लोखंडी टाक्या आणि टायरचं रिसायकलिंग करून तरुणानं फर्निचरचा व्यवसाय सेट केलाय

टाकाऊ वस्तू पासून टिकाऊ वस्तू हे वाक्य ऐकायलाच मिळत पण आपल्या पैकी किती जण या वाक्या प्रमाणे काम करतात हे काही वेगळं सांगायला नको. मात्र धुळे जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या मुलाने डोक्यालिटी लढवत टाकाऊ वस्तू पासून फर्निचर बनवून आपल्या व्यवसाय सेट केला आहे.

आपण बनविलेल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण देशभर पोहचविण्यात हा तरुण यशस्वी झाला आहे. देशातील कॅफे, रेस्टोरंट, हॉटेल, फार्म हाऊस आणि ऑफिस अशा ५०० ठिकाणी आपल्य त्याच्या कंपनीत टायर, टाकी अशा टाकाऊ वस्तू पासून तयार केलेले फर्निचर वापरले जात आहे.  

टायर, लोखंडी टाक्या, कार, मोटारसायकलच्या सुट्या भागापासून सोफा, खुर्ची, वॉश बेसिन, हँगिंग लाईट तयार केले आहेत. 

ही गोष्ट आहे २९ वर्षीय प्रदीप जाधव या तरुण व्यावसायिकाची.

 प्रदीप जाधव हा तरुण शेतकरी कुटुंबातून येतो. मोठा भाऊ इंजिनियर, दुसरा भाऊ फोटोग्राफर आहे. 

प्रदीप जाधव या स्टार्टटपचे नाव ‘Gigantiques’ आहे. या अंतर्गत इंडस्ट्री मधील वेस्ट म्हणजेच टाकाऊ वस्तू  घेऊन त्याचे रिसायकलिंग करतात. यातून ते फर्निचर आणि घरातील सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तू बनवितात. कापड, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स आदी कंपन्यांतून येणाऱ्या कचऱ्याला इंडस्ट्रियल वेस्ट म्हटले जाते. 

केवळ ९.३० ते ५.३० नोकरी करून आपले भागणार नाही याची कल्पना प्रदीपला अगोदरपासूनच होती. धुळे जिल्ह्यातील दलवाडे गावात प्रदीपचे प्राथमिक शिक्षण झाले. त्यानंतर त्यांनी आयटीआय (ITI) ला ऍडमिशन घेतले. तसेच शिक्षणाबरोबर तो शिकत असलेल्या कॉलेजच्या बाहेर पुस्तकांचे दुकान सुद्धा सुरु केले होते. 

त्याच बरोबर गावातील शेतकऱ्यांना डीप इरिगेशनचे काम सुद्धा करून तो देत. मात्र या दोन्ही व्यवसायात त्याला म्हणावे तसे यश मिळाले नाही. आयटीआय नंतर प्रदीप ने डिप्लोमाला ऍडमिशन घेतले होते. त्यानंतर त्याला एक कंपनीत नोकरी सुद्धा मिळाली होती. 

प्रदीपने नोकरी बरोबरच मैकेनिकल इंजिनीरिंगला ऍडमिशन घेतले होते. २०१६ मध्ये इंजिनीरींगचे शिक्षणपूर्ण झाल्यानंतर त्यांनी पुणे गाठले. पुण्यात आल्यावर प्रदीपला फोक्सवॅगन कंपनीत काम मिळाले होते. एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर प्रदीपने हायर कंपनीत नोकरी सुरु केली.

दरम्यान प्रदीपला कंपनी मार्फत चीन येथे पाठविण्यात आले. चीन मध्ये एक महिना राहिल्यानंतर चिनी लोकांचे जुगाड पाहून आपण पण अशा प्रकारे काही तरी वेगळे करायला पाहिजे हि गोष्ट प्रदीपला स्वस्थ बसू देत नव्हती. 

मात्र अनेक प्रयोग केल्यानंतर प्रदीपला हाती काही लागत नव्हते. नवीन काही करता येईल का याचा शोध सुरुच होता. एक दिवस मोबाईलवर युट्युब पाहतांना आफ्रिकेतील एक व्हिडीओ प्रदीपच्या नजरेस पडला. त्यावेळी एक जण टायर पासून आर्कषक खुर्ची तयार करत होता. हा धागा पकडून प्रदीपने कामाला सुरुवात केली. 

