हजारों वर्षांपासून भारतातील या लोकांनी स्वत:ला जगापासून अलिप्त ठेवलय

भारतालगतच्या बे ऑफ बंगाल सागरामध्ये अंदमान आणि निकोबार बेटं आहेत हे आपल्या सगळ्यांनाच माहितीये.

ग्रेट अँडमॅनीझ बरोबरच जारावास, ओंगे, शॉम्पेन आणि निकोबारिस या तेथील काही प्रमुख जमाती.

त्यातच सेंटिनेली हे अंदमान आणि निकोबार बेटांच्या सहा मूळ आणि अनेकदा विलग जमाती (isolated) लोकांपैकी एक आहेत.

त्याला आपण Reclusive People म्हणजेच त्यांना इतर लोकांपासून लांब राहायचे आहे अशी ही लोकं. त्यांना सेंटिनेसिझ (Sentinelese) किंवा सेंटिनेली (Sentinel) असं म्हंटलं जातं.

उत्तर सेंटिनेल (North Sentinel) बेटावर ही स्वदेशी जमात राहते जी स्वत:ला इतरांपासून कैक वर्षे लांब ठेवत आली आहे. आणि हो, हा आपल्या भारताचाच भाग आहे.

१९५६ मध्ये भारत सरकारने उत्तर सेंटिनेल बेटाला आदिवासी राखीव म्हणून घोषित केले आणि त्यापासून ५ किमी प्रवास करण्यास मनाई केली. छायाचित्र करण्यास देखील बंदी आहे. बाह्य लोकांकडून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. तसा कायदाच केलाय.

परंतु अंदमान आणि निकोबार येथील अशा विविध जमातींची प्रथम नोंद १७७१ ईस्ट इंडिया कंपनीच्या Hydrographic Survey मध्ये आढळते. त्याला First recorded sighting असं म्हंटलं गेलं.

पुढे १८६७ ला भारतीय व्यापारी-जहाज तिथे गेलं. त्यातील प्रवासी बीचवर नाष्टा करत असताना अचानक नग्न, लहान – केसांचे, लाल – रंगवलेली जमात हातात लोखंडी धनुष्य-बाण घेऊन नेजरेस पडले. तेव्हा first recorded contact’ त्यांच्याशी झाला अशी नोंद आहे.

पुढे लक्षात आले की ती लोकं जारावास जमातीचे होते.

मग १८८० ला सेंटिनेलिझ जमातीशी संपर्क करता यावा यासाठी ब्रिटीश नौदल अधिकारी मौरिस विडाल पोर्टमॅन यांनी पुढाकार घेऊन काही सहकार्यांसमवेत उत्तर सेंटिनेल बेटावर कुच केली.

सेंटिनेलिझ जमातीची लोकं त्यांना पाहून झाडा-झुडपांमध्ये पळून गेली. काही दिवसांनी पोर्टमॅनने जमातीमधील एक पुरुष व स्त्री अन् त्यांची ४ मुलं अशा ६ लोकांना ताब्यात घेतलं.

Screenshot 2020 05 18 at 6.50.12 PM

त्यांना पोर्ट ब्लेअर येथे आणण्यात आलं परंतु लगेच काही दिवसात ते जोडपं मरण पावलं. चारही लेकरं आजारी पडली. पोर्टमॅनने तात्काळ निर्णय घेऊन त्या लेकरांना उत्तर सेंटिनेल बेटावर नेवून सोडलं.

पुढे पोर्टमॅन १८८३, १८८५ व १८८७ ला पुन्हा त्या बेटावर भेट देऊन आला.

१९६७ ते १९९१ या कालावाधीत मानववंशशास्त्र (anthropologist) टी. एन. पंडित यांनी भारत सरकार, सैन्य दल व नॅशनल जिओग्राफिक यांच्या सहकार्याने उत्तर सेंटिनल बेटावर काही मोहिमा केल्या. मैत्रीपूर्ण संवाद साधण्याचा खूप वेळा प्रयत्न केला गेला.

