कालचा मुख्यमंत्री मुंबईत स्वतःचं साध एक घर घेऊ शकला नाही ही त्याकाळची वस्तुस्थिती होती.

लोकशाहीचा गाभा चर्चेत एकमेकांची मते, बाजू ऐकून, जाणून  घेऊन  मग निर्णय घेण्यात आहे. त्यासाठीच घटनेत विधिमंडळ आणि अधिवेशन यांची तजवीज करण्यात आली आहे. लोकांचे प्रश्न सभागृहात मांडून सर्व संमतीने त्यावर तोडगा करण्यासाठी हि सर्व यंत्रणा काम करते. हिवाळी ,पावसाळी आणि बजेट सत्र अशी तीन अधिवेशनं वर्षभरात होतात. सत्ता रूढ पक्षावर अंकुश ठेवण्यासाठी ही घटनेनं विरोधी पक्षांना देऊ केलेलं हे एक साधन आहे.

एक काळ  होता की अधिवेशन म्हणजे प्रचंड मोठी गोष्ट असायची त्या काळी विधी मंडळाच्या दोन्ही सभागृहाचे सदस्य अधिवेशनाला प्रचंड गांभीर्याने घेत. एस.एम.जोशी ,अत्रे , यशवंतराव चव्हाण ,कॉम्रेड डांगे ,वसंत दादा ही लोकं सभागृहात बोलायला उभी राहिली की अखंड सभागृह शांतपणे त्यांना ऐकत.

त्याकाळी सभागृहात अत्यंत खेळीमेळीचे वातावरण असायचे. नवोदित आमदारांना त्याकाळी अनुभवी नेते मंडळी सभागृहाचे कामकाज समजण्यास मदत करायचे. सर्व लोक प्रतिनिधी स्वतःची कामगिरी सभागृहात चांगली करण्यासाठी विधिमंडळाच्या अभ्यासिकेत जाऊन अभ्यास करत आणि मगच भाषण करत. आत्ता तसे चित्र फार क्वचित बघायला मिळते हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच आमदार अभ्यासपूर्ण भाषण करतात असो.

तर भिडूनों विषय असा आहे की १९७८ सालची निवडणूक झाली आणि महाराष्ट्राची विधानसभा गठीत झाली.

डॉ. कुमार गणेश सप्तर्षी अहमदनगर जिल्ह्यातून जनता पक्षाच्या तिकिटावर निवडून आले होते. ही विधानसभा त्रिशंकू होती. कोणाचे सरकार बनेल काही स्पष्टता नव्हती. कॉंग्रेस मध्ये हि इंदिरा कॉंग्रेस आणि स्वर्णसिंग कॉंग्रेस अशी उभी फुट पडली होती. त्याकाळी पक्षांतर बंदी कायदा नव्हता.

शरद पवारांनी डावपेच करून राज्पालांना जनता पक्षाला सरकार स्थापन करण्याचे आमंत्रण देण्यापासून रोखले. पुढे कॉंग्रेसची आघाडी झाली आणि वसंत दादा मुख्यमंत्री महणून विराजमान झाले. कुमार सप्तर्षी हे पहिल्यांदा आमदार होते त्यांना त्यांचा सभागृहातले काम चांगले करायचे होता. त्यामुळे ते बराच काळ ग्रंथालयात घालवत मुद्दे काढत आणि मगच सभागृहात मांडत.

त्याकाळी नवोदित सदस्यांना जुने अनुभवी सदस्य मार्गदर्शन करत सभागृहाहातील कामकाजाची माहिती देत. कोणता प्रश्न कधी उपस्थित करायचा कोणत्या पद्धतीने करायचा हे समजावत. त्याकाळी पक्षाच्या मर्यादा विसरून हि सर्व मदत अनुभवी नेतेमंडळी अगदी आनंदाने करत.

कुमार सप्तर्षी यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांची निवड मार्गदर्शक म्हणून केली. इतक्यात शरद पवारांनी वसंत दादांचे सरकार पडून स्वताच्या नेतृत्वात पुलोद चे सरकार बनवले होते. त्यामुळे कुमार सप्तर्षी आत्ता विरोधी पक्षाच्या बाकावरून सत्ताधारी बाकावर आले होते.

