किर्लोस्कर नसते तर चाकण पिंपरी चिंचवडची औद्योगिक ओळख कधीच मिटून गेली असती

माणूस म्हणे चार गोष्टींसाठी ओळखला जातो. नाव, रूप, गुण आणि कीर्ती यांपैकी सर्वच गोष्टी शंतनुराव किर्लोस्करांना मुबलक प्रमाणात मिळाल्यात. म्हणजे अनोळख्यांच्या गर्दीत गेले तरी त्यांना केवळ त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळेच “हा माणूस कोणी तरी मोठा आहे” असा मान मिळेल यात काही शंका नाही.

एक नेकीचा कर्तृत्ववान कारखानदार म्हणून त्यांनी आंतरराष्ट्रीय ख्याती मिळविली आहे. जगातील अनेक देशांत त्यांच्या मालाची निर्यात होते. या देशांतून त्यांनी आपल्या कचेऱ्या थाटल्या आहेत; एवढेच नव्हे तर मलेशिया, फिलिपाईन्स, जर्मनी, अशा अनेक देशांतून कारखाने सुरू करून किर्लोस्करांचे नि पर्यायाने भारताचे नाव जागतिक बाजारपेठेत त्यांनी अजरामर करून ठेवलेय.

आपल्या किर्लोस्कर समूहाच्या ‘Enriching Lives’  जीवनमान उंचावणे या ब्रिदवाक्यानेच त्यांच्या कामाच्या पद्तीचा अंदाजा बांधला जाऊ शकतो.

आपल्या किर्लोस्कर वाडीशी नाळ जोडलेल्या किर्लोस्करांनी आपल्या समुहातुन शेंगा फोडण्याचं  यंत्र, उसाचा रस काढण्याचा चरका, साखर निर्मिती यंत्रे, लेथ मशिन्स, ऑइल इंजिन्स, इस्पितळांतील विशिष्ट फर्निचर,हॉटेल उद्योगांतील आवश्यक उपकरण, बेअरिंग्ज, फोर्जिंग अश्या सगळ्या क्षेत्रातील उपकरण बनवण्यावर त्यांनी भर दिला. 

शंतनुरावांचे इंडस्ट्रियल मॅनेजमेंट, अर्थव्यवहार, जागतिक घडामोडी यांसंबंधीच्या सगळ्याच विषयांमध्ये भरपूर वाचन आहे. महत्त्वाचं म्हणजे पुण्याची औद्योगिक वाढ होण्यामागे शंतनूराव किर्लोस्करांचा महत्त्वाचा वाटा मानला जातो. त्यासंदर्भातलाचं एक किस्सा मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष भा. र. साबडे यांनी शेअर केलाय.

१९६० च्या दशकात तत्कालीन गाडगीळ समितीने पुण्यातील पिंपरी-चिंचवड-भोसरी भागाचे औद्योगिक क्षेत्र ४००० एकरावरून १५०० एकरांवर आणावे, पुण्याच्या आसपासची औद्योगिक वाढ थांबवावी, नवीन जागा त्यांना देऊ नयेत, अशा शिफारसी केल्या होत्या. पण ह्या शिफारसी पुण्याच्या औद्योगिक वाढीला मारक असल्याने चेंबरतर्फे एक निवेदन तयार करण्यात आले होते.

हे निवेदन पत्राद्वारे सर्व उद्योजक, माध्यम आणि समितीला पाठवण्यात आली. ते मिळाल्यावर ताबडतोब शंतनुरावांनी साबडे यांना बोलवून घेतलं आणि त्यावर तपशीलवार चर्चा झाली. त्यांनी काही सुधारणाही सुचविल्या. त्यांच्या नेहमींच्या पद्धतीने निवेदन झाले. पण पुढे काय ? प्रत्यक्ष सरकारी धोरणावर परिणाम कसा व्हायाचा हा खरा प्रश्न उभा राहिला.

यावर शंतनुरावांच्या सल्ल्याने आणि सर्वानुमते ठरले कि, चेंबरने एक पुस्तिका तयार करायची, संबंधितांशी चर्चा करायची, आणि मग पत्रकार परिषद घेऊन जनतेचेही याकडे लक्ष वेधायचं. जे ठरवलं तसंच घडलं. किर्लोस्करांनी स्वतः पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर जवळपास दोन-चार महिने तरी या विषयावर सगळीकडे वादविवाद सुरू झाला.

त्यांनतर पुणे प्रादेशिक नियोजन मंडळाच्या अभ्यासगटावर चेंबरच्या प्रतिनिधींना घेण्यात आलं. शंतनुरावांना सुद्धा या मंडळावर घेण्यात आले आणि प्रत्यक्ष प्रादेशिक नियोजन करताना आमच्या सर्व मुद्यांचा विचार करण्यात आला. शंतनुरावांनी याबाबतीत खूपच वेळ दिला. मंडळाच्या सदस्यांना पुण्याचा परिसर पाहता यावा म्हणून त्यांनी स्वतःचे विमानही देऊ केलं होते, अधिकाऱ्यांशी वेळोवेळी त्यांनी चर्चाही केली.

किर्लोस्करांनी वेळीच दाखविलेल्या जागरूकतेमुळे पुण्याच्या आसपासची औद्योगिक जमीन कमी झाली नाही. म्हणजे ४००० एकरापेक्षा एक इंच सुद्धा कमी नाही. त्यामुळे पुण्याची औद्योगिक वाढ झाली आणि ती अजूनही चालूच आहे.

किर्लोस्करांच्या औद्योगिक क्षेत्रातील या योगदानाची कदर करत भारत सरकारने १९६५ साली त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरव केला. तसेच त्यांना फाय फाउंडेशन, इचलकरंजी यांच्यातर्फे राष्ट्रभूषण पुरस्कार सुद्धा देण्यात आलायं .

हे ही वाचं  भिडू :

English Summary: Shantanurao Laxmanrao Kirloskar, the man behind the growth of Kirloskar Group and its many units.

 

Web Title : Shantanu Rao Kirloskar A man behind the growth of pune industry

Leave A Reply

Your email address will not be published.