माझं नाव जावेद इक्बाल, मी १०० मुलांचा खून केला आहे आणि मी माफी मागणार नाही..

ते साल होत १९९९ चं. डिसेंबर महिना होता. पाकिस्तानच्या लाहोर मधल्या एका उर्दू वर्तमानपत्राच्या ऑफिसमध्ये एक पत्र आलं होतं. नेहमीप्रमाणे ते उघडण्यात आलं. पण आतला मजकूर असा होता की पुढचा मागचा विचार न करता संपादकाने थेट पोलीस स्टेशन गाठलं. पोलीसांनी मोठ्ठा फौजफाटा घेवून ते पत्र जिथून आलं होतं ते घर गाठलं. 

रावी नदिच्या काठी एकांतात असणाऱ्या त्याच्या घराच्या दिशेने पोलीस गेले. पोलीसांनी त्या घराला चारीबाजूंनी घेराव घातला. अंदाज घेवून पोलीस आत शिरले. आत शिरताच त्यांना दोन छोट्या आकाराच्या मानवी कवट्या दिसल्या. त्याच्या शेजारीच अॅसिडने भरलेला एक मोठ्ठा बॅरेल… 

ज्या वर्तमानपत्राला आलेल्या चिठ्ठीच्या आधारावर पोलीस त्याच्या घरात पोहचले होते त्या चिठ्ठीवर लिहलं होतं की, 

माझं नाव जावेद इक्बाल, मी १०० मुलांचा बलात्कार करुन खून केला आहे. मला या गोष्टींचा कोणताच पश्चाताप नाही. 

पोलीस आत्ता त्याच्या घराची झडती घेवू लागले होते. कुठे काय सापडतय हा विचार करत असतानाचा समोरच्या कपाटावर त्यांना दूसरी चिठ्ठी सापडते. त्यावर लिहलेलं असतं. 

पत्रात ज्या शंभर मुलांचा उल्लेख केला आहे त्या सर्व मुलांचे हे फोटो. मी त्या सर्व मुलांचे तुकडे करुन अॅसिडमध्ये जाळले आहेत. मी आत्ता रावी नदीत आत्महत्या करायला चाललो आहे. मला पश्चाताप होतं नाही. माझ्या कृत्याबद्दल मी माफी मागणार नाही… 

हि गोष्ट जावेद इक्बालची.

जावेद इक्बाल हा पाकिस्तानच्या आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठ्ठा सायको किलर म्हणून ओळखला जातो. लाहोरच्या गल्यांमध्ये राहणाऱ्या या क्रुर माणसाने लहान मुलांना सावज केलं त्यांना अॅसिडमध्ये जाळलं आणि अखेर स्वत:च गुन्हाची कबुली देवून आत्महत्या केली. 

जावेद इक्बाल २० वर्षांचा होता. एका मुलीवर त्याच प्रेम होतं पण त्या मुलीने जावेदवर बलात्काराची खोटी केस दाखल केली. जावेदला २० व्या वर्षी अटक करण्यात आली. घरी फक्त जावेदची एकटी आईच असायची. त्या आईने आपल्या मुलाची सुटका करण्यासाठी जंग जंग पछाडलं. आईच्या जवळ असणाऱ्या जावेदला आपल्या आईची हतबलता दिसत होती. त्याची आई पोलीस स्टेशन आणि कोर्टाच्या पायऱ्या चढत होती.

शेवटच्या दिवशी त्याची आई कोर्टात आली नाही. त्याला निर्दोष सोडण्यात आलं. जावेद घरी गेला तेव्हा त्याची आई त्याला सोडून गेल्याची बातमी समजली. 

घरात एकट्याच असणाऱ्या आईला झालेला त्रास त्याला सहन झाला नाही. त्याच्या सायको होण्याची हिच वेळ होती.  माझ्या आईला जो त्रास झाला तोच मी प्रत्येक मुलाच्या आईला देणार अस त्यानं ठरवलं. लाहोरच्या त्या छोट्याशा गल्लीत त्याने पहिलं दूकान काढलं ते व्हिडीओ पार्लरचं. लहान मुलांना व्हिडीओ गेमींगचा शौक त्याने लावला. 

