मला सेक्स एज्युकेशन मिळालं नाही, त्यामुळे माझा खूप वेळ वाया गेला.

काही चुका आयुष्यभर टिकतात. गुन्हा करणाऱ्या व्यक्तीला आपण गुन्हा करतोय याची जाणीव नसते मात्र एखादा गुन्हा झाल्यानंतर त्याची जाणीव होणं हे सगळ्यात वाईट आहे.

प्रेम करायचं म्हणूनच..

मी अशा घरात वाढले जिथे प्रेम नव्हतंच. माझ्या आईने माझ्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु मला ओढ होती माझ्या वडिलांच्या प्रेमाची. म्हणूनच मी नेहमी माझ्या जोडीदारामध्ये पुरुषाचं प्रेम शोधत राहिले. लहानपणी मी आजूबाजूला पाहिले की माझ्या वयाच्या किशोरवयीन मुलीसाठी कोणीतरी राजकुमार पांढऱ्याशुभ्र घोड्यावर बसून येईल अस वाटायचं. तशा कल्पनांची मला स्वप्न पडत रहायचं. कारण बॉलिवूडपासून ते परीकथांमध्ये तसच चित्र दिसायचं.

कॉलेजमध्ये बहुतेक मुलींचे बॉयफ्रेंड होते. कॉलेजचा कार्यक्रम असला कि मुली पार्लरला जायच्या. सुट्टीच्या दिवशी होस्टेलच्या गच्चीवर कार्यक्रम रंगायचा, सर्व मुली केसांना हिना मेहंदी लावायच्या. मी मात्र इतर पोरींच्या केसांना मेहंदीच्या लावत बसायचे, कारण मी नटून कोणासाठी तरी जावं अस माझ्या आयुष्यात कोणी नव्ह्तच. पोरांसाठी मी सुंदर नव्हते.

स्वतःला सिद्ध करायचं म्हणून मी मी चॅट रूमची मदत घेतली.

मला कोणीतरी अटेन्शन देईल म्हणून कित्येक तास अनोळखी लोकांशी गप्पा मारल्या. पुरुष सापडले ते तिशी पार झालेले. १९ वर्षांची मी त्या ३० वर्षांच्या पुरुषांना डेट करत बसले. उगीच रोमँटिक व्हायचं, डोळ्यात डोळे घालून पाहायचं हे सगळे प्रकार मी केले.

एवढं सगळं करूनसुद्धा मनासारखा प्रियकर मिळत नाही म्हटल्यावर एकदा माझा दूरचा चुलत भाऊ मला हॉस्टेलमध्ये भेटायला आला तेव्हा मी सर्वांना सांगितले की हा माझा प्रियकर आहे. खूप वेळा मी फोनवर तासन् तास बोलण्याचे नाटक केले. मी सिंगल नाहीये, मिंगल आहे हे दाखवण्यासाठीचा हा सगळा खटाटोप चालत होता.

ग्रॅज्युएशन झालं आणि पुढच्या कॉलेजमध्ये माझा चान्स लागला.

कारण वर्गात मुलं होती १०० आणि मुली फक्त ७. “अपना टाईम आयेगा” यावर माझा पक्का विश्वास बसला. कारण ७ पैकी निम्म्या त्यांच्या शाळेपासूनच प्रेमात होत्या. त्यामुळे माझा नंबर लागणारच याची मला खात्री होतीच. मला चक्क दोन प्रपोज आले. मी हवेत उडतच होते. जास्त वेळ न दवडता मी माझी सेटिंग उरकून टाकली. कारण अगदी पहिल्यांदा मासिक पाळी आली तेव्हापासून मी या क्षणाची वाट बघत होते. तरीपण घोड अडलंच, कारण माझ्या बॉयफ्रेंडला लग्नाची कमिटमेंट नको होती.

सावित्रीने सत्यवानाला परत मिळवण्यासाठी जसा दृढ निश्चय केला होता, तसाच मीपण केला. फरक एवढाच कि सावित्रीने व्रत केलं आणि मी sex.

