एकेकाळी सिरीयात पण संस्कृतचा दबदबा होता.

जगातल्या प्राचीन भाषांपैकी एक भाषा म्हणजे संस्कृत. आज नुसती शाळेतल्या पोरांचा जास्तीचे मार्क्स घेण्याचा एक विषय एवढ्यापुरतीच संस्कृत आपल्यापैकी काहीजणांना माहित असली तरी एकेकाळी खूप मोठ्या भूभागावर संस्कृत बोलली जायची. आजच्या पार मध्य आशियापर्यंत संस्कृत समजली जायची. पण सिरियात पण संस्कृत बोलली जायची याची जेव्हा माहिती भिडूला मिळाली तेव्हा मात्र मग भिडूनं ह्या प्रकरणात थोडं जास्त लक्ष घालायचं ठरवलं. आणि मग ही माहिती मिळवली.

 सुमारे 3500 वर्षांपूर्वी, सध्याच्या पश्चिम आशियातील युफ्रेटिस आणि टायग्रिस नदीच्या खोऱ्यांच्या वरच्या भागात मितान्नी राजवंशाचे राज्य होते. हा भाग आता उत्तर इराक, सीरिया आणि आग्नेय तुर्कीचा भाग आहे.

मितान्नी साम्राज्य भूमध्य समुद्र आणि उत्तर अ‍ॅसिरिया आणि आग्नेय मेसोपोटेमिया यांच्या सीमेवर होते. मितान्नी राज्याची उत्तर-पश्चिम सीमा हित्ती लोकांच्या हित्ती राज्यासह वारंवार हल्ल्यांच्या अधीन होती. दोन प्रतिस्पर्ध्यांनी शांतता करार होईपर्यंत हा वाद सुरूच होता.

इ.स.पू. १४०० च्या बोगाजाकोई किंवा मिटन्नी शिलालेखात इंद्र, मित्रा, वरुण आणि नासत्य या वैदिक देवतांचे वर्णन हित्ती राजा शुब्बिलीम्मा आणि मितान्नी राजा मतिआजा यांच्यातील या कराराचे साक्षीदार म्हणून केले आहे.

आत ह्यावरून मितान्नी राजघराण्यात संस्कृतचा वापर होत असल्याचं तुम्हालाही कळलं असेलच.

असं मानलं जाते की या सभ्यतेमध्ये राजांची नावे हिंदू देवतांच्या नावावर संस्कृत भाषेत होती. यामध्ये इंद्र, दशरथ, अत्तत्तम या राजांचा उल्लेख आहे.

त्यामुळं आज हिंदूंची वैदिक भाषा, संस्कृतचा उगम भारतात झाला असे मानले जाते. अशा परिस्थितीत,संस्कृत भाषा भारतापासून दूर भूमध्य समुद्रात कसे पोहोचली?

या राज्याच्या राजधानीचे नावही ‘वसुखानी’ संस्कृत भाषेत होते.

सध्याच्या उत्तर सीरियाच्या या राज्यात ऋग्वेदिक संस्कृतचे लिखित पुरावे सापडतात असे मानले जाते.मितानी वंशातील राजांची नावे कीर्त्य, सतवर्ण, वर्तर्ण, बरत्तर्ण, अर्ततम, सतवर्ण, अर्थसुमेध, तुष्यरथ किंवा दशरथ, सतवर्ण, मतिवज, क्षात्र, वसुक्षत्र, क्षात्र अशी होती.

असं सांगण्यात येतं की हे लोक महाभारतानंतर भारतातून आले आणि या भागात स्थायिक झाले. त्याच वेळी, काही इतिहासकार मानतात की हे लोक वेदांच्या मैत्रायन शाखेचे प्रतिनिधी आहेत.सीरिया, बोगजाकोई इत्यादी देशांतील भाषा वैदिक भाषेशी मिळतीजुळती असल्याचे विद्वानांचे मत आहे.

ह्याचा अर्थ संस्कृतच डंका सातासमुद्रापार वाजत होता. काही ठिकाणी व्यापारामुळं पण संस्कृत पोहचली होती. संस्कृत ही इंडो-युरोपियन भाषा गटातील  असल्यानं प्राचीन इराणी भाषेशी पण संस्कृतमधले शब्द मिळतात. त्यामुळं या दोघांमधील साधर्म्यमुळंही संस्कृत मध्य आशियापर्यंत समजली जात असावी असं सांगण्यात येतं.

बाकी संस्कृत भाषा किंवा इतर कोणत्याही भाषेबद्दल तुम्हाला इंटरेस्टिंग माहिती पाहिजे असेल तर खाली कंमेंट करून जरूर सांगा म्हणजे भिडू लागलीच तुमच्यासाठी ती माहिती घेऊन येइल.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.