विदर्भात फिल्मसिटी बनविण्याची चर्चा सुरू झालीय. संजुबाबा पुढं आलाय.

एखाद्या उद्योगाचं एकाच ठिकाणी होणारं केंद्रीकरण जसं फायद्याचं असतं, तसं ते कधी कधी तोट्यात ही घेऊन जाणार असतं. त्यामुळं एखाद्या उद्योगाची पाळंमुळं एकाच ठिकाणी रुजवण्याऐवजी दुसरीकडं विस्तारली पाहिजेत. ते सर्वांच्याच फायद्याचं असतं.

असच विकेंद्रीकरण विदर्भात चित्रपट नगरीच्या निमित्तानं सुरू झालंय. म्हणजे संजू बाबा विदर्भांत फ्लिमसिटी सुरु करायचं म्हणतोय. मुंबई सोडून फक्त कोल्हापूरातच असणारी फिल्मसिटी आता विदर्भात ही सुरु होईल.

या फिल्मसिटीची चर्चा सुरु झाली, संजय दत्तच्या विदर्भ भेटीन.

त्याच झालं असं कि संजय दत्तने ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासह धावती भेट दिली. संजय दत्तचे स्वत:चे प्रॉडक्शन हाउस असून, तो त्याच्या विस्ताराच्या हेतूने नागपूरला फिल्म सिटी उभारणीच्या कार्यात उत्सुक असल्याचे सांगितले जात आहे. याचसाठी त्याने आज रामटेक-खिंडसी परिसराची पाहणी केली. अचानक घेतलेल्या या भेटीमुळे विदर्भात चित्रपटनगरी उभारली जाण्याच्या स्वप्नांना बळ मिळाल्याच्या चर्चा रंगल्या. याआधी सुद्धा काही महिन्यांपूर्वी त्याने नागपूरला नितीन गडकरी आणि नितीन राऊत यांच्या घरी भेट दिली होती.

संजू बाबाला फिल्मसिटीसाठी विदर्भच का पाहिजे ?

तर विदर्भ हा निसर्गसंपन्न प्रदेश आहे. पायाभूत सुविधांच्या रचनाही गेल्या काही वर्षांत जाेमाने आकारास येत आहेत. सिमेंट रस्ते, मेट्रो, थेट मुंबईला जोडलेला समृद्धी महामार्ग, उभी होत असलेली मोठमोठी हॉटेल्स, हॉस्पिटॅलिटी सुविधा यासोबतच नद्या, विस्तीर्ण जंगल, टेकड्या, लहान-मोठे धबधबे, जलाशये, ऐतिहासिक स्थळे-वास्तू नागपूरसह विदर्भात मोठ्या प्रमाणात आहेत.

पण आजवर इथं उद्योग धंदे सुरु झाले नाहीत. विदर्भात प्रतिभा, पर्यावरण आणि फिल्मसिटीसाठी लोकेशन असल्यान तिथं प्रचंड क्षमता आहे. त्यात कमतरता आहे ती गुंतवणूकदारांची इच्छाशक्ती. विदर्भातील चित्रीकरण करून चित्रपटांमध्ये गुंतवणूक करण्याची हिंमत नाही. हैदराबादच्या धर्तीवर विदर्भाला फिल्मसिटी मिळायला हवी.

या भागात आतापर्यंत कोणताही उद्योग नसल्याने, हा भाग मागासलेला आहे. त्याच पार्श्वभूमीवर विदर्भात रामटेक येथे चित्रपटनगरी उभारली जावी, यासाठी पालकमंत्री नितीन राऊत प्रयत्नरत असल्याच दिसून आलं. चित्रपट उद्योगासाठी साधारणत: ४०० एकर जागेची गरज बघता, नितीन राऊत यांनी जागेचे निरीक्षण करण्यासाठी अभिनेता संजय दत्त यांच्यासह रामटेक येथील खिंडसी परिसरातील पंचाळा मार्गाला भेट दिली.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.