एक अमेरिकन ज्याने भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला आणि भारताला सफरचंदाची शेती शिकवली.
अमेरिकेतल्या उच्चभ्रू कुटूंबात सॅम्युअल इवान्स स्टॉक्स ज्युनियरचा जन्म झाला. स्टॉक्स एंड पेरिश या प्रसिद्ध कंपनीचा तो उत्तराधिकारी होणार होता. १९०४ च्या दरम्यान सम्युअलने आपल्या वडिलांकडे भारतात जाण्यासाठी परवानगी मागितली. त्याच्या वडिलांना वाटलं की काही महिने भारत फिरून स्वारी पुन्हा अमेरिकेत येईल. पण तस झालं नाही.
सॅम्युअल भारतात आला. इथे येवून तो भारतातल्या कोडग्रस्त रुग्णांच्या आजारासाठी काम करू लागला. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाला. त्यासाठी तो जेलमध्ये देखील गेला. भारतीय शेतकऱ्यांना त्यांने सफरचंदाची शेती करायला शिकवलं. भारतात सफरचंद आणण्याचा मान त्यालाच देण्यात येतो. पुढे सॅम्युअलने हिंदू धर्म स्वीकारला. स्वत: नाव सत्यानंद केलं आणि कायमचा भारतीय झाला.
अमेरिकेच्या आपल्या मोठ्या संपत्तीवर लाथ मारून भारतात आलेल्या सॅम्युअलची ही गोष्ट
सॅम्युअल १९०४ साली भारतात आला. भारतभ्रमंती केल्यानंतर तो हिमालयात गेला आणि शिमल्याजवळच्या एका ठिकाणी कोड पिडीत लोकांसाठी काम करण्यास सुरवात केली.
त्याला भारतीयांसाठी काम करायचं होतं पण त्याच्या भावना उपकाराच्या नव्हत्या. भारतीय लोकांनी त्याला आपल्यातलं समजावं अशी त्याची इच्छा होती. पण त्यांच्या दिसण्यावरून लोक त्याला गोरा अधिकारी समजतं. त्याने भारतात आल्यानंतर पहिल्यांदा आपले कपडे बदललें. जैंसा देश वैसा भेस म्हणतं अस्सल भारतीय कपडे तो परिधान करू लागला.
लोकांमध्ये मिसळून जाण्यासाठी त्याने पहाडी शिकली. पहाडीमध्येच तो लोकांसोबत बोलू लागला. त्याच्या या कृतीमुळे एक चांगली गोष्ट झाली ती म्हणजे लोक त्याला आपल्यातला समजू लागले.
१९१२ साली सॅम्युअल एका रजपूत मुलीच्या प्रेमात पडला व तिच्याशीच त्याने लग्न केले. हिमाचलमधल्या मुलांना शिकवणं व कोड पिडीत व्यक्तिंची सेवा करण्यात तो मग्न होता. पण इथल्या लोकांना उत्पन्नाचा स्त्रोत मिळाल्याशिवाय ते मोठ्ठे होणार नाहीत याची जाणीव त्याला होती.
त्यानेच पहिल्यांदा भारतात सफरचंद आणले.
१९१६ साली इथल्या लोकांसाठी काय करता येईल याचा विचार करताना त्याला सफरचंदाच्या एका जातीविषयी समजलं. ही जात भारतासारख्या हवामानात येवू शकते का याचा पुरेपुर अभ्यास केला. त्यानेच भारतात सफरचंदाच्या झाडाची रोपे मागवून ती लावण्यास सुरवात केली. स्थानिक लोकांना एकत्र करत सफरचंदाची बाग लावण्यास प्रोत्साहन तर दिलच पण दिल्लीमध्ये संपर्क करून त्याने सफरचंदाच्या विक्रीसाठी मार्केट देखील मिळवून दिलं. त्यांच्या या प्रयत्नामुळे हिमालयात सफरचंदाची शेती केली जावू लागली.
