पटेल गांधीना म्हणाले, माझ्या जिवंतपणी सोमनाथ मंदीराचा जिर्णोद्धार सरकारी पैशातून होणार नाही.. 

नेमकी ही गोष्ट काय होती हे सांगण्यापूर्वी एक गोष्ट सांगू इच्छितो. हिंदू मुस्लीम, मुस्लीम धार्जिणे वगैरे टिका करण्यापूर्वी एक समजून घ्या आपले पूर्वीचे नेते जेव्हा भारताचा पाया रचत होते तेव्हा एका गोष्टीवर सर्वजण ठाम होते. 

ती गोष्ट म्हणजे धार्मिक प्रतिकांचा वापर करुन राष्ट्रनिर्मीतीचे कार्य होवू शकत नाही. 

अन् याच गोष्टीमुळे भारताचा बहुसांस्कृतिकतेचा पाया रचला गेला. त्यासाठी सोमनाथ मंदीराच्या जिर्णोद्धाराचा हा किस्सा आपण वाचायलाच हवा. 

भारतात तेव्हा सोमनाथ मंदीराच्या जिर्णोद्धाराचा मुद्दा उपस्थित झालेला.

याच दरम्यान भारत स्वतंत्र झाला होता पण आपली स्वत:ची अशी राज्यघटना तेव्हा अस्तित्वात आलेली नव्हती. त्या काळात सांवलदास गांधी यांच्या नेतृत्वात जूनागड मध्ये एक अस्थायी सरकार बनवण्यात आलं होतं.

आणि या सरकारने सोमनाथ मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी ५० हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला होता. याच पद्धतीने जामनगरच्या संस्थानाने देखील १ लाख रुपये देण्याचं मान्य केलं होतं. 

या धर्तीवर महात्मा गांधींच्या हाती एक पत्र पडलं. यामध्ये कोणीतरी महात्मा गांधींना दोन्ही सरकारने घेतलेले हे निर्णय कळवले होते. या सर्व घडामोडींच्या मागे नवं भारताची निर्मीती ही हिंदूराष्ट्र म्हणून झालेली आहे असा सांगणाऱ्याचा एक प्रवाह देखील होता. जो जिवतोडून भारत हे एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र नाहीए तर हिंदूराष्ट्र असल्याचं म्हणणं मांडत होता. 

महात्मा गांधींनी आपणाला आलेल्या या पत्राचा हवाला देवून आपलं म्हणणं २८ नोव्हेंबर १९४७ रोजी मांडल त्यात ते म्हणतात, 

सरदारजी जेव्हा माझ्याकडे आले तेव्हा मी त्यांना विचारलं होतं तूम्ही असा देश निर्माण करणार आहात का जो हिंदूंसाठी सरकारी तिजोरीतून पैसे काढून देईल. देश तर प्रत्येकाचा आहे. इंग्रजीमध्ये सेक्युलर म्हणतात तसा देश आहे आणि याचा अर्थ कोणत्याही एका धर्माची सरकार नाही.

हिंदूंना वेगळे पैसे, शिखांना वेगळे पैसे, मुस्लीमांना वेगळे पैसे असाही याचा अर्थ होतं नाही. देश सर्वांचा आहे आणि धर्म एकट्याचा आहे.

धर्म आपआपला असावा. 

गांधी पुढे सांगतात, जर कोणत्याही धर्मासाठी सरकार रक्कम देत असेल तर तेच खरे अधर्म आहे. जेव्हा मी सरदार पटेलांना याबाबत विचारणा केली तेव्हा ते म्हणाले, 

माझ्या जिवंतपणी तर सरकारी तिजोरीतून मंदीराचा जिर्णोद्धार होवू शकत नाही. सोमनाथ मंदीरासाठी जुनागड सरकारकडून एक रुपायादेखील जाणार नाही. जिर्णोद्धारासाठी हिंदूनीचं पैसे द्यावेत. जर ते पैसे देत नसतील तर मंदीर आहे त्या अवस्थेतच राहिलं पण सरकारी तिजोरीतून पैसे जाणार नाहीत. 

१२ डिसेंबर १९४७ रोजी महात्मा गांधींनी प्रार्थना सभेत पुन्हा या गोष्टीचा उल्लेख केला. ते म्हणाले, 

सरदार पटेलांनी मला सांगितलं आहे की सरकारी पैशातून मंदीराचा जिर्णोद्धार होणार नाही.. 

इकडे मुस्लीम लोकांमध्ये देखील अशा व्यक्ती होत्या त्या या संधीचा फायदा घेवून दुहीचं बीज पेरण्यात अग्रेसर होत्या. उर्दू पत्रिकेत धार्मिक भावना भडकणारा एक शेर लिहण्यात आला. 

महात्मा गांधीनी त्याचावर टिका करत देखील म्हणाले,

एका उर्दू वर्तमानपत्रात एक शेर वाचण्यात आला. जुनागडचा बदला घेण्यासाठी दुसरा गझनवी यायला हवा असा त्याचा अर्थ होता. पण आपण समजून घ्यायला हवं की वाईटचा सामना आपण चांगल्या गोष्टी करून करायचा आहे. गझनवी हा वाईट होता हे मुस्लीमांना समजलं पाहीजे. आणि या गोष्टीला नकार द्याला हवा. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.