मला वाटलं शारीरिक संबंध ठेवले, सेक्स केला कि तो मला कधीच सोडून जाणार नाही, माझ्याशी लग्नसुद्धा करेल. पण मी चुकलेच, तो मला सोडून गेला. मी आतून कोसळून गेले. याचा राग मी माझ्याच शरीरावर काढलाय हाताची नस कापून घेतली. ब्रेकअपनंतर मला भीती वाटायला लागली.

मी गरोदर आहे का? आणि जर असले तर या बाळाची जबाबदारी कोण घेणार?

रक्त बंबाळ झालेला हात, पाण्याने डबडबलेले डोळे आणि थरथरले ओठ घेऊन मी पुण्याच्या प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञांकडे गेले. स्त्रीरोगतज्ज्ञांना संशय आला, तिने मला हातावरचा रूमाल काढायला सांगितलं. मी भीतीने थरथर कापत होते. त्यावेळी मला प्रेमाचा स्पर्श हवा होता, प्रेमात नाकारले गेले तरी ते सहन करायची शक्ती हवी होती. त्या कॅबिनमध्ये जाताना मला मायेचा हात हवा होता, माझं ब्रेकअप झालय हे कळल्यावर माझ्या वडिलांनी मला जवळ घ्यावं आणि म्हणावं सगळं ठीक होईल एवढीच इच्छा होती.

पण झालं काय तर, मला झिडकारलं गेलं. मी माझ्या आयुष्यातले निर्णय घेऊ शकत नाही हे माझ्यावर बिंबवलं गेलं. माझं लग्न लावण्यात आलं पण ते लग्न टिकलचं नाही, कारण त्यात प्रेम नव्हतं.

पण ते लग्न माझ्या पदरात एक मूल टाकून गेलं…

“लैंगिक शिक्षण ही काळाची गरज आहे”

आज मी 6 वर्षाच्या मुलाची सिंगल आई आहे, ज्याच्या वडिलांनी त्याला सोडून दिलय. प्रेम मिळवायच्या इच्छेचं हे भविष्य असत? फक्त प्रेम मिळावं म्हणून मी ज्या पुरुषांची निवड केली, तिथे मी चुकले का? तठस्थ राहून जेव्हा मी विचार करते तेव्हा असं वाटत कि जर मला योग्य वेळी योग्य निर्णय कसा घायचा हे कोणी शिकवलं असत तर मी या सगळ्यातून आज वाचले असते.

तरुण वयात मी एका व्यक्तीच्या सहवासाची अपेक्षा करत होते. पण तारुण्यपणात रोमॅंन्टिक भावनांच्या ऐवजी मला लैंगिकतेची गोष्ट म्हणून वापरण्यात आलं. मी एखाद्या मनुष्याच्या प्रेमात पडणं हे स्वाभाविक होतं पण तेव्हा तू सावध रहायला हवं हे सांगण्याची अपेक्षा मला वडिलांकडून होती.

पण मी माझ्या आई वडिलांना दोष देणार नाही. अत्यंत धार्मिक, नैतिक आणि लैंगिक अत्याचार करणारी आपली संस्कृती आहे. जिथे लग्न झालेली जोडपीसुद्धा SEX विषय़ी बोलू शकत नाहीत. मुलं होत नाही म्हणून इथे देवाला नवस बोलला जातो. स्त्रीयांना हस्तमैथुन करण्यास शिकवले जात नाही. स्त्रियांच्या शारिरिक भावनांची किंमत ठेवली जातं नाही. मुलांना पालकांकडून तितकेच प्रेम हवं असतं पण अगदी आई-मुलाचा स्पर्श देखील चुकीचा ठरवला जातो. माझी मैत्रिण सलमा, तिने तिझ्या वडिलांना आयुष्यभरात कधीही मिठी मारली नव्हती.

माझ्यासुद्धा वडिलांना मी आयुष्यात दोनदाच मिठी मारू शकले. एकदा माझ्या लग्नाच्या वेळी पाठवणी करताना आणि दूसऱ्यांदा जेव्हा मला क्षयरोगाने ग्रासले होते तेव्हा. माझ्या खोकल्यामध्ये जेव्हा रक्त दिसलं तेव्हा वडिलांनी मिठी मारली. तेव्हा मला वाटलं घाबरलेल्या चिमणीला घरटं मिळालं आहे.

