बायको सोडून गेली म्हणून सिरीयल किलर झाला आणि 16 महिलांचा मर्डर केला….

सिरीयल किलर हा एक वेगळा आणि बऱ्याच जणांना इंटरेस्टिंग वाटणारा विषय आहे. रमण राघव असो किंवा ऑटो शंकर असे सिनेमेसुद्धा सिरीयल किलर लोकांवर येऊन गेले. आजचा किस्सा अशाच एका सिरीयल किलरचा आहे ,एका साध्या घटनेतून त्याने 16 महिलांना यमसदनी धाडलं. तर जाणून घेऊया काय किस्सा झाला होता.

मैना रामुलू नावाचा एक तरुण होता. तेलंगणाच्या सांडी रेड्डी नामक जिल्ह्यातल्या कंडी मंदिरात त्याचा जन्म झाला होता. जस जसं वय वाढत गेलं तस तस मैना रामुलुचं मन तिसऱ्याच गोष्टीत लागायला लागलं मग यावर त्याच्या आईवडिलांनी एक लोकल आणि उपयुक्त असा युनिव्हर्सल उपाय काढला तो म्हणजे पोराचं लग्न लावून द्या…मैना रामुलुचं लग्न लावून देण्यात आलं तेही वयाच्या 21 व्या वर्षी. काही दिवस सुखाचे गेले आणि मग अचानक भयानक मध्ये त्याची बायको एका भलत्याच पुरुषाबरोबर राहू लागली. हे काय मैना रामुलुला पटलं नाही. किती दिवस तो तिला समजावत राहिला पण ती सुद्धा डेंजर होती ती मैना रामुलुच्या बेरोजगार पणाला वैतागलेली होती.

आता मैना रामुलू पिसाळला आणि बायको सोडून गेल्याच्या रागातून तो दुसऱ्यांच्या बायकोला ठार करू लागला. बायको आपल्याला सोडून परपुरुषाबरोबर राहते हे काय त्याला पटत नव्हतं आणि त्याचा त्याला जबर धक्का बसला होता. 2003 सालापसून ते आजवर मैना रामुलुने 16 महिलांच्या हत्या घडवून आणल्या. त्याची ही सिरीयल किलिंगची सिरीज अख्या तेलंगणाला हादरवून गेली आणि काहीच दिवसात मैना रामुलू हा तेलंगणाचा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार बनला.

2011 साली मैना रामुलुला अटक करण्यात आली आणि कोर्टाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आणि सोबतच 500 रुपयांचा दंड सुद्धा ठोठावला.

1 डिसेंबर 2011 रोजी एरागड्डा मधील एका मेंटल हॉस्पिटलमध्ये मैना रामुलुला चेकिंगसाठी नेण्यात आलं पण शांत बसेल तो मैना रामुलू कुठला ह्या गड्याने तिथले अजून 5 रुग्ण नादाला लावत तिथून त्या 5 रुग्णांना घेऊन पळून गेला. पळून गेल्यावर रामुलुने अजून 5 महिलांची हत्या केली.

13 मे 2013 साली मैना रामुलुला पोलिसांनी अटक केली पण हायकोर्टाने त्याला 2018 साली सोडून देण्याचा आदेश दिला. आता बाहेर आल्यावर मैना रामुलुने परत 2 हत्या घडवल्या, 10 डिसेंम्बर 2020 साली एका महिलेला फसवून तिला दारू पाजून तिच्याकडून पैसे वैगरे लुटून त्याने नेले. त्याच्यावर चांदी चोरीच्यासुद्धा बऱ्याच केसेस होत्या.

शेवटी 26 जानेवारी 2021 रोजी मैना रामुलुला पकडण्यात आले आणि त्याला जेलात डांबण्यात आले. बायको सोडून गेल्याचा राग मैना रामुलू सिरीयल किलर बनून असा काढील यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही पण सगळ्या तेलंगणाला मैना रामुलुने हादरवून टाकलं होतं.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.