सातारची प्रियांका ठरली “मकालू सर करणारी पहिली भारतीय महिला.”

ती बंगलुरूमध्ये जॉब करते. ती साताऱ्याची आहे. जैवतंत्रज्ञान विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. हि झाली तिच्याबद्दल असणारी सहज साधी माहिती. म्हणजे कस हल्ली सर्वच मुलं शिकतात. आई वडिलांच्या अपेक्षापुर्ण करतात. IT च्या बॉक्समध्ये काम करुन पुन्हा रविवारची वाट बघत बसतात. तिच्याबद्दल वरची माहिती वाचली की तीच आयुष्यपण आपल्यापेक्षा काही वेगळ असेल अस वाटत नाही.

तसही प्रियांका मोहिते तुमच्यासमोर उभा राहिली तर तीने विशेष अस काही केलं असेल अस तुम्हाला वाटणार देखील नाही, त्याचं कारण पोरगीचे पायच जमिनीवरच आहेत. खरतर तिचे पाय जमिनीवर आहेत म्हणून तिची स्टोरी आपल्यापेक्षा काहीतरी वेगळी आहे.

नुकतेच तिने मकालू शिखर सर केले. मकालू सर करणारी ती पहिली भारतीय महिला गिर्हायरोहक ठरली आहे.

प्रियांकाचा जन्म सांगली जिल्ह्यातल्या विट्याचा. ती रहायला सातारची. अजिंक्यताऱ्याच्या पायथ्याला तिच घर आहे. थोडक्यात सांगायच झालं तर लहानपणापासून अजिंक्यतारा पालथा घातलच ती जगली आहे. शाळेत असताना ती आणि तिची भावंड रविवार उजाडला की अजिंक्यताऱ्यावर जायची. आज ती म्हणते,

“लहानपणीच कळालं होतं की खालून एखाद शिखर पाहण्यापेक्षा शिखरावरुन पाहणं हे वेगळं सुख असतं”.

तिच्या नशिबानं तिला हे सुख स्वराज्याच्या अंजिक्यताऱ्यावरुन कळाले. ती शाळेत गेली आणि तिला भटकायचा नाद लागला. शिवरायांच्या स्पर्शाने पावन झालेला सह्याद्री तीन शाळेच्या वयातच पालथे घालण्यास सुरवात केली. तीने सातारच्या लोकल ट्रेकर्ससोबत सह्याद्रीचे सुळखे सर करायला सुरवात केली. हळुहळु करत महाराष्ट्रातला एक अन् एक किल्ला सर केल्याचा किताब तिच्या नावावर जमा झाला. या किताबाचं नाव होतं “मावळा”.

ती सांगते,

“या प्रवासात छत्रपती शिवरायांचा मोठ्ठा प्रभाव आहे. आपण काहीतरी करु शकतो हे तिला अंजिक्यताऱ्यामुळे कळालं होतं.”

त्यानंतरच्या सह्राद्रीच्या प्रवासात तिला समजलं की आपण खूप काही करु शकतो. तिने साताऱ्यामध्येच पदवीला अॅडमिशन घेतलं. त्याच वेळी तिला हिमालय खुणावत होता. हिमालयात ट्रेकिंग करण्यासाठी एक बेसिक ट्रेकिंग कॅम्प असतो. तो तिने पुर्ण केला. पहिल्याच प्रयत्नात तिने सहा हजार फुटांची उंची सर केली होती. तिचा आत्मविश्वास वाढलां. अशाच एका कॅम्पनंतर तिला फोन आला. माउंट एव्हरेस्टसाठी जाणाऱ्या टिममध्ये एक जागा शिल्लक आहे अस तिला कळवण्यात आलं होतं. तिने येणार म्हणून निर्णय घेतला.

पाठीमागे न बघण्याची समज आत्तापर्यन्त तिला आलीच होती. ती टिममध्ये सहभागी झाली आणि एव्हरेस्ट सर केला. ते साल होतं २०१३ चं. महाराष्ट्राची दूसरी आणि भारताची तिसरी सर्वात तरुण महिला गिर्यारोहक म्हणून तिने नाव कमावलं होतं.

पण सह्याद्रीतून सुरू झालेला प्रवास फक्त एव्हरेस्ट पुरता मर्यादित राहणाऱ्यातला नव्हता. एव्हरेस्ट उतरत असतानाच तिला लोत्से खुणावत होता. तिच्या नजरेच्या टप्यात लोत्से होता. तिने एका अयशस्वी प्रयत्नानंतर हार न मानता लोत्से देखील सर केला.

सह्राद्रीमधले कलकराय, तैलाबैला, लिंगाणा सर केलेल्या या मुलीने एव्हरेस्ट, लोत्से, बंदरपुछ, बीसी रॉय, मेंथोसा आणि किलीमांजारो, मकालू सर केलेत. 

आत्ता ती बंगलोर येथे जॉब करते. कंपनी देखील तिच यश पाहून अगदी घरच्यासारखेच तिच्यामागे उभा आहे. आईवडिलांनी, काकांनी दाखवलेला विश्वास ती एक एक शिखर सर करुनच पुर्ण करत आहे. येणाऱ्या काळात तिने असच यश मिळवावं. “बोलभिडू” तर्फे तिला शुभेच्छा.

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.