संजय दत्त दारू पिवून ऋषी कपूरला हाणायला गेलेला इतक्यात एक घोळ झाला… 

द खुल्लम खुल्ला ऋषी कपूर अनसेंसर्ड नावाची ऋषी कपूर यांची बायोग्राफी आहे. या पुस्तकात ऋषी कपूर यांनी एकास एक किस्से सांगितले आहेत. त्यामध्येच या किस्स्याचा उल्लेख केलेला आहे. 

किस्सा १९७९ सालातला आहे, 

झालेलं अस की तो काळ या दोघांच्या उभारीचा होता. ऋषी कपूर बॉबी मधून सुपरहिट झालेला. फिल्म लाईनमध्ये त्याला सात-आठ वर्षांचा अनुभव आला होता. दूसरीकडे संजय दत्त अजूनही आईबापाच्या सावलीतून बाहेर पडला नव्हता. 

संजय दत्त आणि टिना मुनीम एकाच कॉलेजात शिकत होते. त्यांच प्रेमप्रकरण चालू झालेलं. अशा काळात टिना मुनीम सिनेमा देखील करु लागली होती. तिला पहिला ब्रेक मिळाला तो देव आनंद यांच्या देस परदेस मध्ये, त्यानंतर तिने बातों बातों मे केला. पण तिचा पहिल्यांदा उल्लेख केला गेला तो ऋषी कपूर यांच्या कर्ज सिनेमामुळे.. 

१९८० साली कर्ज रिलीज झाला. यामध्ये टिना मुनीम होती. दूसरीकडे टिना मुनीम आणि संजय दत्तचं प्रेमप्रकरण कॉलेजपासून चालू होतं. आत्ता टिना मुनीम कामाला लागलेली आणि संजू बाबा मस्तमौला जिवन जगत होते. रॉकी प्रोसेसमध्ये होता इतकच. पण दिलो जानसे दोघांच प्रेमप्रकरण चालू होतं हे पण खरं… 

तर झालं अस की, कर्ज च्या शुट वेळी टिना आणि ऋषी कपूर एकमेकांच्या जवळ आल्याच्या चर्चा होत्या. संजय दत्त प्रेमात टोकाच्या भावनेला पोहचल्याने टिनाकडे कोणी पाहीलेलं पण त्याला खपायचं नाही.

अशातच एक दिवस संजय दत्त आणि गुलशन ग्रोव्हर प्यायला बसले. इकडच्या तिकडच्या गप्पा निघाल्यानंतर टिना मुनीमचा विषय निघाला. संजय दत्तला फुलवायला गुलशन ग्रोव्हर होताच.  झालं संजू बाबाचं डोकं हाललं आणि गडी थेट गाडी घेवून ऋषी कपूरच्या घरी निघाला.

पण ऋषी कपूरच्या गेटवरच त्याला भेटली नितू सिंग.

नितू सिंग ने कारण विचारल्यावर टिनाची आणि ऋषीची जवळीक वाढल्याचं संजय दत्तने सांगितलं. इथे संजय दत्त टुल्ल होते. मग नितू सिंहने संजू बाबाला त्याच नाही रे आमचं चालू असल्याची माहिती दिली. आम्ही लवकरच लग्न करणार असल्याचं सांगून तुझा गैरसमज झाला असल्याचं सांगितलं. संजय दत्तला तिथून कटवण्यात नितू सिंग यशस्वी झाली.

या घटनेनंतर काहीच महिन्यात म्हणजे जानेवारीच्या १९८० मध्ये नितू सिंग आणि ऋषी कपूरने लग्न केलं आणि संजय दत्तच्या मनातला गैरसमज कायमचा दूर झाला. 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.