सरगम बँड पथक ज्यात बिहारच्या महिला वाजवितात वाद्य

लग्न समारंभात बॅंड वाजवितांना पुरुषचं असतात . मात्र संपूर्ण बॅंड पथक महिला वाजविताना कधी पाहिलं आहे का? बिहार मधील दानापूर येथील ढिबरा गावातील महिलांनी बॅंड पथक तयार केले आहे. या महिलांना बॅंड पथक सुरु करणे सोपे काम नव्हते. त्यांनी अनेक समस्यांना तोंड देऊन हे बॅंड पथक तयार केले आहे. पुरुषांना तोडीस तोड देऊ शकेल असं बॅंड पथक त्यांनी बनविले आहे.

बिहारकडे अजूनही मागास राज्य म्हणून पाहिले जाते. जरी एक महिला बिहारच्या मुख्यमंत्री ७ वर्ष राहिल्या तरीही महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन अजून बदलेला नाही. आजही अनेक क्षेत्र आहे जिथे पुरुषांची मक्तेदारी चालते. मात्र बिहार मधील महिलांनी याला फाटा देत बॅंड पथक तयार केले असून इतर राज्यातही त्यांचा बोलबाला आहे. 

समाजसेवा करणाऱ्या सुधा वर्गीज यांनी या महिलांना बॅंड पथक तयार करावे यासाठी पाठबळ दिले आहे. पद्मश्री सुधा वर्गीज यांना महिलांच्या या बॅंड पथकाला सरगम असे नाव दिले आहे. त्याचे कौशल्य पाहून आता त्यांना बिहार बरोबरच इतर राज्यात मागणी होत आहे. या महिलांनी दाखवून दिले की, एखादी गोष्ट ठरविले तर काय होऊ शकते.

सरगम बॅंड पथक

या महिलांना बॅंड  थकामुळे चांगली आर्थिक समृद्धी मिळाली आहे. या सर्व महिला दलित आहेत. मोलमजुरी करून या महिला कुटुंबांचा उदरनिर्वाह करत असत. घरची गरिबी यामुळे या महिल्या त्रस्त होत्या. तसेच मुलांना चांगले शिक्षण सुद्धा मिळत नव्हते.

आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी ढिबरा गावातील महिला प्रयत्नशील होत्या. जेव्हा पद्मश्री सुधा वर्गीज यांनी ढिबरा गावातील महिलांना ‘आत्मनिर्भर’ होण्यासाठी बॅंड पथक सुरु करण्याबाबत संकल्पना सुचविली होती. त्याला प्रचंड प्रमाणात विरोध झाला होता.

काही काळानंतर मात्र गावातील  १५ महिला बॅंड पथकात सामील होण्यासाठी तयार झाल्या. बॅंडचा सराव करतांना कुटुंबातील, गावातील लोकांनी प्रचंड विरोध केला. गावातील लोकांनी त्यांना अशा प्रकारे महिलांनी बॅंड पथक चालविणे रुचले नाही. मात्र महिलांनी यातून माघार घेतली नाही. मात्र कुटुंबातील सदस्यांचा वाढता त्रास पाहून यातील काही महिला कमी झाल्या.

मात्र शेवटी राहिल्या १० महिलांनी कुठल्याही परिस्थिती बॅंड पथका बनवायचे हा उद्देश ठेवला होता. या महिला मोठे-मोठे ढोल घेऊन वाजवत होत्या. त्यावेळी महिलांना अशा प्रकारे वाद्य झेपणार नाही म्हणून गावातील नागरिक त्यांची खिल्ली उडवत होते. मात्र त्या महिलांनी ठरविले होते काहीही करून महिला बॅंड पथक उभे करायचे. फक्त बिहारच नाही तर आजूबाजूंच्या राज्यात सरगम बॅंड पथकाचे नाव झाले आहे.

काही दिवसात त्यांनी सराव करून बॅंड पथक तयार केले. या बॅंड पथकाचे नेतृत्व सरिता देवी करत असून गावातील इतर ९ महिला त्यांना साथ देत आहे. बिहार बरोबर शेजारच्या राज्यात जाऊन त्या वादन करत आहेत. 

सरगम बॅंड पथकावर वूमनिया हा माहितीपट सुद्धा बनविण्यात आला आहे. २०१८ मध्ये कोण बनेगा करोडपतीच्या सेटवर सुद्धा सरगम बॅंड पथकातील सदस्यांना बोलाविण्यात आले होते.

पद्मश्री सुधा वर्गीज यांची संकल्पना

सुधा वर्गीज या मंगलोर येथे गेल्या असतांना बॅंड पथकात काही महिला वादन करतांना त्यांना दिसल्या. बिहार मध्ये काम करणाऱ्या सुधा वर्गीज यांना वाटले की, बिहार मधील महिलांना बॅंड पथकातून रोजगार मिळू शकतो. मग त्यांनी महिला बॅंड पथकासाठी दानापूर येथील ढिबरा गावाची निवड केली.

गावातील दलित महिलांना एकत्र करत त्यांना बिहार मधील पहिल्या महिल्या बॅंड पथकाची संकल्पना सांगितली. महिलांबरोबर सुधा वर्गीज यांना सुद्धा मोठ्या विरोधाचा सामना करावा लागला. मात्र त्यांनी काहीही करून महिला बॅंड पथक तयार करायचे ठरविलेच होते. सुरुवातीला या महिलांना केवळ ५०० रुपये दिवसाला देण्यात येत होते. आता त्यात वाढ करून दीड ते २ हजार देण्यात येत आहे.

आता सरगम बॅंड पथकाला  फक्त लग्न कार्यातच नाही तर राजकीय कार्यक्रमांमध्ये सुद्धा या महिलांना बोलाविण्यात येत आहे.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.