सुजय विखे यांचं Dr Sujay Vikhe Patil पाटील नावाचं अधिकृत फेसबुक पेज आहे. त्याच्या या पेजला 80 हजार लोकांनी लाईक केलेलं असून जवळपास तेवढेच त्यांचे फोलोवर्स आहेत.

परिस्थिती बदलणार.. कारण आत्ता सुजयपर्व येणार !! या थीम पकडून सुजयपर्व, शिक्षित उमेदवार अंतर्गत प्रचार करण्यात पुढाकार घेतला जात आहे. 

 • डॉ.सुजय विखे पाटील यांच्या पहिल्या तीन पोस्ट पाहील्यानंतर दिनांक ३० मार्च रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यन्त त्यांनी जामखेड दौरा केला त्या दौऱ्याबद्दलचे फोटो त्यांनी आपल्या पोस्टमध्ये टाकला आहे. त्या पोस्टला एका तासात 416 लाईक 16 कमेंट आणि 421 शेअर आहेत.
 • तर त्याखालची पोस्ट त्यांनी तीन तासा अगोदर टाकलेली आहे. त्या पोस्टमध्ये चौकीदाराची जाहीरात असलेला व्हिडिओ आहे. त्याला 320 लाईक 9 कमेंट आणि 47 शेअर आहेत.
 • तर तीसरी पोस्ट काल केलेली आहे. श्रीगोंदा तालुक्यात त्यांची सभा होती त्यावेळेसचे फोटो त्यांनी टाकलेले आहेत. त्या पोस्टला 3 हजारपेक्षा लाईक 250 च्यावर कमेंट आणि 300 च्यावर पोस्ट शेअर केलेली आहे.

सुजय विखे यांच्या नावाने फेसबुकवर असणारे इतर पेजेस. 

 

याचप्रमाणे सुजय विखे यांच्या नावाने फेसबुकवर असणारे ग्रुपची संख्या. 

एकंदरीत संग्राम जगताप आणि सुजय विखे पाटील यांचे फेसबुक पेज पाहीले तर डॉ. सुजय विखे पाटील त्यांच्या पुढे असलेलं दिसून येतं.

एकूण लाईक, गेल्या आठ दिवसांमध्ये पेजमध्ये झालेली वाढ (टक्यांमध्ये) एकूण आठ दिवसांमध्ये करण्यात आलेल्या पोस्ट आणि त्या किती लोकांपर्यन्त पोहचल्या याची आकडेवारी पुढील फोटोमध्ये.

 ट्विटर. 

१) संग्राम जगताप. 

संग्राम जगताप ट्विटरवर 2014 सालापासून आहेत आणि इथे ते बऱ्यापैकी अॅक्टीव असलेले दिसून येतात. आत्तापर्यंत त्यांनी 1244 ट्विट केले असून. त्यांचे 5760 फोलोवर्स आहेत तर संग्राम जगताप 103 लोकांना फाॅलो करतात असल्याचं दिसतं.

 • त्याच्या सुरूवातीचे तीन ट्विट पाहिले तर पहिल्या ट्विटमध्ये, “खोटेपणा जास्त दिवस टीकत नसतो. #Ahmednagar अशा पोस्ट दिसतात. मजुकर असलेलं डिजीटल बॅनर ट्विट करण्यात पुढाकार घेतला आहे. पहिल्या ट्विटला 144 लाईक्स 12 रिट्विट आणि दोन कमेंट आहेत.
 • त्या अगोदरची पोस्ट त्यांनी एक दिवसापुर्वीच केली आहे. दिघोळ गावात त्यांची बैठक होती. त्या बैठकीबद्दल त्यांनी ट्विट करून @NCPspeaks हा हॅशटॅग त्यांनी वापरला आहे. त्या ट्विटला 65 लोकांनी लाईक केलंय तर 6 लोकांनी रिट्विट केलं आहे.
 • तर तिसरी पोस्ट पाहिली तर त्यांनी ती सु्द्धा एका दिवसापुर्वी टाकली आहे. त्या पोस्टमध्ये दिघोळ गावातील बैठकीत नेमकं काय झालं यांची माहिती दिली आहे. त्या ट्विटला 108 लाईक 9 रिट्विट आणि 2 कमेंट आहेत.

२) सुजय विखे पाटील.

सुजय विखे देखील ट्विटरवर हे 2014 पासून असलेले दिसून येतात. त्यांनी ट्विटरवरती आपल्या नावापुढे चौकीदार डॉ. सुजय विखे पाटील लावलं आहे. आत्तापर्यंत त्यांना 4158 फॉलोअर्स आहेत.

तर ते 14 लोकांना ते फॉलो करतात.

