साधं इंजेक्शन द्यायचं माहिती नसतांना तो डॉक्टर भ्रूणहत्येच्या कत्तलखाना चालवायचा

राज्यात पुन्हा एकदा भ्रूणहत्येची घटना घडली आहे…वर्ध्यात अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणाचा तपास करता करता पाेलिसांना एक जबरदस्त धक्का बसला….ज्या अल्पवयीन मुलीचा हाॅस्पिटलमध्ये गर्भपात करण्यात आला, त्याच्यामागे असलेल्या जागेत खाेदकाम करताना मानवी कवट्या, रक्ताने भरलेले कपडे आणि गर्भपिशवी सापडली होती…त्यांनतर पोलिसांना काहीतरी ‘मोठं’ घडल्याचा संशय आला मग परिसरातील गाेबर गॅसच्या खड्ड्याची पाहणी केली असता, त्यातूनही छाेट्या बालकांच्या कवट्या आढळल्या…आणि मग ‘प्रकरण’ समोर यायला सुरुवात झाली..या तपासादरम्यान आतापर्यंत पोलिसांना एकूण ११ मानवी कवट्या, ५४ हाडे, आणि गर्भपिशवी सापडली आहे जी कि पोलिसांकडे जप्त आहे. 

प्रकरणाच्या सखोल तपासासाठी पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी विशेष पथकाची नियुक्ती केली आहे. या प्रकरणात आणखी काहींना ताब्यात घेणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली असून, हे प्रकरण पुढे काय वळण घेते याकडे आता लक्ष लागले आहे.

पण या घटनेच्या निमित्ताने संपूर्ण राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या राज्यात घडलेल्या इतरही घटना चर्चेत आल्या ज्याबद्दल बोल भिडूने लिहिलं हं त्याची लिंक देखील आम्ही खाली देऊच…

पण या वर्ध्याच्या प्रकरणावरून एका घटनेबाबत लिहावं म्हणलं…ती म्हणजे २०१७ मध्ये घडलेली म्हैसाळ भ्रूणहत्याप्रकरण.  

२०१७ च्या मे -जून महिन्याच्या दरम्यान सांगली, संपूर्ण राज्याला हादरवून सोडणा-या म्हैसाळ भ्रूण हत्याकांडप्रकरण समोर आले….मिरजेपासून दहा किलोमीटरवर म्हैसाळ हे कर्नाटक सीमेवरील गाव आहे. याच गावात हा भ्रूणहत्येच्या कत्तलखाना चालत होता.  

 या वेळेस तपासादरम्यान एका ओढ्यात प्लॅस्टिकच्या पिशव्यांत १९ अर्भकांचे अवशेष सापडले होते. यात पुरूष जातीच्या अर्भकांचाही समावेश होता. हे अर्भक जप्त केल्यानंतर त्या अर्भकांची डीएनए चाचणी करण्यात आली. पण त्यातले काही अर्भक कुजलेल्या अवस्थेत होते. म्हणून त्या एकूण अर्भकांपैकी ९ च अर्भकांचा अहवाल पोलिसांना मिळाला होता. त्यात ५ पुरूष जातीचे, तर ३ स्त्री जातीचे अर्भक होते. यावरून केवळ पैशासाठीच गर्भपात केला जात असल्याचे उघड झाले होते. तसेच त्या हॉस्पिटलमधल्या  कागदपत्रांच्या आधारे जोडप्यांची डीएनए तपासी करण्यात आली होती. 

पोलिसांनि दिलेल्या माहितीनुसार, दोन मुली असलेल्या गर्भवती महिलांचा शोध घेऊन, त्यांची कागवाड, विजापूर येथे सोनोग्राफी केली जात असायची. त्यानंतर अशा महिलेस म्हैसाळ येथे आणून गर्भपात केला जात असायचा. दहा ते पंधरा हजारासाठी संशयितांकडून हे कृत्य करण्यात येत होते. यात पुरूष जातीच्या अर्भकांचाही गर्भपात झाला होता. त्या-त्या महिलेचा गर्भ पाडून ते गर्भ टॉवेलमध्ये गुंडाळून त्याची सकाळी विल्हेवाट लावली जात असायची.

खरं तर हे प्रकरण तालुका तासगावच्या मणेराजुरी येथील स्वाती जमदाडे या पीडित विवाहितेमुळे  समोर आले होते. तिचा गर्भपातावेळी मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर भ्रूणहत्येचे हे मोठे रॅकेट उघडकीस आले होते.  

