ड्रग्स प्रकरणात अडकलेल्या पोरामुळं शाहरुखने अनेक जाहिराती गमावल्यात.

क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणात बॉलिवूड सुपरस्टार शाहरुखचं पोरगं काय अडकलं अन सगळीकडे नुसता बाजार उठला आहे. आता अटकेत असलेला आर्यन खान याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पण आता हा विषय गेली काही दिवस सतत चर्चेत आहे. मिडिया असो वा सोशल मिडिया असो.

पण आता याच्याशीच सबंधित आणखी एक मुद्दा चर्चेत आला आहे. तो म्हणजे शाहरुख च करिअर. 

आपल्या बिघडेल पोराच्या करिअरच जाऊ द्यात पण आता पप्पांचच करिअर गोत्यात आलं म्हणायला हरकत नाही. हो कारण ‘बैजू’ या शाहरुख खान मार्फत होणाऱ्या सर्व जाहिरातीच्या प्रसारणाला स्थगिती दिली आहे. थोडक्यात शाहरुखच्या जाहिराती दाखवणं थांबवलं आहे. एवढेच नाही तर शाहरुखच्या प्री-बुकिंग जाहिरातीचे प्रकाशनही केले जाणार नाही असं कंपनीने सांगितलं आहे. मग आता सांगा हे करिअरवर परिणाम करणारच आहे ना ?

कंपनीला असा निर्णय का घ्यावा लागला ?

त्याचं झालं असं कि, सोशल मीडियावर ‘बायजू’ या ऑनलाईन शिक्षण देणाऱ्या कंपनीला ट्रोल करण्यात येतंय. नेटकऱ्यांनी चालवलेल्या या ट्रोलिंगचा मुख्य विषय होता बायाजू  या कंपनीचा ब्रँड अँबेसिडर शाहरुख खान. अर्थातच लोकं ट्रोल करणार ना. लोकांचा मुख्य आक्षेप असाय कि,

बायजू च्या जाहिरातीतून जगाला शिक्षणाचे महत्त्व सांगणारा शाहरुख खानचा मुलगाच जर अंमली पदार्थांचे सेवन करत असेल तर शाहरुख खानला शिक्षणासंबंधित कंपनीची जाहिरात करण्याचा काही एक अधिकार नाही. सोशल मीडियावर लोकं बायाजुला प्रश्न विचारत आहेत की शाहरुखला ब्रँड अॅम्बेसेडर बनवून कंपनी काय संदेश देत आहे? अभिनेते हेच सर्व त्यांच्या मुलाला शिकवतात का?

हे बायजू अँप काय आहे ?

बायजू रवींद्रन यांनी एक एज्युकेशन अँप डेव्हलप केलं आहे. जे कि,  विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन लर्निंग एज्युकेशन देत असते. २०१५ मध्ये त्यांनी हे बायजू अँप लाँच केले. लवकरच या बायजू अँपच्या   सबस्क्रायबरची संख्या वेगाने वाढू लागली. सध्या बायजूचे ६४ मिलियन सबस्क्रायबर्स आहेत. बायजू अँपची वेगाने प्रसिद्धी होत आहे. याला आणखी एक कारण म्हणजे त्यांच्या जाहिराती. आणि या जाहिरातींसाठी बायजू ने कंपनीचा ब्रँड अँबेसिडर बनवलं ते शाहरुख खानला.

बायजू रवींद्रन यांचं हे अँप सुरु करण्यामागचा उद्देश म्हणजे, देशाच्या अशा शिक्षण व्यवस्थेसाठी काम करायचे आहे जसे डिस्नेने मनोरंजनासाठी काम केलेय !

शाहरुख खान २०१७ पासूनच या कंपनीचे प्रतिनिधित्व करत आहे आणि इकॉनॉमिक टाइम्सच्या मते, शाहरुख या करारापासून दरवर्षी सुमारे ३-४ कोटी कमावतो.

बरं शाहरुख खान काय या एकाच ब्रँड च काम करतो. जसं कि, ह्युंदाई, बिगबास्केट आणि दुबई टुरिझम सारख्या बर्‍याच ब्रँडचे तो प्रतिनिधित्व करतो, परंतु बायाजू वरच सर्वाधिक टीका होत आहे. बायजूने अलीकडेच शाहरुखसोबत एका आणखी नव्या जाहिरात प्रोजेक्टला सुरुवात केली होती.

शाहरुखच्या प्रायोजकत्वाच्या व्यवहारांमध्ये बायजू हा सर्वात मोठा ब्रँड आहे, जो त्याला चांगला फायदा मिळवून देतो आणि या जाहिरातींचा उद्देश देखील समोर चांगला जातो.

आणखी एक म्हणजे, बायजूने आणि शाहरुखने आयपीएल जाहिरातींसाठी देखील योजना आखली होती. मात्र त्याच्यावरच्या वाढत्या टिकेमुळे आयपीएल जाहिरात तो करू शकेल कि नाही याची शक्यता कमीच आहे. कारण काही सूत्रांनी असंही सांगितलं आहे कि, शाहरुख आयपीएलच्या सर्व जाहिरातींमधून बाहेर पडू शकतो.

तसंच काही माध्यमांनी शाहरुख जाहिरात करत असलेल्या ऑनलाईन किराणा कंपनी म्हणजे बिगबास्केट ला देखील विचारले आहे कि, शाहरुख त्यंच्या जाहिराती कायम करणार आहे का? मात्र बिगबास्केटने या विषयावर प्रतिक्रिया द्यायला नकार दिला आहे.

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.