ताजमहाल बांधणारा शहाजहान औरंगजेबा पेक्षाही कट्टर, धर्मांध आणि असहिष्णू सुलतान होता

आपण शहाजहानला ओळखतो…. कारण शहाजहानच्या कारकीर्दीत मोठ-मोठ्या सुंदर वास्तू उभ्या राहिल्या. आग्र्याचा यमुनाकाठचा ताजमहाल म्हणजे जगाच्या इतिहासातली मानवाच्या कलाकृतीतील एक आश्चर्यच मानले जाते. याखेरीज आग्र्याच्या किल्ल्यातील दिवाण-इ-खास तसेच मोती मशीद याही नजरा खिळवून ठेवणाऱ्या वास्तू उभ्या केल्या. वास्तु निर्मितीच्या शौकाच्या तुलनेने कमी असला तरी शहाजहानला नृत्य-गायन, चित्रकृती आणि कलाप्रेमी प्रकारांमध्ये सुद्धा रस होता.

या सगळ्याचा पाठपुरावा करण्यात त्याला कधी इस्लामच्या शिकवणुकीची अडचण वाटल्याच आढळत नाही.

त्याच्या दरबारात विद्वानांना आश्रय मिळायचा पण हे विद्वान बरेचसे मुसलमानी फारसी अरबी भाषेचे पंडित असायचे. तर काही हिंदूंनीही त्याच्या कृपाछत्राखाली ज्ञानसाधना साहित्यसेवा केली.

पण आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळातच शहाजहान कट्टर आणि असहिष्णू मुसलमान सुलतान होता असं दिसतं.

आजोबा अकबर, वडील जहांगीर या बादशाहांनी हिंदू राजकन्येशी विवाह करून हिंदूंना बादशाही दरबारात स्थान देण्याचे धोरण
शहाजहानने पुढे चालवले नाही. त्याने स्वतः तर तसा एखादा विवाह केलाच नाही. पण केव्हा घराण्यातील एखाद्या पुरुषाला त्याच्या घरी लग्नाची गरज वाटली तर त्या येणाऱ्या हिंदू मुलीला पहिल्यांदा इस्लामची दीक्षा दिली जायची. अकबराच्या किंवा जहांगिराच्या दरबारात त्या स्त्रिया हिंदू म्हणून राहू शकत होत्या पण शहाजहानचा अशा गोष्टींना नकार होता.

अकबर काळापासून मुघल राजघराण्यात रजपुत आदि संस्थानिकांच्या मुलींशी बादशाह किंवा शहजादा असे विवाह करायचे. मात्र हिंदू राजघराण्यातील पुरुषाला मुसलमान बादशहा किंवा अन्य छोट्या-मोठ्या सुलतानांनी आपल्या मुली दिल्या असं दिसत नाही. याचं कारण माहीत नाही हा कदाचित इस्लामी अहंकार असेल किंवा कदाचित हिंदुंच्या मधील संकुचित धर्मकल्पना असेल. पण राजघराण्यात नाही तर सर्वसामान्य समाजात मात्र पुष्कळ हिंदूंनी मुसलमान मुलीशी विवाह केले.

जम्मू काश्मीर पंजाब वगैरे भागात असे बरेच प्रकार घडत. पुष्कळदा मुसलमान मुलींना आधी हिंदू धर्माची दीक्षा घेऊन मग त्यांच्याशी लग्न लावली जायची. शहाजहान गादीवर येईपर्यंत मोगल दरबाराने असल्या प्रकरणांमध्ये अजिबात लक्ष घातलं नाही. मात्र शहाजहानला हे असह्य झालं.

जम्मूमधील असे सुमारे चार हजार संबंध हुडकून काढून त्या सर्व स्त्रियांना त्यांच्या नवर्‍यापासून दूर करून पुन्हा मुसलमान करून मुसलमानांशी त्यांची लग्न लावून देण्यात आली होती.

ह्या संदर्भात दलपत नावाच्या सरहिंदच्या एका हिंदूची गोष्ट मनाला चटका लावणारी होती. त्याने चिनाब नावाच्या एका मुलीला हिंदू करून तिचं गंगा नामांतर करून तिच्याशी विवाह केला होता. शहाजहानच्या हुकुमाने दलपतला त्याच्या पत्नीपासून दूर करण्यात आल. एवढेच नाही तर मुसलमान हो नाहीतर मरायला तयार हो असं ठणकावून सांगण्यात आलं. दलपतने मुसलमान होण्याचं नाकारल्यावर त्याचा क्रूरपणे वध करण्यात आला.

त्यापूर्वीच्या पन्नास-पाऊणशे वर्षात कधीच झाले नव्हते एवढ्या मोठ्या प्रमाणात शहाजहानच्या काळात धूमधडाक्याने इस्लामी सण साजरे होऊ लागले होते. नवीन मंदिर बांधायला बंदी घातली होती. एवढेच नाही तर पूर्वी सुरू झालेल्या आणि अंशतः बांधून झालेल्या मंदिरांची काम हे तिथल्या तिथेच थांबविण्यात आली. काश्मीर गुजरात या प्रांतात मंदिर पाडली गेली. त्यात बनारस येथील ७० देवळे होती. जिथे मशिदीचे सामान वापरून देऊळ उभारण्याचा संशय होता तिथं तर त्यांन अतिशय जुलूम केले. पण मंदिराचा भाग मात्र मशिदीच्या उभारणीसाठी खुशाल वापरू दिला.

शहाजहानच्या या हरकती पाहिल्या तर तो त्याच्या मुलापेक्षा म्हणजेच औरंगजेबापेक्षा कट्टर धर्मांध होता असंच दिसतं.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.