Screenshot 2020 05 18 at 5.56.58 PM

सेंटिनेलिझ जमातीसाठी काही भेट वस्तूसुद्धा पाठवण्यात आल्या पण दुर्दैवाने काही वेळा हिंसक चकमकी झाल्या. काही वेळेस सेंटिनेलिझ जमातीने स्वागत केल्यासारखं दाखवलं तर काही वेळा शौच करण्याच्या पोझ दिल्या.

बऱ्याचदा भेट वस्तू स्वीकारण्यासाठी ते यायचे तर काही वेळा धनुष्य-बाण घेऊन हल्ला करायचे. या सगळ्याचे अनेकदा चित्रकरण देखील करण्यात आले. थोडक्यात काय तर टी. एन. पंडित यांना समजले की सेंटिनेलिझ जमातीला संपर्क आवडत नाही.

Screenshot 2020 05 18 at 5.57.57 PM

१९९१ ला मात्र शांततापूर्ण एक संपर्क या जमातीसोबत करण्यात आला. मानववंशशास्त्र (anthropologist) मधुमाला चट्टोपाध्याय यांनी एक टीम स्थापन करुन पुन्हा संपर्काचा प्रयत्न केला.

४ जानेवारी १९९१ ला पहिल्यांदा सेंटिनेलिझ जमात हत्यार घेऊन नाही आली. तरी त्यातील एकाने धनुष्य बाण हाती घेतलेच. परंतु एक महिलेने तो बाण खाली ढकलला अन् त्याने हत्यार टाकून दिले. मधुमाला यांनी पहिल्यांदा जवळून त्यांच्याशी संपर्क साधला

पुढे पंडित व चट्टोपाध्याय यांनी दोघांनी एकत्र २४ फेब्रुवारी १९९१ ला पुन्हा तिथे भेट दिली. १९९४ पर्यंत अशा मोहिमा चालल्या. भारत सरकारने हेतू नसल्यास संपर्क टाळण्याचे धोरण स्वीकारले. मग ९ वर्षांसाठी पुन्हा सगळं ठप्प झालं.

२००४ ला त्सुनामीनंतर एक हेलिकॉप्टर पाहणीसाठी तिथे गेलं असता जमातीमधील एका पुरुषाने धनुष्य बाण चालवलं. २७ जानेवारी २००६ ला सुंदर राज व पंडित तिवारी यांची मासेमारीची बोट चूकून तिथं गेली. सेंटिनेलिझने त्यांच्यावर हल्ला चढवला व कुऱ्हाडीने मारुन टाकले. त्यांचे मृतदेह आणता नाही आले.

Screenshot 2020 05 18 at 5.57.30 PM

त्यानंतर उत्तर सेंटिनेल बेट नोव्हेंबर २०१८ ला पुन्हा चर्चेत आलं.

२६ वर्षीय अमेरिकन जॉन अलेन चाऊ ख्रिश्चन धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी तिथे एका मासेमारी करणाऱ्या माणसाला लाच देऊन बेकायदेशीररित्या गेला. त्यालाही सेंटिनेलिझ जमातीने मारुन टाकले व बीचवर त्याचा मृतदेह दिसला पण परत आणता आला नाही.

पोलीसांनी मदत केलेल्या मारेमाऱ्यांना अटक केली.

तर हे सगळं भयान आहेच परंतु सेंटिनेलिझ जमातीला खरंच माहिती नसेल की जग वगैरे काही अस्तित्वात आहे. तेथील लोकसंख्या किती आहे माहिती नाही परंतु ५० ते २०० लोकं असू शकतात असा एक अंदाज लावला जातो.

२०२० मध्ये आपण सारे कोरोना महामारीमुळे मागील दोन महिने विलग आहोत परंतु हे सेंटिनेलिझ काही शतकांपासून विलग जमात (isolated tribe) आहे. म्हणूनच सेंटिनेलिझ हे जगातील सर्वात वेगळ्या जमातींपैकी एक आहे.

  •  प्रज्ञेश मोळक (साकू)

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.