संकुचित अशा त्या चार भिंतीमधून बाहेर यायची गरज आहे. जेणेकरून आई-वडीलच मुलांना योग्य मार्गदर्शन करू शकतील. जेव्हा माझा पाय घसरत होता, मी पुरुषांकडे, लैंगिकतेकडे आकर्षीत होत होते, तेव्हा माझ्या पालकांनी मला हात धरून सरळ मार्गावर आणायला हवं होत. लैगिक शिक्षण हि फक्त आजच्या तरुणांसाठी नाही तर पालकांसाठी सुद्धा काळाची गरज आहे.

कारण जग इतकं गोंधळलेले आहे. स्विझर्लंडला जाऊन गाणी म्हणत प्रेम करणं, गोव्याच्या किनाऱ्यावरच प्रेम करणं या सगळ्या गोष्टी प्रत्येकाला हव्याशा वाटतात. अशा अनेक गोष्टी सध्या उपलब्ध आहेत जिथे तुमची प्रेमाची भूक भागवली जाईल, या सगळ्यापासून अलिप्त राहणं हा एक टास्कच आहे.

मला लैगिक शिक्षण दिल गेलं नाही, ना माझ्या आई वडिलांना !

किशोरवयात होणारी गर्भधारणा आणि प्रेमभंगांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतीये. प्रत्येकाला आपली शारिरिक गरज पूर्ण करण्याची भूक आहे. हॉटेलमध्ये तासाच्या आधारावर जाणाऱ्या बिनलग्नाच्या जोडप्यांमध्ये वाढ होतीये. त्या हॉटेलमध्ये गेल्यावर आपल्यावर खिळलेल्या हॉटेल स्टाफच्या नजर अस भासवतात कि आपण खूप मोठा गुन्हा करतोय.

sex करणं हिच फक्त गरज असते काय?  तर sex नंतर एकमेकांशी बोलणं, एकमेकांची काळजी घेणं, प्रेमाने कुरवाळणे या गोष्टीसुध्दा महत्वाच्या असतात. हे आज हरवत चाललंय.

सेक्ससारख्या गोष्टी समजून घेण्यासाठी लैंगिक शिक्षण हा एक मार्ग आहे. व्यापक लैंगिक शिक्षणामुळे तरुणांना लैंगिकता केवळ एक कृती म्हणून नाही philosophy म्हणून समजते. हे शिक्षण जोडीदाराचा आदर करायला शिकवते. यातून हे लक्षात येत कि लैगिक शिक्षण दिल तर शरीर फक्त शारीरिक गरज भागवण्याची एक वस्तू नाहीये तर त्याला भावना आहेत, त्याला मेंदू आहे, त्यालाही व्यक्त व्हायचं असत.

 

मुळ स्टोरी लॉजिकट इंडियन“I Never Had Sexual Education & I Suffered From This Lack Of Information Big Time

5 Comments
  1. Akshay says

    Manya aahe sexual education navte koni prem karnari vyakti navti pan mhanje tuzya life madhe dusara kahich mahatwach navt kaay,
    Tuhi kuthetari chukalisach thodishi ka hoina

  2. Xx says

    लैंगीक शिक्षण देण्याईतका भारत आधुनिक झालेला नाही.
    ईतका आधुनिक भारत आपल्याला नको.

  3. Shivhari Dole says

    भिडू तुमच्या कडून खूप काही मिळत शिकण्यासाठी ज्याची खरंच समाजाला जास्त गरज आहे
    तुम्ही आमच्या साठी खूप काही नवीन गोष्टी घेऊन येतात त्या बद्दल
    विशेष आभार

  4. Dnyanesh says

    Don’t worry
    ethun pudhe nirnay japun ghene
    Anubhav shikvtat
    Prem krave pan sharirachi bhuk bhagvnyasathi prem kru naye

  5. mahesh kaspate says

    अगदी vastavta mandalit

Leave A Reply

Your email address will not be published.