गाडगेबाबांच्या हृदयस्पर्शी भेटीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले

सिंहाला पहावे वनात, हत्तीला पहावे रानात आणि गाडगेबाबांना पहावे किर्तनात अस वर्तन गाडगेमहाराजांच वर्णन आचार्य अत्रे यांनी केलं आहे.

भायखळा परिसरात गाडगेमहाराजांचे किर्तन चालू होते. किर्तन सुरू झाल्यावर एका माणसानं गाडगेमहाराजांना प्रश्न केला. महाराज एक विचारू का..?  “विचारा मायबाप, पण मले महाराज म्हणू नका. मी आपले लेकरू हाय. बोलविते धनीच बसलेत तुमच्या पलीकडे”. असे म्हणून गाडगेमहाराजांनी गर्दीच्या दूसऱ्या टोकाकडे बोट दाखवलं. त्या गर्दीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जमीनीवर बसून गाडगेमहाराजांच किर्तन ऐकण्यात तल्लीन झाले होते.

अनाथ, अपंगांचे सेवेकरी संत गाडगे महाराजांनी गावोगावी पायी फिरून दिवसा स्‍वच्‍छता तर रात्री कीर्तनाच्‍या माध्‍यमातून लोकांची मने स्‍वच्‍छ केली. अज्ञान, अंधश्रद्धा आणि अच्छतेच्‍या नायनाटासाठी जीवन खर्ची घातलेल्या गाडगे महाराजांच्‍या आयुष्‍यात अनेक खडतर प्रसंग आले होते. त्यापैकीच हा एक अत्यंत हृदयस्पर्शी प्रसंग.

१८९२ साली डेबुजी यांच लग्न झालं. लग्नात दारू आणि मटणाचं जेवण देणं हि त्याकाळची प्रथा. पण डेबुजी याने या प्रथा परंपरेला फाटा दिला. आपल्या लग्नात त्यांने गोडधोड केलं आणि तिथूनच एक मशाल पेटली. ती मशाल होती. अंधश्रद्धेच्या विरोधातली, अस्वच्छतेच्या विरोधातली. ती मशाल होती देव दगडात नाही तर माणसात शोधण्याची.

१९०५ साली डेबुजी जानोरकर यांनी घरादाराचा त्याग केला. तिर्थटन केले, ठिकठिकाणी जावून देव देवळात नाही माणसात आहे हे सांगण्यास सुरवात केली. हरी हरी करुन प्रश्न सुटणार नाहीत, प्रश्न सुटतील ते शिक्षणातून, स्वच्छतेतून.

ते माणसांना सांगायचे, अरे तुम्ही पंढरीला जाता. शेगावले जाता पण तो तुमचा तिथला देव काही बोलतो का तुमच्याशी? तुम्ही जेवला का? पाणी पिला का इचारतो काय?  असा कसा तुमचा देव कुत्र नवैज्ञ खाते त्याला हाड बी म्हणत नाय?

गाडगेमहाराज मुद्याच बोलत असत. त्यामुळे खूप माणसांची मन दुखायची. पण महाराज एकाच गोष्टीवर अडून रहात देव देवळात नाही माणसात आहे. अंगावर फाडक्या चिंधींचे कपडे, हातात पाणी प्यायला फुटके गाडगे आणि हातात खराटा घेवून ते एका गावातून दूसऱ्या गावात फिरत रहायचे. जाईल तिथे परिसर झाडून स्वच्छ करायचे. लोकांना किर्तनातून अंधश्रद्धेविषयी सांगायचे.याच किर्तनातून गाडगे महाराजांनी रोकडा धर्म सांगितलं.

ते सांगतात वस्ती नसणाऱ्याला वस्ती, अपंगाला, अंधाला औषध, काम करणाऱ्याला कामधंदा, विद्यार्थाला शिक्षण, गरिबाची लग्न, मुक्या जनावरांना संरक्षण, चोरी करु नका, सावकाराचे कर्ज काढू नका, व्यसनाच्या आहारी जावू नका अशा कित्येक गोष्टी ते सांगत.

गाडगेमहाराजांच्या याच गोष्टींमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गाडगेमहाराच यांच्यात नात निर्माण झालं. १४ जुलै १९४१ साली गाडगेमहाराज मुंबईत होते. त्यादरम्यान ते आजारी पडले होते. हि माहिती कोणीतरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर यांच्यापर्यन्त पोहचवली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यावेळी तातडीने दिल्लीला जायचे होते, पण त्यांनी आपला दौरा रद्द करून हॉस्पीटल गाठलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत त्यांना गाडगेबाबांच्या प्रकृतीची माहिती सांगणारे महानंदसामी देखील होते. त्यांच्या हातात गाडगेबाबांना भेट म्हणून आणलेल्या दोन घोंगड्या होत्या. गाडगेबाबा कधीच कोणाकडून भेटवस्तू स्वीकारत नसत पण त्यांनी बाबासाहेबांनी आणलेल्या घोंगड्या घेतल्या.

तेव्हा गाडगेबाबा म्हणाले,

“डॉ. तुम्ही कशाला आले. मी एक फकिर. तुमचा एक मिनीट पण महत्वाचा आहे. तुमचा किती मोठ्ठा अधिकार.”

डॉ. बाबासाहेब म्हणाले,

“बाबा माझा अधिकार दोन दिवसाचा. उद्या खुर्ची गेल्यावर मला कोणी विचारणार नाही. तुमचा अधिकार मोठ्ठा.”

या प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या डोळ्यात अश्रू होते कारण गाडगेबाबा आणि डॉ. आंबेडकर दोघांनाही कळून चुकलं होतं की ही दोघांची शेवटची भेट आहे.

२० डिसेंबर १९५६ साली गाडगेमहाराज मोटारीने अमरावतीला चालले होते. वलगाव इथे मोटारीतच असताना त्यांचे परिनिर्वाण झाले.

हे ही वाच भिडू :

Webtitle : Sant Gadge baba death anniversery: babasaheb ambedkar got emotional after meeting Sant gadge baba

Leave A Reply

Your email address will not be published.