शाहरुखच्या आजोबांनी लाल किल्ल्यावरचा ब्रिटिश झेंडा काढून तिथे तिरंगा फडकवला होता.
‘क्या बात हुई क्या गरज पड़ी, ये रंग-ए-जहां बदला कैसा
मगरूरों का मजलूमों में सर रखना कैसा
हिंदू कैसा, मुस्लिम कैसा, ब्राह्मण कैसा, बनिया कैसा
हम वोट शाहनवाज को देंगे, हम वोट शाहनवाज को देंगे’
पहिल्या लोकसभा निवडणुकीत जनरल शाहनवाज खान काँग्रेसच्या तिकिटावर मेरठमधून पहिले खासदार झाले होते त्या निवडणुकीमध्ये या घोषणा जनसामान्यांमध्ये दुमदुमत होत्या. १९५२ मध्ये जेंव्हा देशामध्ये लोकशाहीचं वारं वाहू लागलं होतं तेंव्हा मेरठच्या जनतेने जनरल शाहनवाज खान यांना अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. आणि याच जनतेच्या प्रेमामुळे आणि विश्वासामुळे ते १९५२ ते १९७१ या काळात सलग चार वेळा खासदार म्हणून निवडून आले होते.
आजची पिढी मात्र जनरल शाहनवाज खान यांना ओळखत नसावी पण आपल्या २-३ पिढ्या हे नाव नेहेमीच आदराने घेतात.
जनरल शाहनवाज खान यांची राजकीय ओळख सोडता एक महत्वाची ओळख आहे ज्यामुळे त्यांचे नाव मेरठच्या गल्ली-बोळात दुमदुमत असायचे. ते म्हणजे शाहनवाज खान हे आझाद हिंद फौजेचे पहिले मेजर जनरल. आजाद हिंद सेनेचे मेजर असलेले शहनवाज खान हे एक सच्चे देशभक्त, एक स्वतंत्र सैनिक आणि सुभाष चंद्र बोस यांच्या अतिशय जवळचे व्यक्ती होते. त्यांची तिसरी एक ओळख म्हणजे,
शाहनवाज खान हे तेच व्यक्ती आहेत ज्यांनी लाल किल्ल्यावरून इंग्रजांचा झेंडा उतरवून तिरंगा फडकवला होता.
भारताला इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी हजारो क्रांतीकारकांना, सैनिकांनी आपले बलिदान दिले. यापैकी एक नाव म्हणजे ‘जनरल शाहनवाज खान’.
कोण आहेत हे शाहनवाज खान?
शाहनवाज खान यांचा जन्म २४ जानेवारी १९१४ ला रावळपिंडी मधल्या मातौर गावात झाला होता. त्यांनी प्राथमिक शिक्षण पाकीस्तान्मधून घेतलं होत. पुढील शिक्षण त्यांनी ‘प्रिन्स ऑफ वेल्स रॉयल इंडिअन मिलिटरी कॉलेज’ डेहराडून मधून पूर्ण केल. त्यांचे वडील झांझुआ राजपूत हे कॅप्टन सरदार टिका खान होते. १९४० मध्ये त्यांची ब्रिटिश इंडियन आर्मीमध्ये अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. सैनिक परिवारात जन्मलेले शाहनवाज यांनी कौटुंबिक परंपरेला जागत १९४० मधे ‘ब्रिटीश इंडिअन आर्मीत’ एक अधिकारी म्हणून भारतीय सैन्यात सामील झाले.
याचदरम्यान दुसरं जागतिक युद्ध सुरु होतं.
खान पण देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून इंग्रजांच्या विरोधात गेले. त्यांच्या नेतृत्वगुणांनी प्रभावित होऊन नेताजींनी त्यांना ‘आरजी हुकुमत-ए-आजाद हिंद’च्या कॅबिनेट मधे जागा दिली होती.
आणि शाहनवाज खान आणि त्यांच्या साथीदारांचा जामीन करणारे व्यक्ती म्हणजे, जवाहरलाल नेहरू, सर तेज बहादूर सप्रू, आसिफ आली, बुलाभाई देसाई आणि कैलाशनाथ काटजू हे होय.
शाहनवाज खान यांचा आणि शाहरुख खान चा काय सबंध ?
आजही शाहरुख खान आपल्यावर झालेले देशभक्तीचे संस्कार आपल्या नानांमुळे झाले असे मानतो.
हे ही वाच भिडू.