खरच, घरबसल्या महिना २५,००० हजार कमवता येतात काय ?

सगळा भारत घरकोंबडा झालाय. डोक्याला विशेष काही मिळत नाहीए. अशा वेळी आमच्या डोळ्यापुढं आलं ती जाहिरात.

घरबसल्या २५,००० कमवा. गेली कित्येक वर्ष झाली ही माणसं इतरांना घरात बसवून पैसे मिळवून द्यायचा उद्योग करतायत. खरच यात काही तथ्य आहे का याचा शोध घेतल्यानंतर आमच्या भिडू अभिजित कुपाटेनं स्वत:चा अनुभव सांगायला सुरवात केली. 

सन 2006 साली पुण्यात शिक्षणासाठी आलो. व्हीआयटीत ॲडमिशन मिळालं. मी खुष होतो. पण घरचे नाराज. पोरगं कर्ज काढून शिकतय. मलाही दडपण. 2.5 लाखाचं कर्ज ते ही शिक्षणासाठी ही बाब घरी पटणारी नव्हती. अशाच दबलेल्या अवस्थेत पहिल्यांदा पुण्याच्या बसमध्ये एक जाहिरात पहिली. घर बसल्या काम करा / पार्ट टाइम काम करा महिना 25,000 कमवा.

म्हटलं करूया प्रयत्न निदान कर्ज तरी फिटायला चालू होईल.  

दादाने दिलेल्या जुन्या पॅनेसोनिकच्या मोबाईलवरुन वरून कॉल केला. समोरून उत्तर आलं 2,500 रुपये घेऊन आमच्या ऑफिसवर या. तुमच्याकडे कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप असेल तर तुम्ही डेटा एन्ट्रीच काम करू शकताय.  मी म्हणालो हो मी गावात 7/12 च्या डेटा एन्ट्रीचं काम केलंय. 30 पैसे प्रति उतारा एवढेच मिळायचे. तुम्ही 25 हजार कसल्या कामाचे देणार ?

समोरून परत उत्तर आलं 2,500 रुपये घेऊन आमच्या ऑफिसवर या. 

आज जायचं मग जायचं म्हणता, पहिल्या सेमिस्टर संपत आला. परीक्षा आटोपून गावाहून परत मग त्या ऑफिसवर नक्की जाऊ असा निर्धार केला. पण शिक्षणाच्या नादात त्यांच्या ऑफिसवर जावून घरबसल्या 25,000 हजार कमवायचं स्वप्न घरबसल्याच अपुर्ण राहिलं.

तीन वर्ष झाली. 2009 ला नोकऱ्यांच्या मारामारीत आणि फुल्ल टाईम रात्रपाळी करुन 15,000 कमवणं देखील इंजिनीयर पोरासाठी अशक्य होतं. त्या वेळी देखील जाता येता या घरबसल्या 25,000 रुपयांच्या जाहिराती दिसायच्या. पुन्हा वाटायला लागलं आत्ता तरी फोन करायला पाहीजे. यावेळी पण हे 2,500 रुपये भरायला लावणार हे माहित झालेलं. पण ट्राय करायला हरकत नव्हती. पण इथेही माझ्या आडवा घरबसलेपणा आला.

साधारणतः 2018 च्या ऑगस्ट महिन्यात माझ्याजवळ इंजिनियरिंगला राहायला असणारा माझा लहान मावस भाऊ त्यांच्या मित्रासह अशा एका मित्राजवळ जवळपास जाऊन त्यांना हुलकावणी देण्यात यशस्वी झाला. 

अशाच एका पार्ट टाइम करा आणि महिना 25 हजार कमवा योजनेत त्याच्या बॉईज होस्टेलच्या रेकटरने तब्ब्ल 3 हजार भरून रजिस्ट्रेशन केलेलं. 22 दिवसांत 500 पान टाईप करायचा तो जॉब. किमान 800 शब्दांच एक पान. संपूर्ण पाने टाइप केल्यांनतर 12,500 रूपये महिन्याला रिटर्न्स. असे सलग तीन जॉब पूर्ण झालेच तर भरलेली रजिस्ट्रेशन फ़ी परत. असं टाईप करून त्या मोबदल्यात रक्कम मिळवण्याची पार्ट टाइम काम ज्यादा पैसे मिळतील म्हणून घेतलं होतं ते किती कायदेशिर हे तेच जाणोत.

