अंतराळात सापडलेल्या एका जिवाणूला सय्यद अजमल खान यांच नाव देण्यात आलेलं आहे
इंटरनॅशनल स्पेस स्टेशन. अंतराळात उभे असलेले संशोधन केंद्र. १९९८ मध्ये जगभरातील सोळा देशांनी एकत्र येऊन हा प्रकल्प राबविला. २ नोव्हेंबर २००० पासून या स्थानकात सलग २० वर्षे, १४२ दिवस अंतराळवीरांचे वास्तव्य आहे. जगातील अथवा आश्चर्य म्हणून या स्पेस स्टेशनला बघता येईल. अमेरिकेतील नासा, रशियाचे रॉसकॉसमॉस अशा अनेक संस्था इथे आपले अनेक प्रयोग करत असतात.
पृथ्वीपासून जवळपास आठशे किलोमीटरवर असलेल्या या भल्या मोठ्या कृत्रिम उपग्रहातून अंतराळात घडत असलेल्या घटना, वातावरणातील बदल, विविध गृह ताऱ्यांच्या स्थितीवर नजर ठेवली जाते. इतकंच नाही येणाऱ्या भविष्यात अंतरिक्षात मानवाला राहता येईल का या साठी इथल्या स्पेस लॅबोरेटरीमध्ये प्रयोग सुरु असतात.
गेल्या काही दिवसांपूर्वी असाच एक प्रयोग करण्यात आला. तो होता अंतराळातील शेतीचा. हे प्रयोग करत होते हैद्राबाद विद्यापीठाचे संशोधक.
नासा आणि हैद्राबाद विद्यापीठातील संशोधकांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रयोग सुरु होता. स्पेस स्टेशन मधील अंतरिक्षवीर हा प्रकल्प राबवत होते. तेव्हा त्यांना स्पेस स्टेशनमध्ये चार वेगवेगळे बॅक्टरीयाचे स्ट्रेन सापडले जे Methylobacteriaceae शी संबंधित होते. हे बॅक्टरीया ISS (International Space Station) वर वावगेळ्या ठिकाणी होते..
या बॅक्टरीयांच्या शोधामुळे अंतराळात शेतीच्या प्रयोगाला मोठे यश मिळेल असं म्हटलं जात आहे.
स्पेस स्टेशनवर सापडलेले जिवाणू हे रॉड शेप सारखे दिसणारे बॅक्टरीया आहेत. यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्यात रोप उगवण्याची क्षमता आहे असं मानलं जातं. अजून या बद्दल अधिकृत माहिती जरी मिळाली नसली तरी हैद्राबाद विद्यापीठाचे आणि नासाचे शास्त्रज्ञ यावर अधिक रिसर्च करत आहेत.
याबद्दल वेगवेगळ्या ठिकाणी जोरदार प्रयोग केले जात आहे.
अंतराळात जिथे गुरुत्वाकर्षण शक्तीचे अस्तित्व नाही व इतर गोष्टी सुद्धा पूरक नाहीत तिथे रोपांची वाढ व जतन होणे हे अशक्य मानले जाते. novel microbes हे अशा स्थिती मध्ये रोप उगवून यावे यासाठी उपयोगी ठरू शकतात. सध्यातरी हे हे बॅक्टरीया surveillance mission चा भाग आहेत आणि आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर आठ वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून यांच्या वर निगरानी ठेवली जात आहे.
संशोधकानी आजवर असे हजार जिवाणू या अंतराळात शोधले असून त्यांना पृथ्वीवर आणून याचा अभ्यास केला जातो. मात्र यावेळी सापडलेले बॅक्टरीया हे विशेष समजले जात आहेत.
Methylorubrum Rhodesianum Bacteria
हैद्राबादच्या टीमला सापडलेल्या जिवाणू पैकी एक बॅक्टरीया हा Methylorubrum Rhodesianum Bacteria चा स्ट्रेन आहे. बाकीच्या तीनची नावे आधीच दिली असल्यामुळे या या जिवाणूचे नाव ठेवण्याची जबाबदारी नासाने हैद्राबादच्या संशोधकांना दिली. या टीमने त्या बॅक्टरीयाच नाव दिलं, “मिथिलोबॅक्टरीयम अजमली” (Methylobacterium ajmalii)
हे नाव देण्यात आलंय तामिळनाडूच्या सैय्यद अजमल खान यांच्या नावावरून.
सैय्यद अजमल खान हे तामिळनाडूमध्ये अन्नामलाई विद्यापीठात प्रोफेसर आहेत. ते मरीन सायन्स डिपार्टमेंट मध्ये शिकवतात. त्यांनी मरीन बायोलॉजी विषयामध्ये डॉक्टरेट मिळवली असून त्यांचा या विषयातील अभ्यास जागतिक स्तरावर नावाजलेला आहे. या महान संशोधकाच्या ट्रिब्यूट म्हणून त्या जिवाणूला अजमली हे नाव देण्यात आलंय.
संशोधकांचा अंदाज आहे की अंतराळातील मानवी जीवनाच्या भवितव्यासाठी या जिवाणूचा शोध हा क्रांतिकारक ठरण्याची शक्यता आहे. आज नाही पण पुढच्या शंभर वर्षात अंतराळात शेती करून पृथ्वीवरचा भार कमी करण्यासाठी हे संशोधन पुढचं पाऊल मानलं जात आहे.
हे ही वाच भिडू.
- मायणीचा सुपुत्र युरोप गाजवून थेट ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत वरिष्ठ शास्त्रज्ञ बनला.
- नोबेल विजेत्या भारतीयाचा सन्मान म्हणून नासाने दुर्बिणीला नाव दिल चंद्रा टेलिस्कोप
- अमेरिका रशियाला मागे सारून या आफ्रिकन देशाने मंगळावर माणूस पाठवायची मोहीम आखली होती
- अंतराळवीर महिला अंतराळात पिरियडस् आल्यानंतर काय करतात ?