डॉ. बाबासाहेब खिद्रापूरे याच्या रुग्णालयात हा सगळा काळाबाजार चालू होता.

म्हैसाळ येथील डॉ. खिद्रापुरे याच्या हॉस्पिटलमध्ये अवैधरित्या गर्भपात केले जात असल्याचे उघड होताच पोलिसांनी रुग्णालयावर छापे टाकले. पोलिस तपासादरम्यान ओढ्यात १९ अर्भकांचे अवशेष प्लॅस्टिकच्या पिशव्यांत सापडले होते. खिद्रापुरे याच्या रुग्णालयातून कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली.

खिद्रापुरेला अटक केल्यानंतर या प्रकरणाचे जाळे कर्नाटकातील कागवाड, विजापूरपर्यंत पसरले होते याची माहिती आली होती. या प्रकरणाच्या तपासात कागवाड येथील सोनोग्राफी सेंटरवर पोलिसांनी छापा टाकला होता. या छाप्यात काही कागदपत्रेही जप्त करण्यात आली. या सोनोग्राफी सेंटरमधून केवळ डॉ. खिद्रापुरेच गर्भलिंग निदान करत नव्हता तर बेळगाव व कोल्हापूर जिल्ह्यातील काही रुग्णालयेही यात सहभागी असल्याचे समोर आले होतं. 

या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता प्रकरणाच्या तापासासाठी सात पथके नेमण्यात आली होती. 

म्हैसाळ भ्रूणहत्याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांत तक्रार नोंद झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक भारत शिंदे यांच्याकडे होता. त्यानंतर पोलिस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांच्याकडे तपास वर्ग करण्यात आला. या प्रकरणाच्या तपासासाठी सात पथके नेमण्यात आली होती. त्यात ७ पोलिस अधिकारी व ३० कर्मचा-यांची टीम होती.

या प्रकरणाचा तपस तब्बल ८९ दिवस चालू होता. अखेर तपासानंतर पोलिसांनी १४ जणांविरूद्ध १८०० पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. विशेष म्हणजे याप्रकरणाची गंभीरता व संवेदनशील लक्षात घेऊन हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, अशी मागणी पोलिसांच्यावतीने करण्यात आली होती. या खटल्यात तब्बल १४१ साक्षीदार होते, त्यातल्या ५५ जणांची साक्ष तर थेट न्यायाधीशांसमोरच नोंदविण्यात आली होती.  इतक्या मोठ्या प्रमाणात न्यायाधीशांसमोर जबाब घेण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच वेळ होती असं म्हणलं जातं.

या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेऊन राज्य महिला आयोगाने याची दखल घेतली होती. शिवाय केंद्रीय चौकशी समितीनेही चौकशी केली होती.

या खिद्रापुरेची स्टोरी संतोष पोळ सारखीच आहे…

भ्रूणहत्येच्या कत्तलखाना चालवणाऱ्या खिद्रापुरेने. बीएचएम पदवी घेतल्यानंतर स्वतःचं हॉस्पिटल कुठे काढायचे, असा त्याला प्रश्न पडला. मग त्याने म्हैसाळ गाव निवडले आणि एका लहानशा गाळ्यात स्वतःचं क्लिनिक सुरु केलं. यातून फारशी काही कमाई होत नव्हती आणि मग तो कर्नाटकातील्या  काही डॉक्टरांच्या संपर्कात आला….. आधीच समाजात एक राक्षस मानगुटीवर असतोच तो म्हणजे, वंशाला मुलगा पाहिजे, अन याच राक्षसाची त्याने मदत घेतली अन आपलं गर्भपात केंद्रच सुरू केले.

जवळ ना स्त्री-रोगतज्ज्ञची पदवी नव्हती, गर्भपात व सोनोग्राफी तपासणीचे ज्ञान नव्हतं, हे जाऊच द्या पण साधे इंजेक्शन हातात धरायची परवानगी नसताना, केवळ होमिओपॅथीची ‘डॉक्टर’ची पदवी घेऊन  तो सलग आठ वर्षे महिलांच्या जिवाशी खेळत होता…जेंव्हा त्याचे प्रकरण समोर आले अन तपासात फक्त १९ मृत अर्भके सापडली…पण काय माहिती अशा कितीतरी जीवांना त्याने या जगात येण्याआधीच मारून टाकलं असावं त्याची गणतीच नाही…

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.