शक्तीच्या खटारा गाडीला मर्सिडीजने ठोकलं. पण हा ॲक्सिडेंट त्याच्यासाठी लकी ठरला.

हिंदी चित्रपट सृष्टीत व्हिलनची भूमिका करून इंडस्ट्रीत पाय जमवणारे अभिनेते शक्ती कपूर यांनी काम केलेल्या ‘ कुर्बानी ’ या सिनेमाला आज चाळीस वर्षं होत आहेत. कुर्बानी हाच एकमेव असा चित्रपट आहे की ज्यामुळे शक्ती कपूर यांच्या आयुष्यात नवं वळण येऊन कारकिर्दीत यश आलं. शक्ती कपूर यांनी या सिनेमात फार उत्तम भूमिका केली होती.

इंडस्ट्रीत व्हिलन म्हणून आजही ते फार लोकप्रिय आहेत. कारण त्यांनी काम करून ठेवलेले चित्रपट अजूनही मनोरंजनाची कसर भरून काढतात.

शक्ती कपूर हे व्हिलन सोबत विनोदी अभिनेते म्हणून सुद्धा बॉलीवूड मध्ये ओळखले जातात. कुर्बानी नंतर त्यांची गाडी जी रुळावर निघाली ती आजपर्यंत थांबलेली नाही. कित्येक यश संपादन करून थांबल्यानंतर ही त्यांचं काम सारा देश आवर्जून पाहतो. कारण तसे व्हिलन आता फारशे पाहायला मिळत नाही. म्हणतात ना की, ‘ जुनं ते सोनं ’ शक्ती कपूर यांनी अभिनय करून ठेवलेलं काम कितीही जुनं झालं तरी प्रेक्षकांसाठी ते नवच राहणार आहे.

त्यांच्या अभिनयातला वेगळेपणा, आवाजशैली, शारीरिक लकब अश्या अनेक मार्गाने शक्ती कपूर अभिनय करायचे. आणि प्रेक्षकांना हसवायला, रडायला आणि अस्वस्थ करायला लावायचे. त्यांचा संघर्षाचा प्रवास खूप खडतर होता. अनेक अडथळे त्यांना आले; पण ते घाबरले नाहीत. थांबले सुद्धा नाहीत.

फिरोज खान यांनी दिग्दर्शित केलेला कुर्बानी हा चित्रपट रसिकांच्या फार जवळचा आहे.

चाळीस वर्षांपूर्वी रिलीज झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला होता. त्यात शक्ती कपूर यांच्या व्हिलन अभिनयशैलीचा मोलाचा वाटा होता. पण शक्ती कपूर यांना खूप योगायोगाने हा सिनेमा मिळालेला आहे. स्ट्रगलर असताना शक्ती कपूर काम शोधत असताना एक घटना घडली आणि त्या घटनेने त्यांचं अवघं जीवनच बदलून टाकलं. घटना होती अपघाताची.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अपघाताने कसकाय जीवन बदललं ? वगैरे वगैरे.

तर होय, त्यांच्या आयुष्यात घडलेल्या एका अपघातानेच जीवन स्वप्नांच्या दिशेला नेलं. हे स्वतः शक्ती कपूर यांनी कुर्बानीला चाळीस वर्षं झाल्याच्या निमित्ताने एका वृत्तवाहिनीला सांगितलं आहे.

गोष्ट आहे शक्ती कपूर यांच्या संघर्षाची. ते अभिनेता बनण्यासाठी स्ट्रगल करत होते. परिस्थिती जेमतेमचं होती. एके दिवशी काय झालं की १९६१ सालीचं मॉडेल असणारी फियेट कार चालवत ते लिंकिंग रोड, बांद्रा कडे चालले होते. त्याचं वेळेस एक मर्सिडीज त्यांना ओव्हरटेक करायचा प्रयत्न करू लागली.

आणि याचं प्रयत्नात त्या मर्सिडीज कडून शक्ती कपूर यांच्या कारला धक्का लागला.

तो एका प्रकारे छोटा का असेना पण अपघातच होता. शक्ती कपूर यांच्या कारचं थोडं नुकसान झालं होतं. तेव्हा शक्ती कपूर यांना फार राग आला. रागाच्या भरात ते गाडी बाजूला लावून खाली उतरले. मर्सिडीज च्या ड्रायव्हर वर रागाने ओरडणार तेवढ्यात त्या ड्रायव्हर ला बघून शक्ती कपूर ला काय करावं काही कळेना.

कारण समोर कुणी ड्रायव्हर नसून होते, प्रसिद्ध अभिनेते फिरोज खान.

शक्ती कपूर सांगतात की फिरोज खान यांना पाहिल्यावर ते सगळे विसरले. आणि त्यांच्याशी बोलायला लागले. ड्रायव्हरवर ओरडण्याच्या तयारीत असणारे शक्ती कपूर फिरोज खान यांना बघून त्यांच्याकडे रोल मागू लागले. त्यावेळी फिरोज खान नव्या कलाकाराला संधी देतात आणि चांगलं नातं ठेवतात हे शक्ती कपूर यांना माहित होतं.

फिरोज खान यांनी नक्की मदत करेल असा शब्द देऊन तिथून गेले.

त्यानंतर शक्ती कपूर यांची ओळख केके शुक्ला या लेखकासोबत एका चित्रपटाच्या निमित्ताने झाली. ते लेखक शक्ती कपूरच्या परीचयांचे होते. तेव्हा त्यांनी असं सांगितलं की

एक फिल्म आहे, त्यात एक छान व्हिलनचं पात्र आहे. पण फिरोज खान म्हणतात की ते पात्र अपघात झालेल्या मुलाला देणार आहेत.

ही गोष्ट जेव्हा शक्ती कपूरला कळाली तर त्यांना आकाश ठेंगनं झालं.

त्यांनी तो मुलगा मीच आहे असं पटवून दिलं.

तेव्हापासून सुरु झालेला प्रवास फिरोज खान आणि शक्ती कपूर यांच्या नात्यात अविरत गोडवा येत गेला. तो चित्रपट होता कुर्बानी. या चित्रपटातून अभिनयाचं कौशल्य दाखवलेल्या शक्ती कपूर यांची अभिनयाची गाडी पुन्हा थांबलीच नाही. एकानंतर एक सुपरहिट चित्रपट येऊ लागले. कुर्बानी फार हिट झाला होता. शक्ती कपूर यांची भूमिका ही लोकांना आवडली होती. त्यामुळेचं तर फिल्मी करीयर ला खरा ब्रेक मिळाला.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.