जेव्हा वीरूनं फक्त २ बॉलात २१ रन ठोकले होते..

भारतीय क्रिकेट संघाचा माजी ओपनर वीरूभाई अर्थात वीरेंद्र सेहवाग नेहमीच आपल्या विस्फोटक बॅटिंगसाठी ओळखला जातो. क्रिकेटचा कोणताही फॉरमॅट असो वीरू आपल्या बॅटिंगनं समोरच्या बॉलरचा घाम फोडणारचं.  मग तो कितीही पटाईत खेळाडू का असेना. त्याला फक्त समोरच्या टीमवर धावांचं आक्रमण करायला आवडायचं.

त्याची बॅटिंगची खासियत म्हणजे तो बऱ्याचदा पहिल्याचं बॉलवर चौकार मारून आपल्या खेळाचा श्रीगणेशा करायचा. त्याच्या या धाकडं अंदाजामुळं बॉलर्समध्ये त्याच्याबद्दल एक प्रकारची दहशत असायची कि, वीरूभाई कधीही आपल्या बॉलवर चौकार – सिक्सर मारू शकतो, या भीतीनचं बॉलर्स बऱ्याचदा आपली बॉलिंग विसरायचे.

‘नजफगढ़ के नवाब’ या नावानं फेमस असलेला वीरेंद्र सेहवाग आपल्या अनेक रेकॉर्ड आणि धावांच्या आकड्यामुळं कायमच चर्चेत होता.

वीरूचे बरेच रेकॉर्ड चर्चित आहेत, पण फार क्वचित लोकांना माहितेय कि, कि वीरूनं २ बॉलात २१ रन बनवण्याचा रेकॉर्डही आपल्या नावे केलाय. 

१३ मार्च २००४ ची भारत – पाकिस्तान वन डे मॅच. सेहवाग बॅटिंग करत होता तर पाकचा राणा नावेद उल हसन बॉलिंग. त्याचवेळी सेहवागनं २ बॉलात २१ रणांची खेळी केली. दरम्यान, सेहवागनं हा कारनामा आपल्या बॅटिंगनं नाही केला.  तर सेहवागच्या दहशतीमुळं बॉलरलचं चुका करायला मजबूर झाला.  ज्यामुळे २ बॉलात एवढे रन काढता आले.

मॅचची ती ११ वी ओव्हर होती. राणा नावेद उल हसन बॉलिंग करत होता. त्यानं आपल्या ओव्हरची सुरुवात नो बॉलनं केली. ज्याच्यावर सेहवागनं चौकार मारला. त्याच्या पुढच्या बॉलवर पुन्हा एकदा नो-बॉल, जो सेहवागने बाऊंड्रीवर पाठवला.  यानंतर त्या फास्ट बॉलरनं सलग तिसरा नो-बॉल टाकला आणि आणखी एक चूक केली. या तीन नो-बॉलनंतरच लेफ्ट हँडेड या बॉलरने एक बरोबर बॉल फेकला ज्यावर कोणताच रन निघाला नाही.  

त्यानंतर त्यानं पुन्हा बोल फेकला, पण बहुतेक त्यादिवशी एकतर राणा नावेद उल हसनचं  नशीब खराब होत नाहीतर सेहवाग चांगलं होतं, पुन्हा एकदा नो- बॉल पडला. आता सेहवाग काय ऐकतोय होत त्याने परत त्या बॉलवर चौकार मारला.

आता डाव काय इथंच संपला नाही. नावेद उल हसननं आणखी एक नो बॉल टाकला आणि त्यावरही सेहवागनं चौकार मारला. अश्या पद्धतीनं पहिल्या दोन बॉलमध्येच तो २१ रन बनवू शकला. त्यानं आपल्या बॅटिंगनं १६ रन बनवलं, तर ५ रन नो- बॉल मूळ मिळाले.  

पाकिस्तानच्या या बॉलनं शेवटच्या तीन बॉलात सेहवागला केवळ तिचं रन दिले. अश्या पद्धतीने त्यानं एका ओव्हरमध्ये २४ रन रन केले.आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात ५  नो बॉल वाला हा सगळ्यात खराब ओव्हर होता.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सेहवागच्या नावे एकाच बॉलवर सर्वात जास्त रन बनवण्याचा रेकॉर्ड आहे. त्याने नावेद उल हसनच्या बरोबर बॉल टाकण्याच्या आधी १७ रन केले होते.  त्याच्या नावे अवघ्या २० बॉलात हाफ सेंच्युरी करण्याचा देखील रेकॉर्ड आहे. तसेच  सेहवागच्या नावे  टेस्ट क्रिकेटमध्ये तिसरं शतक झळकवण्याचा  बेस्ट रेकॉर्ड आहे.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.