विरू म्हणाला,” इंझीभाई मुझे सिक्सर मारने का मन कर रहा है.”
आपल्या सगळ्यांचा लाडका विरु उर्फ विरेंद्र सेहवाग म्हणजे ट्विटरवर पाकिस्तानी खेळाडूंचा कर्दनकाळ समजला जातो. मैदानावर जशी पाक बॉलर्सची धुलाई केली तशीच धुलाई ट्विटरवर सुरू असते. अगदी इम्रान खानला देखील तो सोडत नाही. पण याच विरुचे पाकिस्तानी खेळाडूूंसोबतच्या दोस्ती यारीचे किस्से सुद्धा फेमस आहेत
गोष्ट आहे २००५ सालच्या पाकिस्तान क्रिकेट टीमच्या भारत दौऱ्याची.
पाकिस्तानचा कप्तान होता इंझमाम आणि भारताचा होता दादा गांगुली. कित्येक वर्षांनी पाक टीम भारतीय भूमीत उतरत होती. मिडियासुद्धा फुल फॉर्ममध्ये आला होता. गांगुली आणि इंझीची एखाद्या लढाईला जाणाऱ्या योध्याच्या रुपात फोटोसेशन करण्यात आलं होतं. स्टेडियममध्ये प्रेक्षक सुद्धा घोषणा देऊन देऊन आपल्या टीमला मोटीव्हेट करत होते.
बघितल तर क्रिकेटच्या ऐवजी एखादं युद्ध होईल का असच वातावरण झालं होतं.
पूर्वी फास्टर बॉलर्सना खेळताना डगमगणारी भारतीय टीम उरली नव्हती. सचिन सेहवाग द्रविड गांगुली लक्ष्मण यांचा तो काळ होता/ बॉलिंगमध्येही इरफान पठान जादू करत होता. पाक टीम पूर्वी एवढी ताकदवान नसली तरी ठीकठाक होती. इंझमाम, शहीद आफ्रिदी, सामी, अब्दुल रझाक असे तगडे खेळाडू घेऊन ही टीम आली होती.
पहिली कसोटी अनिर्नयीत राहिली. दुसरी भारत जिंकला. तिसरी बेंगलोरमध्ये होणार होती.
इंझमामने टोस जिंकून पहिली बटिंग निवडली. त्याने बनवलेल्या १८४ आणि युनुस खानने काढलेल्या २६७ धावांच्या जोरावर पाकने ५७० रन्सचा डोंगर उभा केला. उत्तर द्यायला सेहवाग आणि गंभीर उतरले. भारताची इनिंग सुरु झाली ती अतिशय कन्टाळवाण्या वातावरणात. पाकच टोटल एवढ मोठ होत आता सामना ड्रॉ होतो असच वाटत होतं. गंभीर लवकर आउट झाला. थोड्या वेळाने द्रविड मग तेंडूलकर हे थोड्या थोड्या अंतराने आउट होत गेले.
बेगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमची पीच स्पिनला मदत करणारी होती. पाकचा पहिला हिंदू स्पिनर दानिश कनेरिया जबरदस्त फॉर्म होता. सेहवागला त्याने अगदी बांधून घातले होते. तो आपला नेहमीच्या स्टाईलमध्ये खेळू शकत नव्हता. त्याच शतक झालं. दीडशे धावापर्यंत देखील पोहचला. पण त्याला अजून एक सुद्धा सिक्स मारता आला नव्हता आणि याच त्याला खूपच वाईट वाटत होतं.
पाकिस्तानचा कप्तान इंझमाम उल हक तेव्हा स्लीप मध्ये फिल्डिंग करत होता.
अधूनमधून बॅट्समनची स्लीपमधल्या फिल्डरबरोबर गप्पा होत असतात. इंझमाम आपल्या निवांत कुल स्वभावासाठी प्रसिद्ध आहे. तर सेहवाग आपल्या करामतीसाठी. ओव्हर संपल्यावर झालेल्या ब्रेक मध्ये सेहवाग इंझमामला म्हणाला,
“इंझीभाई आपसे एक रिक्वेस्ट करनी थी.”
इंझमाम ला कळेना काय झालं. सेहवाग म्हणाला,
“मेरा सिक्सर मारने का बहुत मन कर रहा है. आप वो लॉंग ओन के फिल्डर को प्लीज हटाओ ना. “
इंझमाम ला शॉक बसला. “पागल हो गया है क्या.”
पण सेहवाग सिरीयस होता. तो खूप रिक्वेस्ट करू लागला. गंमतीगंमतीमध्ये दोघांच्यात चलेंज लागल की इंझी एका बॉलसाठी लॉंग ओनच्या फिल्डरला मिडअॉनला पाठवेल आणि सेहवागने त्या बॉलला सिक्सर मारून दाख्वायचं.
झालंही तसंच. इंझमामने आपला फिल्डर पुढे आणला आणि सेहवागने टेचात दानिश कनेरियाला सिक्स मारून आपले दीडशतक पूर्ण केले.
कनेरियाला बिचाऱ्याला माहित नव्हतं की इंझमामने एका बॉलसाठी फिल्डर का हलवला. तो तावातावाने कप्तानसोबत भांडयला आला. पण इंझमामने त्याला शिवी घालून परत पाठवल. सेहवागने पुढे २०१ धावा केल्या, पण पाकिस्तानने ती मॅॅॅच जिंकली.
मध्यंतरी सेहवागने एका मुलाखती मध्ये हा किस्सा सांगितला आहे. त्यात तो म्हणतो,
“इंझमाम के साथ हमारा भाई वाला रिश्ता था. उसने भी सोचा होगा छोटेभाई का दिल कर रहा है तो सिक्सर मारने दो.”
भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंच असं हसत खेळत नातं होतं. मैदानात वेळप्रसंगी खूप त्वेषाने खेळायचे पण खऱ्या आयुष्यात भाईचारा टिकवून ठेवला जात होता.
हे ही वाच भिडू.
- कोचने सेहवागला कानफटात मारली आणि गांगुली भडकला.
- अंपायर आउट देऊ नये म्हणून सेहवाग आधीच त्याच्याजवळ आपली सेटिंग लावायचा.
- सेहवागने लक्ष्मणला सांगितलं होतं, “तुम्हाला जमलं नाही पण भारताकडून पहिलं त्रिशतक मी मारणार”
- त्यानंतर भारताला शिवीगाळ करण्याची हिंमत मिंयादादला झाली नाही.