 • त्याच्या सुरूवातीचे तीन ट्विट पाहूया. त्या पोस्टमध्ये नेमकं काय टाकलंय. त्याला लाईक किती आहेत. कमेंट किती आहेत आणि किती जणांनी रिट्विट केलंय हे समजेल.
 • त्यांचं पहिलं ट्विट हे 1 तासापुर्वीचं आहे. शेवगाव दौऱ्यामधील मजुकर त्यांनी यात टाकलेला आहे. 33 लाईक दोन रिट्विट आणि 3 कमेंट त्या ट्विटला आहेत.
 • त्या खालचं ट्विट त्यांनी काल केलेलं आहे. त्यात श्रीगोंदा तालुक्यातील सभेचे फोटो टाकलेले आहेत. त्याला 120 लाईक 15 रिट्विट आणि 2 कमेंट आहेत. तर तिसरं ट्विट हे कालचेचं आहे. त्यात पारनेरमधील सभेचा मजकूर आहे. त्याला 146 लाईक 20 रिट्विट आणि 6 कमेंट आहेत.

इन्स्टाग्राम. 

१) संग्राम जगताप. 

संग्राम जगताप यांचं इन्स्टाग्रामवर सुद्धा आहे. त्यावर त्यांनी आत्तापर्यंत ७२६ पोस्ट केल्या असून २५ हजाराच्यावर त्यांचे फोलोवर्स आहेत.

 • त्यांच्या सुरूवातीच्या तीन पोस्ट पाहिल्या तर पहिल्या पोस्टमध्ये  त्यांनी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. शेवगाव दौऱ्यावर गेला असतांनाचा तो व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओला ९ हजारपेक्षा जास्त लोकांनी पाहिला असून ३० कमेंट केल्या आहेत.
 • तर त्या खालची पोस्ट त्यांनी २७ तारखेला टाकली असून त्यात जामखेड दौऱ्यावरचे फोटो आहेत. त्या फोटोला २५०० लाईक आहेत.
 • तर तिसरी पोस्ट २७ तारखेचीच आहे त्या पोस्टमध्ये नगर- जामखेड रोडवरील लोकांशी बोलतांनाचा फोटो टाकलेला आहे. त्या पोस्टला २००० हजाराच्यावर लाईक आहेत.

२) सुजय विखे. 

सुजय विखेंच देखील इन्स्टाग्राम अकाऊंट आहे. त्यांनी आत्तापर्यंत 20 पोस्ट केलेल्या आहेत. तर 10 हजार लोकं त्यांना फाँलो करत आहेत.

 • त्याच्या सुरूवातीच्या तीन पोस्ट पाहिल्यानंतर पहिली पोस्ट शेवगावच्या सभेची आहे. एका तासात 500 च्यावर लाईक आणि 2 कमेंट आलेल्या आहेत.
 • त्या खालची पोस्ट 4 तासापुर्वीची आहे. त्याच चौकीदाराचा व्हिडिओ आहे. तो 1200 लोकांनी पाहिला असून त्यालाही 2 कमेंट आहेत.
 • तीसरी पोस्ट ही 5 तासापुर्वीची आहे. त्यात सुजयपर्व नावाचा व्हिडिओ टाकलेला आहे. तो 2281 लोकांनी पाहिला असून त्याला 12 कमेंट आहेत.
 • हे तीन अंकाऊट सुजय विखे यांचे ऑफिशियल अंकाऊट आहेत मात्र फेसबुक आणि ट्विटरच्याच अंकाऊट पुढं ऑफिशयल पेजची ब्लू टीक आहे.

हि झाली त्यांच्या फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामची परिस्थिती. फेसबुकचा विचार करता डॉ. सुजय विखे पाटील संग्राम जगताप यांच्या पुढे असलेले दिसून येतात. ट्विटरचा विचार करता संग्राम जगताप हे सुजय विखे यांच्या पुढे आहेत मात्र हा फरक खूप मोठा असा नाही. इन्स्टाग्रामचा विचार करता संग्राम जगताप यांना 25 हजार तर सुजय विखे यांना 10 हजार फॉलोअर्स आहेत. चौकशी केल्यानंतर विरोधी प्रचार करत असताना सुजय विखे यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात कार्टून्स, कॅरिकेचर तयार केल्या जात असल्याचं सांगण्यात येतं. मात्र संग्राम जगताप यांच्या विरोधात त्या प्रमाणात व्हायरल डिझाइन्स नसल्याच सांगण्यात येत आहे.

थोडक्यात पाहता, सुजय विखे पाटील हे फेसबुक आणि जास्तित जास्त लोकांपर्यन्त पोहचण्यास सद्यस्थितीत तरी संग्राम जगताप यांच्या पुढे असलेले दिसून येतात. 

Leave A Reply

Your email address will not be published.