शंकरराव चव्हाण अत्यंत साधे होते. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून वाट काढत ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते. नांदेड मध्ये जेव्हा १९५३साली नगरपालिकेच्या निवडणुका जिंकून ते अध्यक्ष झाले होते तेव्हा ते सायकलीवरून नगरपालिकेत जात असत. ते शिस्तेचे अत्यंत पक्के होते त्यांना त्यांच्या कार्यकाळात हेडमास्तर मुख्यमंत्री सुद्धा म्हंटले गेले.

तर असे शंकरराव!! त्यांन जेव्हा मुख्यमंत्री पद सोडले, तेव्हा काहीच विलंब न करता ते आमदार निवासात शिफ्ट झाले. प्रशस्त वर्षा बंग्ल्यातुल दोन खोल्यांच्या सदनिकेत ते इतर आमदारां बरोबर राहू लागले. कालचा मुख्यमंत्री मुंबईत स्वतःचा साध एक घर घेऊ शकला नाही ही त्याकाळची वस्तुस्थिती होती.

तर कुमार सप्तर्षी कामकाज समजून घेण्यासाठी चव्हाण साहेबांकडे आमदार निवासात गेले. साहेब बाहेरच्या खोलीत बसले होते तर कुसुम ताई चव्हाण स्टोवर स्वयंपाक करत होत्या. त्यांचा हा इतका साधेपणा पाहून कुमार सप्तर्षी हि काही काळ गडबडले. त्यानंतर कुमार सप्तर्षी त्यांच्याकडे रोज सायंकाळी जाऊ लागले. त्यादरम्यान त्यांच्याकडे कोणी भेटायला येत नसे. एकदा न राहून कुमार सप्तर्षी यांनी चव्हाण साहेबाना विचारले तुच्याकडे कोणीच कसं येत नाही? त्यावर शंकरराव चव्हाण म्हणाले,

“पाहिलंस ना? याला कॉंग्रेस संस्कृती म्हणतात ,त्यांना ज्ञानाची किमत नाही मी बिल्डर लॉबीला कधीच मदत केली नाही. मुंबईत घर विकत घेणं मला परवडत नाही म्हणून मी इथ आमदार निवासात रहातो. म्हणजे हा माणूस शहाणा नसावा अशी कॉंग्रेस वाल्यांना शंका आहे.”

शंकराव चव्हाणांनी कुमार सप्तर्षीनां एखाद्या मास्तरा प्रमाणे सर्व शिकवले. सर्व बारीसारीक गोष्टी त्यांना सांगितल्या. इवढं करून ते थांबत नव्हते तर आपल्या विध्यार्थ्याची प्रगती सभागृहात बारकाईने बघत असत. बारकाईने ते कुमार सप्तर्षी यांची भाषणे ऐकत आणि आपल्या शिष्याला जरुरी सूचना ही करत.

राजकारणातला एक तो काळ होता आणि एक अलीकडचा काळ आहे. अशी ऋषितुल्य व्यक्तिमत्व राजकारणातून कमी होत गेली आणि राजकारण दुषित होत गेले. इतके की ज्या शंकराव चव्हाण यांना मुख्यमंत्री असूनही मुंबईत स्वतःचे घर घेता आले नव्हते, त्यांच्याच मुलाला म्हणजेच अशोकराव चव्हाण यांना शहीद सैनिकांच्या कुटुंबासाठी बांधलेल्या आदर्श  या इमारतीतील दोन सदनिका हडपल्याच्या आरोपावरून मुख्यमंत्री पद सोडावे लागले.

हे ही वाच भिडू.

2 Comments
  1. नरसिंग देशमुख says

    कै.शंकररावजी चव्हाण साहेबांच्या राजकिय प्रवासाचे दोन टप्पे पडतात.1978 पर्यन्तचा पहिला टप्पा…दुसरा टप्पा ते पुलोद मंत्रीमंडळात कॅबीनेट मंत्री म्हणून होते.तीथून त्यांच्या राजकिय प्रवासाचा दुसरा टप्पा सुरु होतो.याच कालावधीत ते दुस-यांदा मुख्यमंत्री झाले.इथूनच “अशोकपर्वाची ” सुरुवात होते.मग सगळेच चित्र पालटलेले बघायला मीळते.

Leave A Reply

Your email address will not be published.