भल्याभल्यांना गुगलीत अडकवणारा शेन वॉर्न नर्सला मेसेज पाठवतो म्हणून गोत्यात आला होता….

क्रिकेट हा जंटलमनचा गेम समजला जातो. खेळता खेळता काही खेळाडू हे भलत्याच खेळाच्या नादात अडकतात आणि आपल्या कारकिर्दीवर क्रिकेटर सोबतच अजून एखादा शिक्का मारून घेतात. क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंग, डोपिंग, ड्रग्ज यामध्ये अडकलेले अनेक खेळाडू आपण पाहिलेले आहेत पण एक असाच होता ज्याने जगावेगळं कांड केलं आणि जगभर बदनाम झाला.

तर तो खेळाडू होता ऑस्ट्रेलियाचा लिजेंड स्पिनर शेन वॉर्न. क्रिकेटमध्ये भल्याभल्यांच्या दांड्या गुल करणारा शेन वॉर्न काय दर्जाचा खेळाडू होता हे बऱ्याच क्रिकेट शौकिनांना ठाऊकच असेल. आपल्या स्पिनच्या तालावर बॅट्समनला नाचवणारा शेन वॉर्न हा एकेकाळी फलंदाजांचा कर्दनकाळ होता. बॉल ऑफ द सेंच्युरीचा दर्जा शेन वॉर्नने आपल्या बॉलिंगच्या जोरावर मिळवलेला होता.

त्या काळात शेन वॉर्न या नावाची एक वेगळीच हवा क्रीडा जगतात होती. त्याच करिअर ऐन भरात होतं. नेमकं इथंच शेन वॉर्नच्या करिअरला डाग लागला. साल होतं २०००. आपल्या कामगिरीच्या जोरावर शेन वॉर्न ऑस्ट्रेलियन संघाचा उपकर्णधार झाला होता.

पण त्याच वेळी डेली मिररला एक बातमी झळकली ती म्हणजे शेम वॉर्न. ब्रिटिश नर्स डोना राईट्ला अश्लील फोन कॉल आणि व्हॉइस मेसेजद्वारे त्रास देताना शेन वॉर्न पकडला गेला होता.

जगभरात हि बातमी वेगाने व्हायरल होऊ लागली. सगळीकडे शेन वॉर्नची नाचक्की सुरु झाली. ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाला शिव्या पडू लागल्या आणि बोर्डाने शेन वॉर्नचं उपकर्णधारपद काढून घेतलं. सेक्स स्कँडल प्रकरणातसुद्धा वॉर्नच नाव जोडण्यात आलं. ब्रिटिश नर्स डोना राईटने सांगितलं होतं कि फोनवर शेन वॉर्नने माझ्यासोबत अश्लील चर्चा केली आणि नंतर छळ सुद्धा केला.

पण नंतर शेन वॉर्नने नॅशनल टीव्हीवर सेक्स स्कँडल आणि नर्सचा छळ केल्याचा आरोप खोडून काढला होता पण त्याने सोबतच हेही मान्य केलं कि त्याने नर्ससोबत अश्लील चर्चा केली होती. डोना राईटने लंडनच्या डेली मिररला सांगितलं की वॉर्नने रात्रीच्या क्लबमध्ये हॉटेलच्या खोलीचं किकार्ड माझ्या खिशात टाकलं आणि खोलीत बोलावून घेतलं. पुढे हे प्रकरण उघडकीस आलं खरं पण वॉर्नने याला नकार दिला.

जगभरात शेन वॉर्नच्या कर्तृत्वावर लोकांनी टीकास्त्र सोडायला सुरवात केली. शेवटी वॉर्नने आपल्या बायकोमुलांसमोर कबुल केलं होतं कि त्याने फोन कॉल्स केले होते. पण तो नाराज या गोष्टीने झाला होता कि त्याची खाजगी असणारी गोष्ट जगभर व्हायरल झाली होती. तो म्हणाला मी इतरांसारखाच आहे, मी चुका करतो. शेवटी मीही एक क्रिकेटरच आहे माझ्याकडूनही चुका होतात.

या काळात शेन वॉर्न ३० वर्षांचा होता. पुढे जेव्हा या प्रकरणाला वर्षे लोटली तेव्हा वॉर्न म्हणाला होता कि माझ्या त्या कालच्या बदनामीचा फायदा स्टीव्ह वॉला अजस्त झाला होता. पण शेन वॉर्न सारख्या चांगल्या क्रिकेटपटूला हि नर्सला कॉल आणि मेसेज करण्याची टेक्निक चांगलीच भोवली होती. 

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.