जशीजशी गर्दी वाढू लागली तसे त्याने सावज शोधायला सुरवात केली. तो व्हिडीओ पार्लरमध्ये १०० रुपयांची नोट टाकायचा. एखाद्या मुलाला पडलेली नोट दिसली की तो लहान मुलगा ती नोट खिश्यात टाकायचा. अचानक चोरी झाली शंभर रुपये चोरले म्हणून तो प्रत्येक लहान मुलाकडे पैसे शोधायचा. ज्याच्याकडे नोट सापडेल त्याला व्हिडीओ पार्लरच्या पाठीमागच्या खोलीत घेवून जायचा. त्याच्यावर बलात्कार करायचा. त्यानंतर तो त्यांना मारून टाकायचा. 

लहान मुलगा घरातून बाहेर पडला पण तो परत आलाच नाही म्हणून मुलगा हरवल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली जायची. 

हिकडे पोलीसांच्या हाताला पुरावा लागू नये म्हणून आपल्या रावी नदीच्या काठी असणाऱ्या घरात तो बॉडी घेवून जायचां. तिथे त्यांचे बारीक तुकडे करुन एक एक करुन अॅसीडमध्ये जाळून टाकायचां. व्हिडीओ पार्लरमधून मुले बिघडतात, ते पैशासाठी घर सोडून फरार होता असा समज झाल्यानंतर पालकांनी आपल्या मुलांना व्हिडीओ पार्लरमध्ये सोडनं बंद केलं. त्याच्यावर संशय येवू नये म्हणून त्याने व्यवसाय बदलला.

Screen Shot 2019 02 02 at 1.04.08 PM
Facebook

पुढे लाहोरच्याच दूसऱ्या भागात त्याने अॅक्वेरियम चालू केलं. रंगेबिरंगी मासे विकण्याचं दूकान पाहून पुन्हा लहान मुले त्याच्या दूकानात गर्दी करु लागले. शाळा चुकवून दूकानात आलेल्या मुलाला तो अलगत जाळ्यात पकडत गेला… 

त्याचा हा क्रुरपणा असाच चालू होता. पण एकदिवस त्यानेच एका वर्तमानपत्राकडे चिठ्ठी पाठवून आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. घरातून तो फरार झाला. 

पोलीसांनी त्यांच्या घराची झडती घेतली आणि पोलीस थेट तो जिथे आत्महत्या करणार होता त्या ठिकाणावर पोहचले. तिथे काहीच सापडलं नाही. त्याच्याशी संबधीत असणाऱ्या माणसांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं. आपला मुलगा घर सोडून गेला, हरवला अस वाटणाऱ्या पालकांना त्यांच्या मुलासोबत घडलेली घटना समजली. संपुर्ण पाकिस्तान या घटनेमुळे हादरला. अखेर पोलीसांना त्याचा माग लागला. तो लपून बसलेल्या ठिकाणी पोलीसांनी छापा मारला. 

१६ मार्च २००० साली कोर्टाने त्याला शिक्षा सुनावली, 

जावेद इक्बाल याला १०० लहान मुलांचा बलात्कार आणि खून केल्याप्रकरणी २० वेळा गळा दाबून मारुन टाकण्याचा आदेश देत आहे. त्याच्या मृत्यूनंतर त्याचे १०० तुकडे करण्यात यावेत अस कोर्टाने सांगितलं.तरिही जावेद इक्बालच म्हणणं होतं, मला कोणतिही शिक्षा द्या पण मी माफी मागणार नाही आणि मला त्या घटनेचा पश्चाताप देखील होत नाही. 

दिनांक ८ ऑक्टोंबर २००१. 

लखपत जेलमध्ये त्याने आत्महत्या केल्याची बातमी आली. पोलीसांनी सांगितलं की त्याने बॅडशीटने फास लावून घेवून आत्महत्या केली. काही लोकं म्हणाले त्याचा जेलमध्येच खून करण्यात आला. त्याच्या मृत्यूनंतर त्याच प्रेत घेण्यासाठी मात्र कोणीही आलं नाही. 

हे ही वाचा.

Leave A Reply

Your email address will not be published.