युपीची सावित्रीबाई फुले

सावित्रीबाई फुले नाव ऐकले की आपल्या समोर चित्र उभे राहते ते आपल्या सावित्रीबाई फुलेंचे. नऊवारी साडी डोक्यावर पदर असलेली.स्त्री  शिक्षणाच्या जनक असलेली.

नंतर उत्तर प्रदेशमधून एक सावित्रीबाई फुले नावाच्या भगव्या कपड्यामधील सावित्रीबाई फुले माध्यमांमध्ये दिसयला लागल्या. त्यांना बघताच ही आधुनिक सावित्रीबाई भगवे कपडे घालून धर्माच्या कळपात स्वतःला वाहून घेतलेली एक स्त्री असेल असाच विचार मनात आला.

ही सावित्रीबाई फुले चर्चेत आली भाजपा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्या नंतर राजीनामा देतांनाच तिने सांगितलेली कारणे बंडखोर होती.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नंतर ही सावित्रीबाई कोण? हा प्रश्न स्वस्थ बसू देत नव्हता.

भारतीय जनता पक्ष मी केवळ दलित असल्यामुळे मला संसदेत बोलू दिले जात नाही.असे कारण देत तिने राजीनामा दिला. भाजपाला मनुस्मृतीनुसार देश चालवायचा आहे असा घणाघाती आरोप खासदार सावित्रीबाई फुलेंनी केला.

स्वातंत्र्याच्या गप्पा करतांना आजही ग्रामीण भागात य सर्व गोष्टींचा गंध नसलेल्या स्त्रिया बघायला मिळतात.त्यातही जर उत्तर प्रदेश सारखी राज्य असतील तर महिला शोषण,जातीयवाद धर्म यांना प्रचंड वाव. श्या राज्यातून आलेली  देशातील सर्वात कमी वय असलेली खासदार  सावित्रीबाई फुले ही आधीची कोण होती?

भगवा अंगावर चढवून भगव्याच्या विरोधात बंड करणाऱ्या सावित्रीचा नेमका उर्जास्त्रोत आहे तरी कोणता?

1 जून १९८१ला उत्तर प्रदेशच्या बहाराईच जिल्ह्यातील निलकोठी गावात सावित्रीबाई फुलेचा जन्म झाला.हलाखीच्या परिस्थिती असलेल्या घरात जन्मलेली धनदेही पुढे चालून सावित्रीबाई फुले नावाने देशभर ओळखली  जाईल हा विचार तरी तिच्याशी जुडलेल्या कुणी केला असेल का?

मुलगी म्हणून जन्माला आली बघताच तिच्या आजोबांनी सावित्रीबाईचे नाव धनदेही ठेवले होते.धनदेही या शब्दाचा अर्थ होतो घरातून धन घेऊन जाणारी. नंतर तिच्या वडिलांनी धनदेहीचे नाव सावित्रीदेवी केले.

ग्रामीण भागात दलित कुटुंबात जन्मलेली मुलगी शाळा शिकतेय बघून लोक तिच्यावर हसत होती. शिकून खूप मोठी होणार आहेस का विचारात शिव्या द्यायची. या सावित्रीवरही शेण/माती फेकण्याचा प्रयोग झाला. तीचा वयाच्या सहाव्या वर्षी बालविवाह करून देण्यात आला.

मात्र सावित्रीबाईने तिचे शिक्षण सुरूच ठेवले. विनाचप्पल शाळेत जाणारी सावित्री लोकांच्या चेष्टेचा विषय ठरत होती.

सहावीत असताना तिला सरकारकडून ४८०रुपये शिष्यवृत्ती जाहीर झाली .

तिला ती रक्कम शिक्षकांनी न दिल्यामुळे सावित्री आपल्या हक्कासाठी भांडायला लागली.सहावीच्या वयातच सावित्रीला न्याय-हक्क यासाठी भांडावे लागले.यामुळे शिक्षकांनी सहावितून तिचे नाव काढून टाकले. त्या सावित्रीचा आणि या सावित्रीचा हा गुण ठळक दिसून येतो. दोघींचाही संघर्ष शिक्षण व हक्क,समानता यावरच आधारित होता.

तीन वर्ष सावित्रीबाई शाळा न शिकता आई-वडीलासोबत शेतात राबायला लागली. शेतात राबताना तिने शिक्षणाची कास सोडली नाही.

तिच्याच गावचे अक्षरवरनाथ कनोजिया सावित्रीदेवीचा संघर्ष पाहत होते. कनोजिया बहुजन समाज पक्षाचे कार्यकर्ते होते.

सावित्रीची शिक्षणाची इच्छा व गावातील जातीयवादी मानसिकतेमुळे सुटलेले शिक्षण बघून कनोजिया यांनी तिला मायावती समोर जनपथ दरबारात उभे केले. तेव्हा मायावती मुख्यमंत्री होत्या. सावित्रीदेवीचे सर्व म्हणणे एकूण घेत त्यांनी तिचा एका फोनवर राम मनोहर लोहीया या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला . सावित्रीबाईला तेव्हाच या स्वाभिमानाने , हक्काने जगायचे असेल तर पॉवर हातात पाहिजे हे कळून चुकले.

नेता बनण्याचा गुण तर तिच्यातील चौदाव्या वर्षीच दिसून आला होता.वयाच्या चौदाव्या वर्षीच मायावती समोर संविधान आणि न्याय हक्क यावर जोरदार भाषण करणाऱ्या सावित्रीबाईने मायावातीवर आपला प्रभाव पाडला होता.

