या गावात आजही संस्कृतमधून संवाद साधला जातो !
भारतातली सर्वात प्राचीन भाषा. त्यामुळेच संस्कृतला सर्व भाषांची जननी म्हणून देखील ओळखलं जातं. अनेकवेळा संस्कृतला भारताची राष्ट्रभाषा म्हणून जाहीर करण्याची मागणी देखील जोर धरत असते. पण त्याचवेळी संस्कृत भाषेचं अस्तित्व दिवसेंदिवस लुप्त होत चाललं असल्याची भीती देखील भाषा प्रेमींकडून व्यक्त करण्यात येत असते.
आपल्यापैकी अनेकांना ही भाषा समजत नसली तरी दैनंदिन जीवनात बऱ्याच वेळा आपल्याला संस्कृतमधील काही शब्दांचा वापर आपण कधीतरी केलेला असतोच. अनेकांनी शाळेत किंवा कॉलेजात असताना द्वितीय भाषा म्हणून थोड्याफार प्रमाणात संस्कृत शिकलेली असते. (अर्थात मार्कमेमोवर पैकीच्या पैकी मार्क देणारा विषय म्हणून आपण संस्कृतची निवड केलेली असली तरी त्यानिमित्ताने का होईना पण आपल्याला संस्कृतची तोंडओळख झालेली असतेच)
मराठीतही अनेक शब्द संस्कृतमधून आलेले आहेत. आपल्याकडील बऱ्याचशा मोठमोठ्या संस्थांचे ब्रीदवाक्य देखील संस्कुतमध्येच आहेत. उदाहरणादाखल सांगायचं झालं तर ‘सत्यमेव जयते’ असेल किंवा ‘अहर्निशम सेवामहे’ असेल.
आज संस्कृत दिनानिमित आम्ही तुम्हाला सांगतोय एका अशा गावाची गोष्ट जिथं केवळ संस्कृत भाषाच बोलली जाते. या गावातील लहानग्या मुलापासून ते म्हाताऱ्यापर्यंत सर्वजण संस्कृतमध्येच बोलतात. कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यातील ‘मुत्तुर’ हे ते गाव.
- उत्तर प्रदेशातील गावात दलित समाजाने बांधलय ‘इंग्लिश देवी’चं मंदिर!!
- भारताच्या सिमेवरचं शेवटचं गाव, पहिलं घेतं महाराजांच नाव.
- आणि झारखंडमधील एक गाव मिनी लंडन म्हणून जगभर ओळखलं जाऊ लागलं !!!
“मुत्तूर गाव” या गावात आजही संस्कृतमधूनच संवाद साधला जातो.
मुतूर या गावात प्रवेश केला की आपल्याला दुसऱ्याच कुठल्यातरी जगात आल्यासारखा भास होतो. जवळपास ३०० कुटुंबांची वस्ती असणाऱ्या या गावातील लोकांच्या भाषेपासून ते त्यांची वेशभूषा आणि खाद्यसंस्कृती यावर वेगळे सांस्कृतिक संस्कार आहेत. गावातील शाळेत संस्कृत शिकवण्यासाठी वेगळी व्यवस्था आहे.
पहिली ते दहावीपर्यंत संस्कृत हा विषय अनिवार्य कारण्यात आलेला आहे. शिवाय आजूबाजूचं सगळं वातावरणचं संस्कृतमय असल्याने मुलांना लहानपणापासूनच संस्कृतचे धडे मिळतात. त्यामुळे ते सहजपणे संस्कृत बोलायला लागतात.
गावातील घरांच्या भिंतीवर संस्कृतमधील सुभाषितं आणि प्रबोधन करणारी वाक्ये वाचायला मिळतात. अनेक घरांच्या बाहेरच लिहिलेलं आहे की ‘या घरात आपण संस्कृत भाषेत संवाद साधू शकता’. संकेथी ही या गावाची मूळ भाषा असून त्याबरोबरच या गावात कन्नड देखील जाते.
प्रयत्नपुर्वक गावाला संस्कृत गाव म्हणून निर्माण करण्यात आलं.
हे गाव काही आधीपासूनच संस्कृत बोलणारं गाव नव्हतं. गावाला तसं बनवण्यासाठी विशेष प्रयत्न ऐंशीच्या दशकापासूनच करण्यात येत आहेत. १९८२ साली या गावात सर्वप्रथम ‘संस्कृत प्रशिक्षण सत्र’ घेण्यात आलं होतं. त्यानंतर सातत्याने हे प्रयत्न सुरु आहेत. या प्रयत्नाचंच फळ म्हणजे आज हे गाव संपूर्णपणे संस्कृत बोलणारं गाव म्हणून देशभरात प्रसिद्ध आहे.
गावाचं कौतुक अशासाठी की संस्कृत भाषेची जोपासना करताना या गावाने फक्त भूतकाळात रमत आधुनिकतेची कास सोडण्याची चूक देखील केलेली नाही. संकृत भाषेचा वारसा जपतानाच या गावात इंग्रजीला देखील तितकंच महत्व दिलं जातं. इंग्रजीच आपल्याला जगाची दार उघडणारी भाषा आहे, या वास्तवाचं या गावातील रहिवाशांना व्यवस्थित भान आहे. त्यामुळे गावात इंग्रजीला देखील तितकंच महत्व दिलं जातं.
संस्कृत भाषेबद्दल सध्यस्थिती काय सांगते.
संस्कृत भाषेला उत्तराखंड राज्याची अधिकृत भाषा म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. परंतु २०११ सालच्या जनगणनेनुसार या राज्यातील फक्त ४२० लोकांनाच संस्कृत भाषा अवगत आहे.
जनगणनेच्याच आकडेवारीनुसार देशात एकूण १४१३५ लोक संकृत भाषा साक्षर आहेत. त्यात ८१८९ पुरुष तर ५९४४६ महिलांचा समावेश आहे.
‘सुधर्मा’ हे संस्कृत भाषेतून निघणारं देशातील एकमेव वृत्तपत्र होतं, ज्याची सुरुवात १९७० साली करण्यात आली होती.
- जगप्रसिद्ध गांजा पिकवणारं गाव भारताचा कायदा मानत नाही पण अकबराची पूजा करतं..!!!
- महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमावादात “सातबाऱ्यावरुन” गायब झालेलं गाव.
- शेक्सपियरने झपाटलेलं गाव..