सरफरोशला आज वीस वर्ष पुर्ण झाली.

सरफरोशला आज वीस वर्ष झाली. सरफोरश काही माइलस्टोन वगैरे नव्हता. म्हणजे त्या सिनेमावर नॉस्टॅलजिक व्हावं अस विशेष काहीच नव्हतं. 1999 ला रिलीज झाला त्या वर्षीचा ब्लॉकबस्टर सिनेमा होता हम साथ साथ हैं. ताल, वास्तव, हम दिल दे चुके सनम असले सिनेमे त्या वर्षात रिलीज झाले होते. सरफरोश तसा हिट होता. तसा तो अधला-मधला होता पण भारी होता. वाईट म्हणण्यासारखं काहीच नव्हतं आणि अतीच माईलस्टोन म्हणण्यासारखं देखील त्यात काहीच नव्हतं. पण वीस वर्षानंतर या पिक्चरकडे बघायचं झालं की काहीतरी वेगळचं दिसतं. 

सरफरोशचा सगळ्यात भारी माणूस कोण होता ? 

गुलफाम हसन, ACP अजय राठोड, मिर्ची सेठ, इन्पेक्टर सलीम अहं त्यातला सगळ्यात भारी माणूस होता जो खांद्यावर कलरफुल रुमाल टाकून फिरणारा फटका.

आसमॉन मैं ट्यानानावू. लाखों तारे ट्यानानावू करणारा फटका.

सब उतर गयीं करुन राजन लुख्खा ची माहिती देणारा फटका हा एका सिन मध्ये जान आणतो. खूप खूप वर्षानंतर लोकांना कळालं की या पिक्चरमध्ये नवाझुद्दिन देखील होता. शेजारच्या माणसावर गोळी झाडल्यानंतर आपली संपुर्ण फाटलेली अॅक्टिंग आज भारी वाटते. नवाझुद्दिनचा तो पहिला सिनेमा होता. 

तरिही विचार करायला लागतो की, सरफरोश मध्ये इतकं काय आहे. म्हणजे तो जाणूनबुजून बघावा अस वाटतं नाही पण टिव्हीवर लागलेला असला की सोडवत नाही. मित्राला फोन केला तेव्हा मित्र म्हणाला मला तर पहिल्यांदा कळाला IPS नावाची गोष्ट असते ती याच पिक्चरमुळं. होशं वालो कों खबर क्या म्हणून टोटल भारत पाकिस्तानच्या फाईटमध्ये रोमान्स देखील भरलेला हा पिक्चर होता. नंतर एकाने सर्वात भारी मुद्दा मांडला तो म्हणजे या पिक्चरमध्ये टिपीकल युद्ध नव्हतं. 

म्हणजे भारत पाकिस्तानवर पिक्चर असून देखील या पिक्चरमध्ये रणगाडा नव्हता हेच या पिक्चरचं वैशिष्ट. 

आपल्याकडे भारत पाकिस्तान युद्धावर पोत्याने सिनेमे आहेत. युद्ध सोडून असतील तर गदर आणि विरझारा सारखे पिक्चर देखील आहेत. पण सरफरोश या सगळ्यात वेगळा वाटतो. 

सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे या पिक्चरमध्ये टिपीकल युद्ध नव्हतं. पोलिस म्हणजे दबंग टाईपमध्ये असावा अस देखील काही नव्हतं. नव्याने नियुक्त झालेला IPS आणि क्राईम ब्रॅन्चमध्ये सिनियर असणारे टिपीकल पोलीस अधिकारी. नाही म्हणायला फिल्मी होतं ते अजय राठोडनं वडिलांच्या अपघातानंतर पोलीस होण्याचा घेतलेला निर्णय. पण तो देखील पिक्चरमध्ये ड्रामा म्हणून नाही तर सहज येवून जायचा. 

इथे इन्पेक्टर सलीम देखील होता जो अजय राठोडला सूनावतो की, 

दस नहीं साब दस हजार मिलैंगे अगर आप भरोसा करेंगे तो, 

फिर किसी सलीमसे मत कहैंना ऐ मुल्क उसका घर नहीं. 

आपणं मुळातच देशप्रेमी असतो. त्यातही पोलीस, सैन्य या ठिकाणी धर्मावरुन, जातीवरुन काही होत असेल असा विचार आपल्या मनाला देखील शिवत नाही. पण या सिनेमात देशासाठी झगडणारा सलीम बघितला की दुखत: नाही होत असतय अस म्हणून आपण ते मान्य करतो. अगदी ACP अजय राठोड सारखं. पण भारतीय असण्याची ओळख म्हणजे अविश्वास दाखवला म्हणून सलीम तुटत नसतो. देशद्रोही होत नसतो. असाच काहीसा गुलफाम हसन. पण गुलफामचे मार्ग वेगळे आहेत. भारत पाकिस्तानच्या लढाईत पाकिस्तानच्या बाजूने कोण आहेत तर पाकिस्तानी असून भारतीय ज्याच्यावर प्रेम करतात तो गुलफाम हसन. ज्याला आजही पाकिस्तानात मुहाजीर म्हणल्याचा राग आहे. तर भारताच्या मातीत राहून व्यापाराच्या नावाने द्रोह करणारा मिर्ची सेठ. 

विरोधात असणाऱ्या माणसांची मानसिकता दाखवण्याचा प्रयत्न केलेला हा पहिलाच पिक्चर असेल अस वाटतं. अगदी छोट्याशा पार्टीत गुलफाम हसन सारख्या कलाकाराला पाकिस्तानच्या अधिकाऱ्याकडून दिली जाणारी ट्रिटमेंट पाहिली की गुलफाम हसन हा असा का आहे ते कळतं. त्याला तो पाकिस्तानी असण्याच प्रुव्ह करायचं आहे पण होत नाही हे त्याचं दुख:  कुठेही अजय राठोड लार्जर दॅन लाईफ नाही, गुलफाम हसन म्हणजे काही रणगाडा घेवून भारतावार चाल करुन आलेला नाही. सिनेमातलं प्रेम पण कसं एका गाण्यात सुरू होतं आणि तिथेच संपून पुढं जातं. म्हणुच कमाईच्या बाततीत पण सिनेमा हिट पुरताच थांबला. 

लिहता लिहता एवढचं कळलं हा लेख पण काही अती वाईट आणि अती चांगला झाला नाही. सरफरोशवर असच अधलं मधलं लिहलं जावू शकतं. 

हे ही वाच भिडू. 

1 Comment
  1. Kunal More says

    खरच छान होता तो आता त्याचा रिमेक झाला पाहिजे

Leave A Reply

Your email address will not be published.