या राजाची समजूत पटेलांनी काढली नसती तर आजचा राजस्थान पाकिस्तानात गेला असता…

भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला यश आलं त्यानंतर देशाचे दोन तुकडे अर्थात फाळणी झाली. भारत पाकिस्तानमध्ये लोक विभागले गेले. अशाच प्रकारे काही राजवटीही विभागल्या गेल्या काही भारतात आल्या तर काही पाकिस्तानात गेल्या. अशा काळात राजकीय वर्चस्व असणाऱ्या राजांना भारतीय स्वातंत्र्य अधिनियम १९४७ च्या अनुसार पूर्ण स्वातंत्र्य होतं कि ते पाकिस्तानात जाऊ शकतात वा भारतात राहू शकतात.

याच कारण म्हणजे राजे लोकसुद्धा आपापल्या पद्धतीने राजवटी चालवू इच्छित होते. स्वातंत्र्याच्या काळात राजस्थानमध्ये २२ रियासती होत्या, त्यापैकी फक्त एक अजमेर हि इंग्रजांच्या ताब्यात होती. बाकी २१ रियासती या स्थानिक राजांजवळ होत्या. स्वातंत्र्यानंतर अजमेर रियासतसुद्धा भारतीय स्वातंत्र्य अधिनियमानुसार भारताच्या वाट्याला आली. 

यानंतर अनेक राजे महाराजांची इच्छा होती कि राज्यकारभार सांभाळण्याचा चांगला अनुभव आणि स्वातंत्र्य लढ्यातील आमचही योगदान आहे यामुळे आमच्या रियासतीलाही एक वेगळ्या आणि स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यात यावा. यामध्ये होती राजस्थानची जोधपूर रियासत. या रियासतीच्या राजाची इच्छा होती कि आपली राजवट हि पाकिस्तानात विलीन करण्यात यावी. याचे संदर्भ हे Larry Collins और Dominic Lapier चं पुस्तक Freedom At Midnight मध्ये. या पुस्तकात डिटेलमध्ये या घटनेचं वर्णन केलेलं आहे.

जोधपूरचे राजे होते हनवंत सिंग. ते आपली राजवट पाकिस्तानमध्ये विलीन करण्यावर गंभीरपणे विचार करत होते. या प्रकरणात त्यांनी मोहम्मद अली जिना सोबत बोलणी करून अनेक महत्वाच्या अटी ठेवल्या होत्या.

ज्यामध्ये बंदरगाहची सुविधा, रेल्वेचे अधिकार, शस्त्रांचं नियोजन, दुष्काळी भागात अन्नधान्याचा पुरवठा, जोधपूर रेल्वे लाईनचा पुढे कच्छ पर्यंत विस्तार अशा अनेक अटी होत्या. या सगळ्या अटी जिनाला मान्यसुद्धा होत्या.

यानंतर राजा हनवंत सिंगने उदयपूरच्या महाराजांसोबत पाकिस्तानमध्ये आपली राजवट विलीन करण्याचा प्रस्ताव मांडला तेव्हा उदयपूरच्या महाराजांनी हा प्रस्ताव धुडकावून लावत सांगितलं कि,

रियासत विलीन करायचीच असेल तर आम्ही पाकिस्तानात नाही तर आमच्या भारतात विलीन करू. सोबतच असंही सांगितलं कि एक हिंदू राजा हा आपल्या सगळ्या लोकांसोबत भारतात आनंदाने आणि सुखाने राहू शकतो.

उदयपूरच्या राजाच्या बोलण्याने हनवंत सिंग प्रभावित झाले आणि आपल्या निर्णयावर विचार करू लागले. १ ऑगस्ट १९४९ रोजी भारतीय संघाच्या विलय पत्रावर हस्ताक्षर करत हनवंत सिंग यांनी जोधपूर रियासत भारतात विलीन केली. राजा हनवंत सिंग यांच्या आपली राजवट पाकिस्तानात विलीन करण्याच्या निर्णयावर राजस्थानमध्ये वातावरण प्रचंड तापलं होतं.

अशा वेळी माउंटबेटनेसुद्धा हनवंत सिंग यांना समजावलं होतं कि धर्माच्या आधारे वाटलेल्या या देशांमध्ये तुमच्या एका निर्णयामुळे लोकांच्या सांप्रदायिक भावना दुखावल्या जाऊ शकतात त्यामुळे हा निर्णय रद्द करावा. यात सगळ्यात मोठी भूमिका बजावली ती सरदार वल्लभभाई पटेल यांनी. राजस्थान आज भारतात आहे याच सगळं श्रेय वल्लभभाई पटेल यांनाच जातं. 

सरदार वल्लभभाई पटेल मुळातच आक्रमक होते आणि त्यांची इच्छाच नव्हती कि राजस्थान पाकिस्तानात विलीन व्हावं. त्यामुळे त्यांनी राजस्थानच्या हनवंत सिंग यांच्या सगळ्या अटी मान्य केल्या होत्या ज्या पाकिस्ताननेही मान्य केल्या होत्या. पुढे वल्लभभाई पटेल यांनी सगळी ताकद वापरून राजस्थान भारतात ठेवण्यात यश मिळवलं.

इतकं सगळं असूनही मारवाडच्या काही राजांची इच्छा होती कि मारवाड हे भारतात विलीन न करता ते एक स्वतंत्र राष्ट्र असावं. पण हनवंत सिंग यांनी वेळीच आपली बुद्धी वापरली आणि पटेलांचं म्हणणं मान्य करून आपली रियासत भारतात विलीन केली.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.