“ठग बेहराम” असा ठग होता ज्याने फक्त रुमालाने ९३१ लोकांची हत्या केली होती..

‘ठग बेहराम’

ठग बेहराम या माणसाने एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात आपल्याकडील पिवळ्या रंगाच्या रुमालाने ९३१ लोकांची गळा घोटून हत्या केली होती. लोकांची हत्या केल्यानंतर तो त्यांच्याकडील मौल्यवान वस्तूंची लुट करत असे.

त्याच्या याच कारनाम्यामुळे ‘सीरिअल किलर’ म्हणून तो जगभरात कुख्यात होता. भारतात ठगांचा म्होरक्या अर्थात ‘किंग ऑफ ठग’ म्हणून देखील तो ओळखला जात असे.

त्या काळातल्या या खुनी टोळ्यांवर अनेक पुस्तकं प्रकाशित आहेत, ज्यामध्ये ठग बेहराम विषयी वाचायला मिळत. जेम्स पॅटोन यांनी देखील लिहून ठेवलंय की बेहरामला पकडून आणल्यानंतर ज्यावेळी त्याने केलेल्या हत्यांची कबुली दिली त्यावेळी ते तिथे उपस्थित होते. माईक डॅश यांनी देखील आपल्या ‘ठग’ या पुस्तकात याविषयी सविस्तर लिहिलंय.

१७६५ साली जन्मलेल्या ठग बेहराम याने लुटारूंची टोळी बनवली होती.

या टोळीचा तो प्रमुख होता. अठराव्या शतकाच्या शेवटीपासून ते एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला या टोळीने क्रूरतेची परीसिमा करत हजारो लोकांच्या हत्या करून त्यांना लुटलं होतं, त्यातल्या ९३१ हत्या तर एकट्या बेहराम यानेच केल्या होत्या. १८४० साली वयाच्या ७५ व्या वर्षी त्याला पकडून फाशी देण्यात आली होती.

behram4ठग बेहराम आणि त्याच्या टोळीची इतकी दहशत होती की इंग्रज अधिकारी देखील त्यांना घाबरत असत. भारतातून अनेक यात्रेकरू आणि व्यापाऱ्यांचे जत्थेची जत्थेचं गायब होण्याच्या बातम्या इंग्लंडमध्ये पोहोचल्या त्यावेळी इंग्रज सरकारने प्रकरणाची चौकशी करून लुटारूंना शोधण्यासाठी एक पाच सदस्यीय समिती भारतात पाठवली होती.

या समितीला ठगांच्या टोळीचा पत्ता तर लागलाच नाही, उलट या टोळीने या पाचही सदस्यांची हत्या घडवून आणली होती.

ठग बेहराम आणि त्याच्या टोळीची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली होती. व्यापारी लोकांनी जीवाच्या भीतीने प्रवास करणं बंद केलं होतं. अशा परिस्थितीत ठग बेहरामला पकडण्याची जबाबदारी कॅप्टन विल्यम स्लीमनवर सोपविण्यात आली. भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून आलेल्या लॉर्ड बेन्तिक याने स्लीमनला पूर्ण मोकळीक दिली. सोबतीला फौज दिली आणि काहीही करून ठग बेहरामला जेरबंद करायला सांगितलं.

William Henry Sleeman
कॅप्टन विल्यम स्लीमन

कॅप्टन विल्यम स्लीमनवर जेव्हा ठग बेहरामला जेरबंद करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली त्यावेळी त्यावेळी स्लीमनकडे ठग बेहरामचं नांव एवढीच त्याच्याविषयीची माहिती होती. स्लीमनने सर्वात आधी आजूबाजूच्या परिसरात आपली गुप्तचरांची टीम पेरली आणि माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला.

पण त्याचा काहीही फायदा होत नव्हता. बेहरामला पकडण्याच्या अनेक प्रयत्नात त्याला अपयश आलं होतं. शेवटी बेहरामचा एक साथीदार ठग अमीर अली विल्यमच्या हाती लागला.

अमीर अली याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या मदतीने  जवळपास १० वर्षांच्या प्रयत्नांनंतर विल्यम स्लीमन यांना ठग बेहरामला पकडण्यात यश आलं. पकडण्यात आल्यानंतर कैदेत असताना त्याने आपण केलेल्या हत्यांची कबुली दिली. त्यानंतर त्याला फाशी देण्यात आली.

हे ही वाचा –  

Leave A Reply

Your email address will not be published.