विरुने राहुल द्रविडचा विश्वास जिंकण्यासाठी सेंच्युरी ठोकली…

भारतीय क्रिकेट टीमच्या स्फोटक बॅट्समन्सच्या यादीत वीरूचं नाव स्पेशली घेतलं जात. वीरू अर्थात वीरेंद्र सेहवाग. आपल्या बॅटिंगनी तो भल्या भल्या बॉलर्सना पछाडायचा. वनडे असो किंवा टेस्ट, क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये तो बॉलर्सवर भारी पडायचा.  आपल्या धुवादार बॅटिंगनं त्याने कित्येकदा भारताला विजयाचा आकडा गाठून दिलाय. जगभरात त्याच्या बॅटिंगचं कौतुक होत, पण भारतीय संघातल्याच एकाला त्याच्या बॅटिंगवर भरवसा नव्हता.

वीरेंद्र सेहवागनं आपल्या फॅन्ससोबत राहुल द्रविड सोबतचा एक किस्सा शेअर केला होता.  दादाच्या (सौरभ गांगुली) कॅप्टन्सीत त्यानं क्रिकेटमध्ये डेब्यू केला होता. तेव्हा वीरू एवढा फॉर्ममध्ये नव्हता. आपल्या सुरुवातीच्या इंटरनॅशनल  मॅचेसमध्ये सेहवागनं म्हणावी तशी कामगिरी केली नव्हती,  १५-१६ सामन्यात तर त्यानं बोटावर मोजण्या इतकेच रन बनवले होते.

२००२ चं ते साल, त्यावेळी भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर होता.  कॅप्टन सौरव गांगुलीनं टॉस जिंकला आणि आधी बॅटिंग करायचं ठरवलं. यावेळी वीरू भाई टेस्ट ओपनर म्हणून आपला डेब्यू करत होता.  सामना सुरु व्हायला अजून २० मिनिटं बाकी होते, पण सेहवागच्या आधीच राहुल द्रविड बॅटिंग पॅड घालून बसले होते.

हे पाहून वीरूनं हैरान होत आपल्या भुवया उंच केल्या आणि थोडा वेळ  विचारात पडला. त्यानं राहुल द्रविडला विचारलं, ‘राहुल भाई खेळ सुरु व्हायला अजून २० मिनिट आहेत आणि तुम्ही आताच पॅड घालून कशाला बसलाय?

आता राहुल द्रविड तर आपल्याला माहीतेयच कसा होता.  स्वभावाने शांत पण फटकळ तोंडाचा. त्याला एखादी गोष्ट नाही पटली कि, तो समोरच्याचा विचार न करता फाडकन बोलून मोकळा व्हायचा. त्याच्या या स्वभावाचा अनेक क्रिकेटर्सना सामना करावा लागलाय, मग त्यातून भारतीय संघाचा कुल कॅप्टन महेंद्र सिंग धोनी सुद्धा पाठीमागं राहिलेला नाही.

असो, तर सेहवागच्या त्या प्रश्नावर राहुल द्रविड म्हणाला, “तू या टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच  ओपनर म्ह्णून  जातोय, त्यामुळं मला नाही माहित मला तू  बॅटिंग पॅड घालण्यासाठी किती वेळ देशील.” राहुलचं हे वाक्य वीरूच्या जरा जीव्हारीच लागलं. 

राहुल द्रविडला वीरूवर विश्वास नव्हता कि, तो रन बनवू शकेल. सेहवागच्या म्हणण्यानुसार त्यावेळी त्याला वाईट वाटलं होत कि, माझ्याचं टीममधल्या खेळाडूंना माझ्यावर विश्वास नाहीये.

राहुलला वीरूवर विश्वास बसायला थोडा वेळ लागला. त्या सामन्यात राहुलचं बोलणं जास्तच  मनावर घेतलेल्या वीरूनं पहिल्याच डावात ८४ धावा मारल्या. ९६ बॉलवर १० फोर आणि १ सिक्स लगावत त्यानं राहुलच्या त्या टोमण्याला चांगलंच उत्तर दिल. एवढंच नाही तर दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये  त्यानं डायरेक्ट शतकचं ठोकलं. वीरूच्या या दमदार खेळीनंतर राहुल द्रविडनं  वीरूवर डोळे झाकून विश्वास ठेवला.

राहुलनचं त्याला शतकं मारायला सांगितली होती,

वीरेंद्र सेहवाग आणखी एक गोष्ट शेअर करताना सांगतात कि, जेव्हा त्यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये आपलं पाऊल  ठेवलं होत. तेव्हा राहुल  द्रविडचं होता ज्यानं त्याला शतकं मारण्याविषयी बोललं होतं. राहुलनं वीरूला एक सल्ला दिला होता कि, जर त्याला बड्या क्रिकेट एक्सपर्ट्स आणि मोठ्या खेळाडूंकडून इज्जत पाहिजे असेल तर मोठी- मोठी शतकं मारावी लागतील. 

राहुलचा हा सल्ला वीरूनं डोक्यात फिक्स ठेवला, ज्यानंतर त्यानं दोन तिहेरी शतकं लगावली. ११ वेळा १५० पेक्षा जास्त रन केले. यावेळी त्याच तिसरं तिहेरी शतक होणारच होत पण ७ रनांनी हे हुकलं.  यानंतर जेव्हा वीरूनं द्रविडला विचारलं कि, आता या खेळीनंतर मला संघाकडून इज्जत मिळेल काय?  त्यावर द्रविडनं हसत उत्तर दिलं, “होय नक्कीच”

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.