याच लहान वयात सावित्रीबाई एका आंदोलनात सामील झाली. या आंदोलनात पोलिसांच्या गोळीबारात जखमी होत पहिल्यांदा जेलमध्ये गेल्या. आणि १२ डिसेंबर १९९५लाच जेलमधून  त्यांनी समाज कार्यासाठी पूर्णपणे वाहून घ्यायचं असा निश्चय केला.

सावित्रीचा लहानपणीच विवाह झाला होता मात्र तिने संसारबंधनात अडकण्यास नकार दिला. आपल्या जागी आपल्या लहानबहिणीचे त्याच मुलाशी लग्न लावून द्यावे यासाठी घरच्यांना राजी केलं.

कनोजियांच्या मते हि मुलगी अगदी सावित्रीबाई फुलेंच्या विचारावर चालणारी असल्यामुळे तिच्या वडिलांनी ठेवलेल्या सावित्रीदेवी नावापुढे फुले लावून तिला सावित्रीबाई फुले बनवलं.

कनोजिया यांनी बसपाकडून जिल्हा परिषद लढवायला तिकीट मागितले.

तिकीट देण्यास बसपा मधून विरोध झाला. विरोधाला न जुमानता १९९६रोजी अपक्ष लढून सावित्रीबाई फुले बहुमताने विजयी झाल्या. बसपा विरोधात वातावरण तयार होत होते. याचा राग म्हणून १९९८मध्ये बसपा पार्टीने कनोजिया व सावित्रीबाई फुले यांना पार्टीमधून बरखास्त करून टाकले.

दोन वर्षाचा काळ जाताच.सावित्रीबाईने भाजपात प्रवेश केला.

भाजपकडून २००२ व २००७मध्ये आमदारकीची निवडणूक लढल्या तेव्हा पराभवला सामोर जावं लागलं.पण नंतर २०१२च्या निवडणुकीत भाजपाकडून पहिल्यांदा त्या आमदार म्हणून निवडून आल्या.

नंतर मोदीलाटेत त्या खासदार म्हणून संसदेत विराजमान झाल्या.भारतातील मोदी सरकारमधील सर्वात कमी वयाची ही खासदार बहराइच मतदार संघातून निवडून आली.नेपाळच्या सीमेला लागून असलेल्या या जिल्ह्यातील खासदार संसदेत आपले पहिले भाषण करतांना,

मी माझं हे यश कार्य इथे जन्मलेल्या व न्याय,समता,बंधुता यावर काम केलेल्या सर्व महापुरुषांना अर्पण करते म्हणत सुरु झालं होते.

सावित्रीचा भगवा:

गौतम बुद्धाची अनुयायी मानत असलेल्या व स्त्रीयासाठी अहोरात्र झटत असलेली सावित्रीदेवी. ती घालत असलेली भगवे कपडे ही गौतम बुद्धाची देन आहे म्हणत हा रंग त्यागाचा असल्याचे सांगते.

गौतम बुद्धाचा भगवा रंग चुकीचे लोकांच्या हाती आला असून ही लोक धार्मिक भावनासाठी त्याचा वापर करतायत.

भगवा म्हटले की आपण योगी आदित्यनाथ आणि हिंदुत्व यावरच केंद्रित होतो.मात्र खरा भगवा कुठून आलाय आणि त्याचे महत्व कसे आहे ही सावित्रीदेवी स्वतः अंगावर ती कापड परिधान करून कृती व विचारांमधून दाखवत असते.समतेच्या वाटेवर चालनारी ही आधुनिक सावित्रीबाई

मागील सतरा वर्षांपासून आपल्या घरी राहत नाही.

बहराईच येथे तिचा आश्रम आहे. मतदार संघातील महिला सावित्रीबाईच्या नावाची गाणे म्हणतात. गावातील विधवांना पेन्शन, मुलभूत प्रश्न सोडवत आपल्या मातीशी,लोकांशी इमान राखत काम करणारी सावित्रीबाई फुले आपलं नाव सार्थ करते.

वैचारिक मतभेद होताच भाजपाला विरोध करणारी सावित्रीबाई भगव्या विरुद्ध भगवा अशी लढाई लढत आहे.यात माझा भगवा समतेचा व शोषित वर्गाचा प्रतिनिधित्व करणारा आहे असं तीच म्हणण आहे.

संविधान संपवण्याचा घाट राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपा सोबत मिळून करतायत. मन की बात करणारे नरेंद्र मोदी माझ्या मनातील गोष्टी संसदेत मांडू देत नसून आता आम्ही आमचे हक्क मागणार नाही तर हिसकावून घेऊ असे म्हणत ही आधुनिक सावित्रीबाई फुले नव्याने या भगव्या राजकारणाच्या विरोधात गौतम बुद्धाचा भगवा रंग घेऊन लढते आहे.

शिक्षण  व शिष्यवृत्तीला घेऊन बंडखोर झालेली सावित्री नाव काढले तरी आपला हट्ट सोडायला तयार  नव्हती तिचा हा बंडखोर स्वभावच जन्मजात आहे.

अशी ही बंडखोर युपीची सावित्रीबाई फुले. इतकी वर्षे भाजपासोबत राजकारणात राहून आज तिने राजीनामा देण्यामागे खरोखरच वैचारिक भूमिका आहे की फक्त राजकीय महत्वाकांक्षा हे काही दिवसातच स्पष्ट होईल.

हे ही वाचा भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.