आज भारतात सहज मिळणारे भारतीय सफरचंद पाहून कोणाला विश्वास बसणार नाही की यापाठीमागे सॅम्युअल अर्थान सत्यानंदचे प्रचंड कष्ट आहेत.
भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा हिरो सॅम्युअल अर्थात सत्यानंद.
ब्रिटीश व्यवस्था तो जवळून पाहत होता. विशेष म्हणजे तो एक अमेरिकन असल्याने ब्रिटीश इथे कोणत्याप्रकारचं शोषण करत आहेत याची संपुर्ण जाणीव त्याला होती. ब्रिटीश सरकार बळजबरीने सैन्यात सहभागी करुन घेत असे. सॅम्युअलने त्याविरोधात आवाज दिला. ब्रिटीश सत्ताधाऱ्यांना त्याने पत्र लिहली. या पत्रांमध्ये तो म्हणतो की, इथल्या तरुणांना तुम्ही बळजबरीने सैन्यात सहभागी करून घेवू शकत नाही. तुमच्या ब्रिटीश अधिकाऱ्यांचे सामान उचलण्याच काम तुम्ही आमच्या तरुणांना लावू शकत नाही. या पत्रात सॅम्युअलची भाषा आमची अशीच होती. तो भारतीय तरुणांना वेगळं अस मानत नव्हता.
तर तो स्वत:लाच एक भारतीय तरुण समजत होता.
एप्रिल १९१९ साली जानिवाल बाग हत्याकांड झाल्यानंतर सॅम्युअल प्रचंड अस्वस्थ झाला. त्यानंतर भारतीय स्वातंत्र्यासाठी त्याने संघर्ष उभा केला. त्याने कॉंग्रेसचे सदस्यद मिळवले. पंजाबच्या प्रांतिक कॉंग्रेस कमिटीचा तो सदस्य झाला. नागपूर येथे आयोजित कॉंग्रेस अधिवेशनसाठी तो शिमला हिल्सचा प्रतिनिधी म्हणून तो हजर होता. कॉंग्रेसच्या अधिवेशनासाठी उपस्थित राहून स्वातंत्रलढ्यात सहभागी होणार तो एकमेव गैर भारतीय होता. १९२१ साली त्याने एडवर्ड VIII प्रिन्स ऑफ वेल्सच्या भारत यात्रेला विरोध केला. या विरोधामुळे वाघा येथे त्याला अटक करण्यात आली.
भारतीय स्वातंत्र्यासाठी तो सहा महिने कैदेत राहिला.
त्यानंतर सॅम्युअलने हिंदू धर्म स्वीकारला. सॅम्युअल आत्ता सत्यानंद म्हणून ओळखला जावू लागला. आपल्या मुलांना अॅग्लो इंडियन अशी ओळख मिळू नये म्हणून तो काळजी घेत होता. मुलांना त्याने हिंदू धर्माचे आचार विचार शिकवले. भारतासाठी योगदान देणाऱ्या सत्यानंदचे निधन १४ मे १९४६ रोजी कोटघर शिमला येथे झाले.
त्याच्या पश्चाच भारतीय होण्याचा त्याचा इतिहास देखील विस्मृतीत गेला. आजही त्यांचा मुलगा विजयस्टोक शिमला येथे राहतात. त्यांची पणती आशा शर्मा यांनी गांधी कें भारत मे अमेरिकी नावाने त्यांचे चरित्र जगासमोर आणले.
हे ही वाच भिडू.
- म्यानमारच्या राजाचे वंशज चंद्रकांत पवार रत्नागिरीमध्ये गाड्या सर्व्हिसिंग करतात.
- मुस्लीम सुफी संताच्या भूमीने दिलाय पाकिस्तानी हिंदूंना सहारा !!
- कोण होता फिरोजशहा कोटला ज्याच नाव बदलून स्टेडियमला अरुण जेटलींच नाव देण्यात आलंय?