लता मंगेशकर गायन सोडून राजकारणात निघाल्या होत्या. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रोखलं…

संपूर्ण भारताचा एकच आवाज कोणता असं विचारलं  उत्तर मिळेल. लता मंगेशकर.

असं म्हणतात की लता मंगेशकर ही एक चमत्कार आहे. सुरांच्या दुनियेतील चमत्कार. त्यांच्या सारखं दुसर कोणी झालच नाही. त्यांच्या स्वभावात गुणदोष असतील, कोणाशी त्यांचे वाद असतील पण त्यांचे शत्रू देखील मान्य करतील की लता मंगेशकर यांनी भारताच्या संगीतक्षेत्रावर राज्य केलं. साधसुध नाही  जवळपास पंचाहत्तर वर्ष त्या साम्राज्ञी म्हणून वावरल्या. आजही त्याचं ते स्थान कोणी हलवू शकलेल नाही.

खूप लहान वयात असताना त्यांना हे यश मिळालं. वडिलांच्या मृत्यूनंतर कुटुंबप्रमुखाची जागा घेऊन त्यांनी घर संभाळल. आपल्या चारही भावंडांची काळजी घेतली. त्यांना आपल्या पावलावर उभ केलं. हे करताना त्यांना स्वतःसाठी कधी वेळच देता आला नाही. प्रत्येकवेळी कुटुंबियांना महत्व दिल. यातूनच त्यांनी कधी लग्न केलं नाही. 

लता मंगेशकर यांचे वडील दीनानाथ मंगेशकर हे देखील सुप्रसिद्ध गायक होते. संगीत रंगभूमीच्या सुवर्ण युगाचा एक प्रतिभावंत शिल्पकार. एका अनुपम मोहक अशा रससशीत गानशैलीचा कल्पक उद्‍गाता. प्रथम श्रेणीच्या मोजक्या गायकनटांपैकी एक अतुलनीय तेजस्वी व मनस्वी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांना ओळखलं जायचं.

कलाकार म्हणूनच नाही तर एक प्रखर देशभक्त म्हणून ते विख्यात होते. विशेषतः स्वातंत्र्यवीर सावरकरांशी त्यांचे मैत्रीचे संबंध होते. स्वातंत्र्यलढा, समाजसुधारणांचा हा काळ होता. लता मंगेशकर सांगतात त्यांच्या लहानपणी सांगलीच्या घरी सावरकरांच येणंजाणं असायचं. एकदा सांगलीमध्ये हरिजन भोजनाच्या कार्यक्रमासाठी सावरकर आणि दीनानाथ मंगेशकर यांच्या सोबत आपण गेलेलं आठवत असल्याचं लता मंगेशकर सांगतात.

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिनानाथ मंगेशकर यांच्यासाठी संन्यस्त खड्ग या नावाचे एक नाटक लिहिले होते. या नाटकाचा पहिला प्रयोग १८ सप्टेंबर १९३१ रोजी सादर करण्यात आला होता.

पुढे दीनानाथ मंगेशकर यांचा पडता काळ सुरु झाला. त्यांनी सुरु केलेली चित्रपट संस्था बुडाली, नाटक कंपनीला देखील अपयश येऊ लागले. व्यसनाधीनता, कर्जबाजारी पणा यातून त्यांचे संसारातून लक्ष उडत गेले. अखेरीस २४ एप्रिल १९४२ रोजी दीनानाथ मंगेशकरांच निधन झालं.

दीनानाथ मंगेशकर यांच्या अकाली मृत्यूनंतर संपूर्ण घराची जबाबदारी अवघ्या १३ वर्षांच्या लता मंगेशकर वर येऊन पडली. लता मंगेशकर सांगतात त्यांच्या वडिलांनी मृत्यूपूर्वी एकच सांगितलं होतं,

 “तुझ्यासाठी मी कोणतीही संपत्ती ठेवणार नाही; पण हा तानपुरा आणि ही बंदिशींची वही तुझ्यासाठी ठेवली आहे. तीवर कधीही धूळ बसू देऊ नकोस.”

लता मंगेशकर या शब्दांना जागल्या. त्यांनी दीनानाथांची गायकी पुढे नेली. सिनेमात गाणी गाण्यास सुरवात केली. कमी वयात त्यांना यश देखील मिळाले. लता मं सुप्रसिद्ध कवी साहित्यिक यतींद्र मिश्र यांनी लता मंगेशकर यांचे लता सुर-गाथा नावाचे चरित्र लिगेशकर यांचं नाव देशभरात गाजू लागलं.

 सुप्रसिद्ध कवी साहित्यिक यतींद्र मिश्र यांनी लता मंगेशकर यांचे लता सुर-गाथा नावाचे चरित्र लिहिले आहे. त्यात ते सांगतात,

दीनानाथ मंगेशकर यांच्या निधनानंतर देखील मंगेशकर कुटुंबाचा सावरकरांशी घरोबा कायम राहिला. लता मंगेशकर यांना लहानपणापासून लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, शहिद भगत सिंग अशा स्वातंत्र्यसैनिकांचे प्रचंड आकर्षण राहिले होते. वडिलांप्रमाणे समाजकार्याची देखील त्यांना आवड होती. यातूनच समाजसेवेबरोबर राजनीतीमध्ये जावे असं त्यांच्या मनात येऊ लागलं.

एकदा त्यांनी हा विचार स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कानावर घातला. तेव्हा ते म्हणाले,

आपण एका अशा पित्याच्या कन्या आहात ज्यांचे नाव शास्त्रीय संगीत आणि कलेमध्ये शीर्षस्थानी चमकत आहे. जर तुम्हाला देशाची सेवा करायची असेल तर ती संगीताच्या माध्यमातून समाजाची सेवा करताना करता येते. त्यामुळे राजकारणात जाण्याचा विचार सोडा.

यतींद्र मिश्र सांगतात,

येथूनच लता मंगेशकरांचे मनही बदलले, सावरकरांनीच त्यांना संगीताची तयारी करायला लावली. एक प्रकारे, आपण भारतीयांनी सावरकरांचे ऋणी असले पाहिजे की जर त्यांनी त्या दिवशी लता मंगेशकरांना राजकारणात जाण्यापासून रोखले नसते तर या महान गायिकेला सगळं देश मुकला असता.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.