रेकटरने हि गोष्ट हॉस्टेल मधल्या मुलांना सांगितली होती. अमुक एवढं टाईप करून द्या आणि 5000 तुम्हाला घ्या. पोरं ख़ुश झालीत आणि काम हाती घेतलं. त्यात माझा लहान भाऊ होता.

त्या कंपनीने दिलेल्या सॉफ्टवेअर प्रणालीत आपल्या लॅपटॉपवर हे टायपिंग करायचं. 22 दिवस झाले की ते सॉप्टवेअर काम करण बंद करतं, जेवढं टाईप केलं असेल तेवढी टाइप केलेली फ़ाईल सेव्ह होते. सोबत काही अटीही होत्या. दर पाना गणिक 5 चुका ग्राह्य असतील, पंक्चुएशन मार्क्स पण व्यवस्थित हवेत आणि निर्देशीत केलेल्या चुकांपेक्षा जास्त चुका निघाल्या कि ते पान डिबार. त्याचे पैसे कट होणार. असे किमान 25 रूपये प्रती पान कमाई ठरलेली होती.

त्या सॉप्टवेअरमध्ये वरच्या बाजूला पुस्तकाच्या पानाच्या प्रती. खालच्या बाजूला टाईप करायला एक विंडो. एक पुस्तक टाईप झालं कि दुसरं येणार. 

भाऊ म्हणाला, गॉर्की पार्कसारख्या कांदबरी आणि त्यातलं हायफाय इंग्लिश खरं तर कुठल्याही निष्णात टाईपरायटर ला हा टास्क करायचा म्हणजे दिवसभर वेळ दिला तरी जास्तीत जास्त 10 ते 12 पाने उरकतील आणि 22 दिवसांत हे अखं पुस्तक टायपायचयं म्हणजे दिवसाला किमान 22 पाने हे अशक्य काम.

त्यात सॉफ्टवेअरमध्ये फक्त टाईप करायला मुभा होती, कॉपी पेस्ट प्रकार चालत नाही, ना स्पेलचेकर ना कुठल्या स्पेशल कळीची मुभा. पहिले 15 दिवस भावासह 3 नवख्या पोरांनी फक्त 22 पाने उरकलीत. 

पण पोरं हुशार होती, त्याच्या लॅपटॉपवर त्या सॉफ्टवेअरमध्ये घुसून पुस्तकाची स्कॅन केलेली पाने मिळवली. ती ओसीआर वापरून कन्व्हर्ट करत वर्ड मध्ये स्पेल चेक करून घेतलीत. आता लोच्या कॉपी पेस्टचा होता. गुगल देवता पोरांना पावली आणि मळणी यंत्रात टाकावी तशी एका बाजूला वर्ल्ड फाईल टाकत दुसऱ्या बाजूला ऑटो टायपर नावाची दुसरी सॉफ्टवेअर प्रणाली सगळे शब्द आणि पाने हळूहळू तिकडे घुसडवू लागली.

दिवसाला 80 पाने होवू लागली.

पोरांचं काम फत्ते झालं रेक्टरचा अशक्य प्राय टास्क पोरांनी चार दिवसात शक्य केला. त्यांनतर रेक्टर व ह्यातला एक जण त्या कार्यालयात काम पोहच करायला गेली.

आत्तापर्यंत 5 वर्षात हे कुणीच केलं नाही. तुम्ही कसं केलं?

असा शेरा तिथल्या डेस्क वरच्या पोराने मारला. 

आहो सगळं तर केलंय, तुम्ही ठरल्या प्रमाणे पैसे द्या.

ह्यावर तो म्हणाला, 

कंपनीमध्ये हे पहिल्यांदा असं झालय, आम्ही मजकूर पाठवतो पुढे रिपोर्ट येईल चार पाच दिवसांत चक्कर मारा.

रेक्टर म्हणाला,

“मी माझ्या पोरांकडून हे टाइप करून घेतलंय तेंव्हा तू पैसे द्यायला हवेस.”

