दादाच्या एका वाक्याने नासिर हुसेनला कॉमेंट्री करताना रडायच्या घाईला आणलं..

क्रिकेटची कॉमेंट्री आणि त्यावेळी चर्चिले जाणारे किस्से आपल्याला काही नवीन नाही. कॉमेंट्री करणारे अनेक कॉमेंटेटर आपल्याला जवळपास माहिती झाले आहेत, नुसत्या आवाजवरून आपण त्या क्रिकेट कॉमेंटेटरचं नाव सांगू शकतो. रवी शास्त्री, आकाश चोप्रा, वीरेंद्र सेहवाग, डॅनी मॉरिसन, शोएब अखतर असे अनेक प्रसिद्ध क्रिकेट कमेंटेटर आहे. सौरव गांगुली आणि नासिर हुसेन हे दोघेही जगप्रसिद्ध कॉमेंटेटर आहे. त्यांच्याबद्दलचा आजचा किस्सा.

सौरव गांगुली अर्थात दादा, तो दादासारखाच खेळायचा आणि मैदानावर वाघासारखाच वावरायचा. त्याची आक्रमक शैली पाहून भले भले त्याच्या नादी लागत नसे. आपल्या कर्णधारपदाच्या जोरावर दादाने भरताना अनेक सामने जिंकून दिले. भविष्यातील भारतीय क्रिकेटची घडी दादाने नवीन खेळाडू शोधून तेव्हाच बसवली होती.

नासिर हुसेन हा इंग्लंडचा कर्णधार होता. मूळचा भारतीय असलेला नासिर हुसेन पुढे इंग्लंडकडून खेळू लागला होता. सौरव गांगुली कर्णधार पदावर विराजमान होण्याआधी नासिर हुसेन भारतीय संघाला कायम टीका करून हैराण करायचा. त्याला एकदा सुनील गावस्करांनी फटकारलं देखील होतं.

सौरव गांगुली आणि नासिर हुसेन ज्या ज्या वेळी सामन्यानिमित्त समोरासमोर यायचे त्यावेळी नासिर हुसेन सौरव गांगुलीला कायम कमी लेखायचा. त्याची चेष्टा करायचा. या ना त्या कारणाने तो भारतीय क्रिकेटवर कायम आपलं मत व्यक्त करत असायचा.

पुढे क्रिकेटमधून संन्यास घेतल्यावर नासिर हुसैन क्रिकेट कॉमेंट्रीकडे वळला होता. सौरव गांगुली सुद्धा क्रिकेट कॉमेंट्री करत होता. आपल्या देशाचं कर्णधारपद भूषवलेले हे दोघे दिग्गज खेळाडू होते. ज्यावेळी एकदा ऑन एअर असताना सौरव गॅन्गली आणि नासिर हुसेन एकाच वेळी कॉमेन्ट्रीला आले त्यावेळचा हा किस्सा .

सौरव गांगुली आणि नासिर हुसेन एकत्र आले आणि नासिर हुसैनला चेष्टा आणि भारताला कमी लेखायची जी सवय होती ती त्याने बोलून दाखवायला सुरवात केली. त्यावेळी क्रिकेटवर न बोलता नासिर हुसेन भारताच्या फुटबॉल टीमवर बोलला.

फिफा विश्वचषकात भारतीय फुटबॉल टीमच्या संभाव्य स्थितीची नासिर हुसेनने चेष्टा केली त्यावेळी सौरव गांगुलीने त्याला दिलेलं प्रत्युत्तर इतकं खोचक होतं कि परत नासिर हुसेनने भारतीय संघावर टीका करण्याचं धाडस दाखवलं नाही.

नासिर हुसेनने चेष्टेत दादाला विचारलं कि,

फिफा वर्ल्डकपमध्ये भारताला खेळताना मी कधी बघू शकतो ?

भारत बराच काळ फिफा वर्ल्डकप खेळण्याच्या प्रयत्नात आहे, अनेक वर्षे प्रयत्न करूनही त्यात आपल्याला यश आलेले नाही. एका अर्थी हा सौरव गांगुली आणि भारतीय संघाला मारलेला टोमणा होता.

यावर सौरव गांगुलीने शांतपणे उत्तर दिल कि,

गेल्या पन्नास वर्षात इंग्लंड प्रमाणे भारतीय टीम देखील फुटबॉल विश्वचषकात सातत्याने सहभागी होत असती तर किमान एकदा तरी वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यासाठी भारत पात्र ठरला असता.

या थेट प्रत्युत्तराने नासिर हुसेन गप्पच बसला. दादाचा थेट बोलण्याचा स्वभाव नासिर हुसेनला चांगलाच भावला. मैदानावर नासिर हुसेनला दादा आपल्या खेळणे जसा गप्प करायचा अगदी त्याच प्रमाणे नुसत्या बोलण्याने सौरव गांगुलीने नासिर हुसेनला गपगार केलं होतं.

 जागतिक क्षेत्रात भारताचं फुटबॉल संघाचं भविष्य जरी धुरकट असलं तरी सौरव गांगुली ऍटलेटिको डी कोलकाताचा मालक असून क्रिकेटप्रमाणे फुटबॉलशीसुद्धा एकनिष्ठ आहे.

अनेक लोकांनी सौरव गांगुलीला चिडवण्याचा प्रयत्न किल्ला पण दादा सगळ्यांना इतकं थेट उत्तर द्यायचा कि समोरच्याची बोलती बंद. मैदानावर असलेली कट्टर खुन्नस नासिर हुसेनला अशा प्रकारे परतफेड म्हणून मिळेल असा विचारही त्याने केला नव्हता.

सौरव गांगुलीचे कॉमेंट्री करताना बरेचसे विधानं चांगलीच गाजतात, एकदा धोनीने मैदानात लावलेली फिल्डिंग बघून गांगुली म्हणाला होता धोनी रिटायर झाल्यावर मी त्याच्या फिल्ड प्लेसमेंटवर एक पुस्तक लिहिणार आहे. 

जेफ्री बॉयकॉट सोबत एकदा गांगुली कॉमेंट्री करत असताना जेफ्री बॉयकॉट म्हणाला कि लॉर्ड्स हे क्रिकेटचं मक्का आहे. त्यावर गांगुलीने दिलेलं उत्तर मात्र दमदार होतं कि, ते फक्त इथंच  कारण भारतीय क्रिकेटचं मक्का हे मुंबईचं वानखेडे स्टेडियम आहे. 

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.