स्वत:ला मिळालेली संधी मोठ्या मनाने दुसऱ्याला देण्याचा वल्लभभाई पटेलांचा तो किस्सा.. 

संधी एकदाच येते. त्या संधीचं सोनं करणं जमायला हवं. लहानपणापासून आपणाला शिकवण्यात येणारी ही गोष्ट. संधी एकदाच येते ती संधी घ्यावी. पण सरदार वल्लभभाई पटेल वेगळे होते. ते वेगळे होते म्हणूनच त्यांना मिळालेली संधी त्यांनी उदार मनाने दूसऱ्याला देवू केली. पण इतक्यावरच ते थांबले नाहीत तर ती संधी मिळावी म्हणून त्यांनी चार वर्षांपासून जे कष्ट केले होते त्यावर देखील पाणी सोडलं. 

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या त्यागाचा असाच एक किस्सा..

ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा सरदार पटेलांच वय फक्त 22 वर्ष होतं. सरदार पटेलांनी मॅट्रिकचं शिक्षण पुर्ण केलं होतं आणि एका वकिलाकडे ते सहाय्यक म्हणून काम करत. पण त्यांच स्वप्न मोठ्ठं होतं. एक दिवस इंग्लडला जावून बॅरिस्टर होवून यायचं हे त्यांच स्वप्न. हे स्वप्न पुर्ण करण्यासाठी त्या काळात आठ ते दहा हजार रुपयांची आवश्यकता होती. 

इतके पैसे जवळ असण्याचा प्रश्नच नव्हता. त्यासाठी पैसे साठवण्याची गरज होती. सरदार पटेल आणि त्यांच्या पत्नीने यातून मार्ग काढण्यासाठी बचत करण्याचा निर्णय घेतला. आपले स्वप्न पुर्ण करण्यासाठी त्यांनी चार वर्ष पै अन् पै साठवली. त्यातून आठ ते दहा हजार रुपये साठले. 

त्यानंतरची गोष्ट होती ती चांगल्या कॉलेजला प्रवेश. ते सोपस्कार देखील पुर्ण झाले आणि इंग्लडहून बॅरिस्टरसाठी प्रवेश मिळाल्याचं पत्र रवाना झालं. पण झालं अस की सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मोठ्या भावाचं नाव होतं विठ्ठल पटेल. दोघांच्याही नावाचे इनिशिएल व्हि.बी. पटेल असच येत असे. 

family image of Sardar Vallabhbhai Patel sardar patel family

सरदार पटेल यांचे मोठ्ठे भाऊ त्यावेळी वकिलचं शिक्षण पुर्ण केलेले होते. त्यांची आसपासच्या भागात चांगली ओळख झाली होती. पोस्टमनला VB पटेल हे नाव वाचून हे पत्र विठ्ठल पटेल यांचच असावं असा समज झाला. त्यामुळे पोस्टमन हे पत्र घेवून सरदार पटेलांच्या मोठ्या भावाकडे गेला. 

विठ्ठल पटेल यांच्या हाती पत्र पडताच त्यांनाही परदेशी जावून बॅरिस्टर होण्याचं स्वप्न पडू लागलं. नावात साधर्म्य असल्याने वल्लभभाई ज्या ऐवजी विठ्ठल पटेल जावू शकत होते. विठ्ठलभाई तडक वल्लभभाईंकडे गेले आणि ही संधी आपणाला मिळावी म्हणून विनंती करू लागले. माझं वकिलीचं शिक्षण पुर्ण झालं आहे, आत्ता बॅरिस्टर झाल्यास या गोष्टीचा आपणाला फायदा होईल. 

सरदार वल्लभभाई पटेल यांनी कोणत्याही गोष्टीचा विचार न करता मोठ्या मनाने ही संधी विठ्ठलभाईंना देवू केली. सोबत चार वर्षांपासून साठवत असणारे पैसे देखील त्यांना देवू केले. विठ्ठलभाई इंग्लडला रवाना झाले. 

पण सरदार पटेलांनी हार मानली नाही. त्यांनी पुन्हा पैसे साठवण्यास सुरवात केली. वयाच्या 36 व्या वर्षी त्यांना इंग्लडला जावून बॅरिस्टर होण्याची संधी मिळाली. एकूण 30 महिन्यांचा असणारा अभ्यासक्रम त्यांनी 24 महिन्यांमध्येच संपवला. तो देखील टॉपर होवून. त्यानंतर ते इंग्लडमधून बॅरिस्टर होवून परतले व देशकार्यात सामील झाले.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.