5 दिवसांनी पोरं गेलीत. तेंव्हा तिथला पोरगा कपंनीने तुम्हाला टायपिंग टेस्ट द्या असं सांगितलय म्हणून अडून बसला. 5 मिनिटांत एक पान असा रिपोर्ट आला होता. त्यावर तो टायपिंग टेस्ट द्यायला पोरांना अडून बसला. टायपिंग टेस्ट का देवू? तुम्ही ठरल्याप्रमाणे कामाचे पैसे द्या म्हणून भांडू लागली.

त्याच्या मध्यंतरी ती माझ्याकडे आली होती. दादा आम्ही महिन्याला 50,000 कमवणार आहे तू फक्त 1 सॉफ्टवेअर बनवून देशील का? यायला म्हणलं कसं काय? काय प्रकरण? तेंव्हा सगळी माहिती मला सांगितली.

परत मला कॉल आला दादा, ते असं म्हणतय बग, म्हणलो हे बगा पहिले तर हे सगळं बेकायदेशीर आहे. एखादं पुस्तक टायपिंग वगैरे म्हणजे पहिले कॉपीराईटला घाला,  त्याला सांगा आम्ही टायपिंग टेस्ट करतो, थेट दुसरा टास्क द्या आणि पहिले ठरलेले पैसे द्या. असे म्हणून अडून बसा.

भांडल्यानंतर रूपये 7000 चुका वगैरे काढून दिले गेले आणि परत तुम्हाला दुसरा टास्क काही मिळणार नाही असा इशारा कंपनीने दिलाय म्हणून परत पाठवले.

पुढे शांत बसणार ती पोरं कसली? परत दुसऱ्या मित्रांना काम द्या म्हणून त्या ऑफिसात चौकशीसाठी पाठवली. त्यावर तुमच्या कॉलेजच्या मुलांनी सॉफ़्टवेयर ह्याक केलय तेंव्हा तुम्हाला हे असलं काही काम मिळणार नाही म्हणून हटाई चालू केली.

तर पार्ट टाइम काम लावून लोकांना आमीष दाखवून पैसे कमावण्याचं यांच असं काहीस गणित आहे. हे तुमच्या लक्षात येईल, नोंदणी फी घ्या. अशक्य असे टास्क देऊन गुंतवून ठेवा. दिवसागणिक 1 जरी बकरा कस्टमर मिळाला तरी ह्यांची एका शहरातील कार्यालयाची कमाई काही लाखांच्या घरात आहे हे नक्की. ह्यात झटपट पैसे मिळवण्याची  आशा बाळगणारे कितीतरी लोक रोज़ दररोज पुणे मुंबई आणि उपनगरात ठकवले जात असतील याची कल्पनाच न केलेली बरी.

अशाच टाईपपिंग टास्क मधून तब्ब्ल 1,000 रु च्या आंतरराष्ट्रीय इंग्रजी कादंबरीसाठी आयता टाईप केलेला मजकूर  मिळवून एका केंद्रीय पद्धतीने छापखाना चालून ती 100 रुपयाला रस्त्यावर उपलब्ध होत असेल का? असेही प्रश्न  मला भेडसावतात.

अशात 15 दिवस ऐन परीक्षेच्या काळात नको तिकडे वेळ घातल्याने पोरांचेही भरपूर विषय राहिले ते वेगळंच.

 •  अभिजीत कुपाटे.

हे ही वाचा.

15 Comments
 1. Pooja says

  Ghar baslya job pahije

 2. Ashwini sagar says

  Ghar baslya job pahije

 3. Ashwini sagar says

  Job PAHIJE ghari basun

 4. Ashwini Ajay Kale says

  Job pahije gher beselay

 5. Priya patil says

  https://chat.whatsapp.com/KFEIiP4Pnmt8BmnvmWPzNd
  Hi reselling sathi link ahe all type product available
  Koni intrested asal tr link through join kra 🤗

 6. Rajni kale says

  9930180654

 7. Arvind rathod says

  माझ्याकडे पैसे नाहीत सर

 8. Pawara Manisha says

  Job pahije ghari basun

 9. Avinash k jagtap says

  Hatala kam pahije….

 10. Sai Sukale says

  घरी बसल्या जॉब पाहिजे

 11. sachin says

  Ghar basun kam pahije sir

 12. Reshma darade says

  Job pahije work from home

 13. Reshma darade says

  Work from home plz

 14. Manisha Bisht says

  Home work

Leave A Reply

Your email address will not be published.