दोन वेळा एव्हरेस्ट सर करून जागतिक विक्रम केला, स्वतः एडमंड हिलरीने तीच कौतुक केलं होतं

माऊंट एव्हरेस्ट.जगातला सर्वात उंच पर्वत. ज्याची उंची 8.848 मिटर आहे. एवढा उंच आणि त्यातही पूर्णपणे बर्फाने वेढलेला हा पर्वत सर करना प्रत्येक गिर्यारोहकाचा स्वप्न असतं.

बरेच जण हेच स्वप्न उराशी बाळगून पर्वत सर करण्याच्या तयारीला जातात, यात काही यशस्वी सुद्धा झालेत, तर काही झेपेल तितका प्रवास करून माघारी देखील फिरलेत. म्हणजे आकडेवारी नुसार असे म्हटले जाते की आत्तापर्यंत जवळपास 2200 च्या आसपास गिर्यारोहकांनी यावर यशस्वी चढाई केली आहे.

धक्कादायक गोष्ट म्हणजे 200 पेक्षा जास्त लोकांचा माउंट एव्हरेस्टवर जीवही गेलाय. तिथे जाऊन येणाऱ्याची एकदाच सगळी हाऊस फिटते. त्यामुळे परत जाण्याचा विचार सहसा कोणाच्या डोक्यात येत नाही, पण हो, त्यातही काही अपवाद असतात. जे पून्हा हा बलाढ्य पर्वत सर करायला निघतात.

त्यातलंच एक नाव म्हणजे संतोष यादव. १२ मे, १९९२ रोजी संतोष यादव यांनी हिमालयातील माऊंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर सर केलं. भारताच्याच बच्छेद्री पाल  नंतर असा पराक्रम करणाऱ्या त्या दुसऱ्या स्त्री-गिर्यारोहक ठरल्या.

पण त्यांच्यातलं गिर्यारोहणाचं वेड आणि माऊंट एव्हरेस्ट सर करण्याचा तो धाडसी अनुभव त्यांना पुन्हा घ्यायचा होता. त्यामुळे संतोष यांनी पुढच्याच वर्षी म्हणजे १० मे, १९९३ रोजी पुन्हा ‘एव्हरेस्ट’ सर केलं आणि हा सर्वोच्च पर्वत दोन वेळा यशस्वीरीत्या सर करण्याचा रेकॉर्ड केला.

माऊंट एव्हरेस्ट दोनदा सर करणाऱ्या त्या पहिला महिला गिर्यारोहक बनल्या.

जगात पहिल्यांदा एव्हरेस्ट सर करणाऱ्या एडमंड हिलरी यांनी देखील या जिद्दी संतोष यादवच कौतुक केलेलं.

जोनियावास या छोट्याशा खेड्यात जन्मलेली संतोष  एका पारंपरिक घरात वाढलेल्या. पाच भावांमध्ये त्या एकुलती एक बहीण. बारावीसाठी संतोष यांनी जयपूरमधील महाराणी महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथे अपघातानेच त्यांचा गिर्यारोहणाशी संबंध आला. नंतर उत्तर काशी इथे जाऊन त्यांनी गिर्यारोहणाचा बेसिक कोर्स पूर्ण केला आणि नंतर अॅडव्हान्स कोर्ससाठीही प्रवेश मिळाला.

पुढे इंडो-तिबेट बॉर्डर पोलीसचे (आयटीबीपी) अधिकारी कॅप्टन हुकूमसिंग यांनी त्यांच्या कामगिरीने प्रभावित होऊन आयटीबीपीमध्ये भरती करून घेतलं. मग संतोष यादव यांनी आयटीबीपीच्या मोहिमांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. या मोहिमांचा भाग म्हणूनच तिची एव्हरेस्ट मोहिमेसाठीही निवड झाली.

सगळ्यात आधी १९९२ मध्ये त्यांनी एव्हरेस्ट सर केलं. १९९२ च्या मोहिमेवेळी त्यांनी आपला ऑक्सिजन शेअर करत मोहन सिंग या गिर्यारोहकाचा जीव वाचला होता.

त्यानंतर संतोष यांना पुन्हा एकदा एव्हरेस्ट मोहिमेवर जायची संधी मिळाली.पण या वेळी पथकाचं नेतृत्व त्यांच्याकडे होतं. १९९३ मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा एव्हरेस्ट सर केलं. असा विक्रम करणाऱ्या संतोष यादव जगातील एकमेव महिला ठरल्या. दोन्ही वेळा त्यांनी अवघड मानल्या जाणाऱ्या साऊथ कोलमार्गे त्यांनी चढाई केली.

एवढेच नाही तर कांगशुंगच्या भागाने माउंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करणाऱ्या त्या जगातील पहिल्या महिला आहेत.

एका मुलाखतीत त्यांनी माऊंट एव्हरेस्ट सर करतानाचा किस्सा शेअर केला. त्यांनी सांगितलं की, साऊथ पोलला हायस्ट ग्रेवयार्ड सुद्धा म्हंटल जातं. जिथे मोठ्या प्रमाणात डेड बॉडी मिळतात. आणि उंच ठिकाणी असल्यामुळे इथून डेड बॉडीज खाली आणणं अवघड काम असतं.

यादरम्यान पर्वत सर करताना जिथे संतोष त्यांचा टेंट लावलेला होता, तिथेचं एक डेडबॉडी पडलेली होती. संतोष यांना याबाबत कुठलीच माहिती नव्हती. त्या रात्रभर तिथेचं झोपल्या आणि सकाळी उठल्यानंतर त्यांना समजलं की, त्या रात्रभर एका डेडबॉडीसोबत झोपल्या होत्या.

अशा या धाडसी संतोष यादव यांची कामगिरी भारतीय स्त्री गिर्यारोहकांसाठी प्रेरणादायी ठरली. त्यांना 2000 साली पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. दोनदा एव्हरेस्टवर सर केल्यामुळे त्यांना के.के. बिर्ला फाउंडेशन स्पोर्ट्सला विशेष पुरस्कार देण्याची घोषणाही करण्यात आली. 19 एप्रिल 2001 रोजी संतोष यांना लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने सन्मानितही केले गेले.

हे ही वाचं भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.