संघाच्या आणि अंबानींच्या फाइल्स मंजूर करण्यासाठी राज्यपालांना ३०० कोटींची ऑफर होती ?
मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुन्हा एकदा भाजपवर मोठा बॉम्ब टाकला आहे.
राजस्थानच्या झुंझुनू येथे एका कार्यक्रमाला संबोधित करताना मलिक म्हणाले, “मला काहीही बोलायची भीती नाही म्हणूनच उघड- उघड बोलतो. जर मी कसल्याही प्रकारचा भ्रष्टाचार केला असता तर मला असं उघड उघड बोलता आलं नसतं”. बरं ते एवढेच बोलून थांबले नाहीत तर, जम्मू -काश्मीरमध्ये असतांना अंबानींच्या दोन फायली त्यांच्याकडे आल्या होत्या आणि प्रत्येक फाईलवर १५० कोटींची ऑफर देण्यात आली पण त्यांनी या दोन्ही फाईल्स नाकारल्या.
सत्यपाल मलिक यांना ‘अंबानी’, ‘आरएसएस व्यक्ती’ ची फाइल मंजूर करण्यासाठी ३०० कोटींची लाच देण्यात आली होती असं त्यांच्या वक्तव्यामुळे सगळीकडे खळबळ माजली आहे.
सत्यपाल यांनी अंबानींवर आरोप केले.
सत्यपाल म्हणाले, “मी काश्मीरला गेल्यावर लगेचच दोन फायली समोर आल्या. एकामध्ये अंबानी आणि दुसऱ्यामध्ये संघाचे वरिष्ठ अधिकारी इन्व्हॉल होते. एक तर मेहबूबा यांच्या मंत्रालयाच्या जवळचा मंत्री होता. जो पंतप्रधानांच्या अगदी जवळ होता. मला कळले की दोन्ही फाईलीमध्ये मोठी गडबड आहे. म्हणून मी दोन्ही फाईल्स रद्द केल्या. मला सांगितले गेले की, मी जर ह्या फाईल मंजूर केल्या तर मला प्रत्येक फाईलसाठी १५० कोटी रुपये मिळतील, परंतु मी त्या फाईल नामंजूर केल्या”.
सत्यपाल मलिक यांनी असंही वक्तव्य केलं कि, ‘जेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या, तेव्हा व्ही.पी सिंग यांनी मला बाजूला घेऊन गेले आणि म्हणाले कि, सत्यपाल तुम्ही काळजीपूर्वक काम करत राहा. अप्रामाणिकपणा किंव्हा भ्रष्टाचार केला तर पंतप्रधानांशी लढता येत नाही. आपल्या दोघांनाही पंतप्रधानांशी लढावे लागणार आहे, म्हणून स्वच्छ राहा”.
सत्यपाल मलिक यांनी शेतकरी आंदोलनाच्या बाबतीतची भूमिका देखील मांडली. केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. विरोध सुरू राहिल्यास आपण आपल्या पदाचा राजीनामा देऊन शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहण्यास तयार आहोत. असंही त्यांनी जाहीर केलं आहे.
मलिक सध्या मेघालयचे राज्यपाल आहेत.
मलिक यांनी केंद्र सरकारला शेतकऱ्यांशी संवाद करण्याची शिफारस केली होती. ते म्हणाले, “जेव्हा मी काश्मीरमधून परतलो, तेव्हा मी शेतकऱ्यांसाठी बेधडक बोललो … जर मी काश्मीरमध्ये काही केले असते तर ईडी माझ्या घरी पोहोचली असती. इनकम टॅक्स वाले देखील माझ्या घरी आले असते. आज मी छातीठोकपणे सांगतो की पंतप्रधानांकडे सर्व संस्था आणि यंत्रणा आहेत. माझ्या कितीही तपासण्या करा, माझ्याकडे काहीही सापडणार नाही. मी असाच बेधडक राहणार आणि वागणार”.
मात्र मलिक यांनी ‘या’ दोन फायलींचा तपशीलवार खुलासा केला नाही, परंतु ते या फायलींबाबत बोलतांना सरकारी कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक आणि मान्यताप्राप्त पत्रकारांसाठीच्या सामूहिक आरोग्य विमा पॉलिसी योजनेच्या अंमलबजावणीशी संबंधित असलेल्या फाईल असा वारंवार स्पष्टपणे उल्लेख करत होते. ह्या फाईल्स म्हणजेच अनिल अंबानी यांच्या नेतृत्वात असणारे रिलायन्स ग्रुप होय. कारण याच रिलायन्स ग्रुप जनरल इन्शुरन्स सोबत सरकारने रिलायन्स करार केला आहे.
हे हि वाच भिडू :
- जेलमध्ये बसून कांड करणाऱ्यामुळे जॅकलिन आणि नोरा अडचणीत आल्यात, ईडी चौकशी चालू झालीय.
- काँग्रेसच्या काळात ईडी इन्कमटॅक्स मागे लागली होती, आता त्याच संस्थेला टॅक्समध्ये सूट मिळालीय.
- भाजपला देणगी देणाऱ्यांवर ईडी कृपादृष्टी दाखवते हा शुद्ध गैरसमज आहे