कधी हेडहंटिंगमुळे कुख्यात असलेला हा समाज आज नागालँडमध्ये मारला जातोय

सुरक्षा दलांकडून झालेल्या सात कामगारांच्या हत्येमुळं नॉर्थ-ईस्ट पुन्हा पेटलयं . हत्येनंतर झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत आठ नागरीकांचा मृत्यू झालाय. हे सर्व कोंयाक आदिवासी जमातीतील आहेत.

राज्यातील मोठ्या जमातींपैकी एक असणारे कोंयाक आदिवासी पुन्हा चर्चेत आलेत.  जवळपास ३ लाखाच्या घरात यांची लोकसंख्या आहे. नागालँड बरोबरच अरुणाचल परदेश आणि सीमेपलीकडे म्यानमारमध्येही या जमातीचे लोक राहतात. सरकार आणि नागा बंडखोर यांच्यात ज्या वाटाघाटी चालू आहेत त्यात या समाजाचे स्थान महत्वपूर्ण आहे.

कोंयक जमात कधीकाळी हेडहंटिंग या प्रथेमुळे कुख्यात होती.

आता हेडहंटिंगचा अर्थ अजूनही तुम्हाला कळलं नसेल तर ऐका. हेडहंटिंग म्हणजे युद्धात शुत्रचं डोकं कापून ते ट्रॉफी म्हणून घरी घेऊन येणे . होय कधीकाळी ही प्रथा नॉर्थ-ईस्ट मधील अनेक कबिल्यांमध्ये होती. जंगल आणि जमिन यांच्या मालकी हक्काच्या वादामुळे अनेक वेळा या जमाती समोरासमोर येत असत आणि मग होत असे तुंबळ कत्तल.

युद्धात जो सगळ्यात जास्त डोकी घरी घेऊन येत असे तो सगळ्यात शूर.

मग अश्या कवट्या घरात ट्रॉफी म्ह्णून सजवून ठेवल्या जात. आजही अनेक घरात असा कवट्यांचा ढीग पाहायला मिळतो.

आता हे आदिवासी असतातच खुंकार अशे  कायतरी अकलेचे ताडे तोडण्याआधी आपल्या पूर्वजांनीही किती रक्तपात केलाय हे थोडं लक्ष्यात राहू द्या.

कोंयाक जमातीमध्ये १९८० पर्यंत हेडहंटिंगचे प्रसंग घडल्याचे सांगितलं जातं. मात्र त्यांनतर या कबिल्याने हि प्रथा पूर्णपणे सोडली असल्याचे आढळते.  बाहेरील जगाशी संबंध आल्यानंतर कोंयाक समाजात बदल होत गेले. एकोणिसाव्या शतकात ख्रिश्चन मिशनरीजनि कोंयाक समाजात धर्म आणि शिक्षण यांचा प्रसार करणाया सुरवात केली. तसेच १९३० मध्ये ब्रिटिशांनी हेडहंटिंगवर घातलेल्या बंदीचे समाजावर दूरगामी परिणाम झाले. आता हा समाज बऱ्यापैकी मेनस्ट्रीम झालेला आहे. 

हेडहंटिंग बरोबरच अजून एका गोष्टीसाठी कोंयाक आदिवासी ओळखले जातात ते म्हणजे त्यांचे टॅटू. 

युद्धात केलेल्या हेडहंटिंगची आठवण म्ह्णून सुरवातीला कोंयाक योद्धे टॅटू गोंदवून घेत असत. मात्र हेडहंटिंगवर घातलेल्या बंदीनंतर गोंदण्याच्या पद्धतीतही बरेच बदल झालेत.  आता टॅटू कोंयाकांच्या समृद्ध संस्कृतिची साक्ष देतात. त्यातल्या त्यात कोंयाक स्त्रिया या टॅटू गोंदवण्यात एक्सपर्ट आहेत. 

पुरुषांच्या अंगावर त्याचे लहानपणापासून वयात येईपर्यंत केले जाणारे संस्कार, युद्धातील कामगिरी टॅटूमध्ये गोंदवली जाते. तर स्त्रीयांच्या टॅटूमध्ये त्याच्या आयुष्यातले विविध टप्पे. त्यांचे ते अंगभर टॅटू तसेच रंगेबेरंगी पेहराव याच्या मागे मोठा अर्थ समावलेला असतो.  

एकदा का या टॅटूंमागील अर्थ समजला कि कसलं भारी आहे हे! अस म्हटल्याशिवाय तुम्ही राहत नाही. 

नाहीतर नुसते बोट दाखवून हसण्यासारखे माकडचाळे करण्यात आपण पुढे.

कोंयाक समाज आज तुमच्या आमच्यांसारखं जगतोय. शेती करणं,खाणकामात रोजंदारीवर जाणं हे या समाजाचे प्रमुख व्यवसाय आहेत. सैनिकांच्या गोळीबारात ठार झालेले कोंयाक आदिवासीही आपलं दिवसभराचं काम उरकून घरी परतत होते. त्यामुळे त्यांच्या घरच्यांवर काय कोसळल असेल हे आपण समजु शकतो.

अश्या घटना जेव्हा घडतात तेव्हा आपल्याला आपल्या विविधतेने नटलेल्या विविध लोकांची माहीती कळते. पण हे विविध लोक शेवटी एकाच भारताचे नागरिक असतात. त्यामुळे कोंयाक समाजालाही  हेडहंटर्स म्हणून नाही तर तुम्हा आम्हा सारखे भारताचे नागरिक म्हणून लक्ष्यात ठेवालं हीच अपेक्षा.

   हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.