आज निकाल लागला ते शक्ती मिल प्रकरण काय आहे?

२०१३ सालचं शक्ती मिल गँगरेप प्रकरण. ज्या घटनेनं अख्खा महाराष्ट्र हादरला होता. या शक्ती मिलच्या आवारात एका महिला फोटो जर्नालिस्टवर पाच नराधमांनी मिळून सामूहिक बलात्कार केला होता. या पाचही जणांना नंतर बेड्या ठोकल्या गेल्या आणि शिक्षा सुनावण्यात आली होती. पण आता हायकोर्टाने या आरोपीमधल्या तिघांची फाशीची शिक्षा रद्द केली आहे.

गेल्या जवळपास आठ वर्षांपासून सुरु असलेल्या या प्रकरणी न्यायालयानं आज अंतिम फैसला सुनावलान्यायमूर्ती साधना जाधव आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी हा निकाल वाचून दाखवला. कोर्टाने तीन आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करत त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावलीये. पण न्यायालयाच्या या सुनावणीवर अनेकांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केलेत.  

काय आहे शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरण 

तर २२ ऑगस्ट २०१३ साली एक महिला फोटो जर्नालिस्ट आपल्या एका सहकाऱ्यासोबत एका असायमेंटसाठी फोटो काढण्यासाठी महालक्ष्मी परिसरात असलेल्या शक्ती मिलमध्ये गेली होती. जी गेल्या कित्येक वर्षांपासून बंद आहे. हे दोधेही संध्याकाळी पाचच्या सुमारास त्यांच्या ऑफिसमधून गेले होते. 

याठिकाणी महिला फोटो जर्नालिस्ट आणि तिचा सहकारी फोटो घेत असताना पाच जण तिथे आले.  त्यांनी या दोघांना आपण पोलीस असल्याचं सांगत फोटो काढायचे नाहीत असं सांगितलं. त्यांनी म्हंटल कि, आमच्या परवानगीशिवाय तुम्ही फोटो काढू शकत नाही.

त्यानंतर या पाच जणांनी महिला फोटो जर्नालिस्ट आणि तिच्या सहकाऱ्याला मिलच्या आतल्या भागात नेलं, जिथं सहसा कोणी फिरकत नाही. आत नेल्यानंतर त्यांनी महिलेच्या सहकाऱ्याला बांधून ठेवले आणि त्याने आरडाओरड करू नये म्ह्णून त्याच्या गेल्यावर बियरचे फुटलेली बाटली धरली. या दरम्यान या पाचही जणांनी तिच्या सामूहिक बलात्कार केला.  

एवढंच नाही तर या बलात्कार्‍यांनी नंतर पीडितेला गुन्ह्याची जागा साफ करण्यास भाग पाडले आणि सेलफोनवर तिचे दोन फोटो घेतले. आरोपींनी  तिला धमकी दिली कि, तिने हल्ल्याची तक्रार केल्यास फोटो सोशल नेटवर्क्सवर सोडण्याची धमकी दिली

घटनेनंतर या पाच आरोपींची तिथून पळ काढला. तर तब्ब्ल दोन तासांनी महिला आणि त्या सहकाऱ्याने कशीबशी स्वतःची सुटका केली आणि नंतर हॉस्पिटल गाठलं. या घटनेने महाराष्ट्राचं नाही तर संपूर्ण देश हादरला होता. 

बलात्कार पीडितेने नंतर पोलिसात तक्रार दाखल केली आणि घटनेच्या सगळ्या आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले. या प्रकरणी विजय जाधव, मोहम्मद कासिम हाफिज शेख उर्फ ​​कासिम बंगाली, मोहम्मद सलीम अन्सारी, सिराज रहमान खान उर्फ ​​सिरजू आणि चांद शेख या आरोपीना अटक करण्यात आली.

धक्कादायक बाब म्हणजे या आरोपींची याआधी सुद्धा शक्ती मिल परिसरातच आणखी एका महिलेवर बलात्कार केला होता. ती महिला टेलीफोन ऑपरेटर असल्याचे समजते. ३१ जुलै २०१३ ला तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. पण  बदनामीच्या भीतीने ती महिला समोर आली नव्हती. मात्र, महिला फोटो जर्नालिस्टचे प्रकरण कोर्टात सुरु असताना या घटनेचा खुलासा झाला. 

या दोन्ही प्रकरणी पोलिसांनी ३६२ पानांची चार्जशीट फाईल केली. यांनतर २०१४ च्या एप्रिल महिन्यात मुंबईच्या सेशन कोर्टानं विजय जाधव, कासीम बंगाली, सलिम अन्सारी याना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली तर सिराज खान याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. या प्रकरणातला जो पाचवा आरोपी होता, तो अल्पवयीन असल्याने त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आले होते. 

दरम्यान २०१९ मध्ये या आरोपींची सेशन कोर्टानं सुनावलेल्या शिक्षेला आव्हान देणारी याचिका हाय कोर्टात दाखल केली होती. त्याप्रकरणी आज अंतिम सुनावणी होती. आणि हायकोर्टानं विजय जाधव, कासीम बंगाली, सलीम अन्सारी या आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

हे ही  वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.