यानंतर त्यांनी अधिक रिसर्च केला. इंडस्ट्रियल वेस्ट पासून काय-काय करता येईल याचा ते शोध घेत होते. यातूनच टाकाऊ वस्तू पासून फर्निचर ही संकल्पना त्यांच्या डोक्यात आली. 

३५० स्क्वेअर फुटच्या वर्कशॉप मध्ये सुरुवात केली होती. आता १० हजार स्क्वेअर फुटच्या वर्कशॉप उभं केलंय. 

प्रदीप रोज सायंकाळी साडे पाच वाजता कंपनीतुन परत आल्यानंतर टाकी, टायर जमा करून त्यावर काम करत. हळूहळू यात आपल्याला यश येत हे कळाल्यावर पुण्या शेजारील कोरोगाव भीमा येथे  ३५० स्क्वेअर फुटाचे लहानशे वर्कशॉप भाड्याने घेतले आणि कामाला सुरुवात केली. 

२०१८ मध्ये प्रदीप जाधव यांनी आपली कंपनी रजिस्टर केली आहे. तेलाच्या टाकीपासून बनविलेले फर्निचर प्रमोशनसाठी फेसबुकवर टाकले. याला लवकरच रिस्पॉन्स मिळाला. पुण्यात नऱ्हे भागातील एका कॅफे मालकाने फर्निचरची ऑर्डर दिली. 

नोकरी करत असतांना त्यांनी हे फर्निचर तयार केले होते. मात्र त्यानंतर प्रदीपने कधीच मागे वळून बघितले नाही. आता कंपनीचे वर्कशॉप वाघोलीत असून ते १० हजार स्क्वेअर फुटचे आहे. 

प्रदीप जाधव यांच्या कंपनीच्या फर्निचरला पुण्याबरोबरच  मुंबई, दिल्ली, बंगलोर, चैन्नई,आसाम सारख्या भागातून मागणी असल्याचं प्रदीप जाधव सांगतात. तसेच क्रिएटिव्ह असणाऱ्या लोकांकडून टायर, टाकी पासून बनणाऱ्या फर्निचरला मोठी मागणी असल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले.

 २०१९ मध्ये प्रदीप जाधव यांनी नोकरी सोडली आणि पूर्णपणे व्यवसायात झोकून दिले. एकट्याने सुरू केलेल्या व्यवसायात आता त्यांच्याकडे १५ पेक्षा अधिक कामगार आहेत. आता पर्यंत ५०० पेक्षा अधिक ठिकाणी फर्निचर पोहचविले आहे. काही ठिकाणी घराच्या सजावटीत भर घातली आहे तर काही कॅफे, हॉटेल मध्ये फर्निचर दिले आहे. 

प्रदीप फर्निचर बनवतांना जुने टायर, टाक्या, कार आणि मोटारसायकलच्या भागापासून बनवितात. आपल्या व्यवसायातून प्रदीप हे ग्राहकांना वेगळ्या, आर्कषक वस्तूंबरोबर चांगले, टिकाऊ वर वस्तू देतंच आहे. महत्वाचं म्हणजे पर्यावरण पूरक काम करत आहे.  

बोलभिडुशी बोलतांना प्रदीप जाधव म्हणाला,

जुन्या टायर पासून वस्तू बनवायला सुरवात केली होती. त्यानंतर लोखंडी टाक्या, मोटारसायकल आणि कारच्या सुट्या भागापासून फर्निचर तयार केले. आता पर्यंत १ लाखांपेक्षा जास्त टाक्या, ५० हजार टायर आदींचा वापर फर्निचर बनविण्यासाठी करण्यात आला आहे.

या कामाची सुरुवात ही थोडीही अवघड होती. सगळं काम नवीन होत. मात्र मी मागे हटलो नाही. दिवसरात्र मेहनत करून व्यवसाय उभा केला.वेगळे काही तरी करायचं हा भावनेतून हा व्यवसाय सुरु केल्याचं प्रदीप सांगतो. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.