या सावित्री देवी हिटलरला देव मानायच्या, प्रेमापोटी नाझी जर्मनीसाठी गुप्तहेर देखील बनल्या ….

जर्मनी म्हटल्यावर आपसूकच हिटलरचं नाव पुढे येतं. त्याने घडवून आणलेला नरसंहार सगळ्याला जगाला हादरवून गेला होता. पण एक अशी महिला होती जी हिटलरला देव मानायची आणि त्याच्या विचाराने ती प्रभावित झाली होती. त्या महिलेबद्दल आपण जाणून घेऊया.

सावित्री देवी या एक नाझी महिला हेर होत्या. नाझी हेर असूनही त्या भारतात इंग्रजांची हेरगिरी करायच्या. यासोबतच नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जपानी लोकांसोबत भेट घालून देण्यास सावित्री देवी यांची महत्वाची भूमिका होती. इथूनच खरी आजाद हिंद सेना बनायची सुरवात झाली होती. पण सावित्री देवी या काही भारतीय नव्हत्या तर त्या एक फ्रेंच हिंदू महिला होत्या.

सावित्री देवी 30 सप्टेंबर 1905 रोजी फ्रान्सच्या लियॉन शहरात जन्मल्या. त्यांचं खरं नाव मॅक्सीम्यानी जुलिया पोर्टस होतं. त्यांची आई ब्रिटिश होती तर वडील हे ग्रीक इटालवी होते. सावित्री देवी यांच्याबद्दल असं सांगण्यात येतं की त्या हिटलरला सर्वस्व मानत असत. हिटलर वर त्यांचं नितांत प्रेम होतं आणि तितकंच त्या जनावरांवर सुद्धा प्रेम करायच्या. त्या कायम जनावरांवर होणाऱ्या अत्याचारांबद्दल आवाज उठवायच्या.

1958 साली सावित्री देवी यांचं पुस्तक द लायटनिंग एन्ड द सन मध्ये लिहिलेल्या लेखनात त्या हिटलरवर प्रेम करत होत्या आणि हिटलर त्यांना देवापेक्षा कमी नव्हता. त्यांनी असं लिहिलेलं होतं की त्या हिटलरला विष्णूचा अवतार मानतात आणि त्यांना वाटतं की हिटलरचा जन्म हा कलियुग संपवण्यासाठी झाला आहे. हे पुस्तक भरपूर काँट्रॅव्हर्सिमध्ये अडकलेलं होतं.

जिथं एका बाजूला फ्रान्सच्या ज्यू लोकांना मारणारा आणि द्वितीय महायुद्धात फ्रांस सरकारला गुढगे टेकवायला लावणारा हिटलर लोकांमध्ये अप्रिय होत होता तर एका बाजूला सावित्री देवी त्याच्या विचारधारेने प्रभावित होत होत्या. सावित्री देवी यांना आर्य संस्कृती विषयी जिव्हाळा होता म्हणून त्यांनी पुढे हिंदू धर्म स्वीकारला आणि स्वतःच नाव सावित्री देवी ठेवून घेतलं.

सावित्री देवी यांनी केमिस्ट्रीत मास्टर्स आणि फिलॉसॉफी मध्ये पीएचडी करून पुढे त्या अध्यात्माकडे वळल्या. यामध्ये त्या ग्रीसमध्ये गेल्या आणि तिथे त्यांना स्वस्तिकचं चिन्ह दिसलं. तेव्हा त्यांना जाणवलं की ग्रीसमध्येसुद्धा आर्य राहत होते म्हणून त्यांचे विचार बदलले आणि त्या आर्य लोकांकडे आकर्षित झाल्या. यानंतर त्यांनी ग्रीसच नागरिकत्व स्वीकारलं आणि 1929 मध्ये त्यांनी स्वतःला नाझी घोषित केलं. हिटलरचं काम हे आर्य वंश वाचवण्याचं आहे म्हणून त्या हिटलरला सपोर्ट करत होत्या.,

1945 साली हिटलरच्या आत्महत्येने सावित्री देवी हादरून गेल्या. त्यांनी लिहिलं की आमच्या वेळचे देवरूपी, वेळेच्या विरुद्ध चालणारे, सगळ्यात महान युरोपियन, सूर्याचं तेज आणि विजेची चमक असलेल्या हिटलरला कधीही न संपणारी प्रेमपूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली.,

1948 साली नाझीचे पत्रक वाटण्यावरून सावित्री देवींना अटक करण्यात आली आणि 2 वर्ष त्या जेलमध्ये होत्या. 1971 साली त्या दिल्लीत आल्या आणि तिथंच राहू लागल्या. 1981 ला त्या पुन्हा इंग्लंडला गेल्या आणि 1982 साली त्यांचं निधन झालं.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.