जगात चर्चाय, सेक्स पॉवर वाढवायला कडकनाथ कोंबड्यासोबत हे प्राणी पण खातात !

आजकाल सेक्स पॉवर वाढवायला लोक काय काय खातील सांगता यायचं न्हाई. त्यातल्या त्यात फळ भाज्या खाऊन सेक्स पॉवर वाढत असल तर काय विषय न्हाई ओ. पण कसले पण प्राणी खाऊन प्राण्यांच्या जाती नष्ट करायला लागलीत ओ ही बेनी. बिछान्यात लैच हॉर्स पॉवर पाहिजे असल तर व्हायग्रा खावा की राव.

तर जाता जाता लैच खुमखुमी असलेली टाळकी काय काय खात्यात ते पण जरा वाचून जावा. 

काही सेक्सलंपट लोक असा विचार करतात की, प्राण्यांचं मांस खाण्याने किंवा चरबीचा वापर केल्यानं सेक्स पॉवर वाढू शकते. सेक्स पॉवरबद्दल लोकांचा ध्यास प्राण्यांच्या मृत्यूचे कारण बनतो. पण यात खरोखरच काही सत्य आहे का हे प्राणी व्यर्थ बळी पडतात ?

यात पहिला नंबर आहे सांडाचा

सांडा नावाचा एक सरीसृप वर्गातला प्राणी आहे. त्याला मराठीत काय म्हणतात ते काय घावायला नाही. हा प्राणी भारत आणि पाकिस्तानच्या उष्ण वाळवंटात सापडतो. लोक असा विचार करतात की त्याची चरबी वितळवून जे तेल निघत ते जर पुरुषाच्या शिश्नाला लावलं तर ते शिश्न खूप लांब होत. एवढच नाही तर लोक त्याच मांसही खातात.

आता माशाबद्दल बोलूया

स्वच्छ पाण्यात सापडणारा बिचारा डॉल्फिन. याला पण सोडला नाही राव. आपल्या गंगामाईच्या पोटात राहतो हा डॉल्फिन. त्याला गंगेची गाय पण म्हणतात. लोकांना वाटत की या माशाच्या चरबीच्या तेलाचा वापर करून पुरुषांचं शिश्न खूप लांब होत. आता काय वाढून वाढून काय फूटभर होणारे काय ते ? नाही..

तरी पण मस्ती म्हणून लोक त्याच मांस खातात. सरकारने त्याच्या शिकारवर पूर्णपणे बंदी घातली आहे, परंतु तरीही त्याची शिकार लपून केलीच जाते.

पुढचा नंबर आहे कासवाचा..

बिचाररर कासव गरीब प्राणी ओ. खरं या चवताळलेल्या लोकांनी कासवाला पण सोडलं नाही. कासवाच्या सुमारे १५  ते २० प्रजाती भारतात आढळतात. अलिकडच्या काळात काही प्रजाती पूर्णपणे नामशेष झाल्या आहेत. मुख्य कारण शिकार आहे. लोकांची सेक्सची भूक भागवण्यासाठी  कासवापासून औषध बनविली जातात. त्याच्या पाठीवरच्या कवचाच सूप बनवतात.

 पॅंगोलिन सबका बाप

याची संपूर्ण जगात सर्वाधिक तस्करी केला जातो. अतिशय मजबूत अशा या प्राण्याची शिकार दुसरा कोणताही प्राणी सहजपणे करू शकत नाही. नॅशनल जिओग्राफिकने दिलेल्या वृत्तानुसार, चीन आणि हाँगकाँगमध्ये पँगोलिनचा वापर जास्त होतो. भारतात पेंगोलिनची शिकार करण्यास पूर्णपणे बंदी आहे. पण शिकारी त्याची शिकार करतातच.

कडकनाथ नाम तो सुना होगा..

आपल्या कडकनाथ कोंबड्याचा रस्सा तर तुम्ही आम्ही सगळ्यांनी पिलाच असेल. या कोंबड्यावर काय बंदी नाही. उलट हा खावा म्हणून सरकार मागे लागलय. असं मानल जात की त्याच मांस खाल्ल्याने लैंगिक सामर्थ्य वाढत. आणि यामुळेच तो खूप महाग विकला जातो.

यूट्यूब वर तर असे हजारो व्हिडिओ आहेत जे असा दावा करतात की यानं सेक्स पॉवर वाढते. हे व्हिडिओ पाहून लोक पण या कोंबडीची मागणी करतात. पण हे खाण्याने सेक्स पॉवर खरोखरच वाढते का ? हे काय भिडूला माहित नाही बरं.

आता लिस्ट मधला शेवटचा आपल्या जंगलचा राजा वाघ. वाघ भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. वाघाच्या हाडांपासून बनविलेली वाइन, वाघांच पेनीस, वाघाच मांस, म्हणजेच वाघांशी संबंधित प्रत्येक गोष्ट पुरुषांचं पेनीस वाढवणारी मानली जाते. चीन, तैवान, थायलंडसारख्या देशांमध्ये या प्राण्याला खूप त्रास देऊन ठार केल जातं. भारतात वाघाच्या शिकारीवर बंदी आहे.

चीन रेडिओ इंटरनॅशनलसाठी काम करणारे भारतीय पत्रकार अखिल पराशर बीजिंगमध्ये राहतात  ते सांगतात,

चीनच्या काही दक्षिणेकडील भागात असा समज आहे की विशिष्ट प्रकारच्या प्राण्यांचे मांस खाल्ल्यानं किंवा रक्त पिल्यान लैंगिक शक्ती वाढते. तिथं टोफू देखील बदकाच्या रक्तापासून बनविल जात. परंतु हे संपूर्ण चीनच हे अन्न खातं अशातला काही भाग नाही. केवळ काही भागातच अशी परिस्थिती आहे.

त्यामुळं भयाकल्यागत काय बी खाऊ नगासा.. कोरोना कसा आलाय म्हाईताय नव्ह..आपलं भाजी भाकरी खाऊन बिछान्यात जोर काढा..लैत लै कडकनाथ चालतंय. 

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.