तुमची एक बिझनेस आयडिया या 7 जणांना आवडली तर लाईफ सेट…

आपल्याकडे कोटीच्या आयडिया असतात पण कोटी रुपये आपल्या खिशात नसतात. म्हणजे निव्वळ दिवास्वप्न पाहत बसणे आणि तेच सदासर्वकाळ रंगवत बसणे. पण नुकतीच एक सिरीज पाहण्यात आली ती म्हणजे शार्क टॅंक इंडिया. ही सिरीज इंडियन बिझनेस रिलेटेड आहे जी सध्या सोनी इंडियावर जोमात सुरू आहे. हे एंटरप्रेन्युअर्स लोकं अगोदर बिझनेस किंवा प्रोडक्ट बद्दल लक्ष देऊन ऐकतात आणि जी आयडिया शार्कचया टीमला आवडली ते टीसत पैसे इन्व्हेस्ट करतात. या शोमध्ये एकूण 7 शार्क आहे त्यातले 5 जण शार्क शो मध्ये असतात.,

ही सिरीज बिझनेस कॅटेगिरीमधल्या लोकांना चांगलीच आवडत आहे. सोबतच लोकांची इच्छा बळावली आहे की हे शार्क प्रकरण नेमकं काय आहे ? आणि हे कोण लोकं आहेत ज्यांना आयडिया आवडली तर पाण्यासारखा पैसा खर्च करतात. तर जाणून घेऊया शार्क टॅंक इंडियाच्या शार्कस बद्दल.

तर या शार्क टॅंक इंडियामधला पहिला शार्क आहे

1) अशनीर ग्रोव्हर

शार्क इंडियात सगळ्यात जास्त चर्चेत असणारी व्यक्ती म्हणजे अशनीर ग्रोव्हर. अशनीर फिनटेक फर्म भारतपेचे फाउंडर आणि एमडी आहे. आयआयटी दिल्ली अंक आयआयएम अहमदाबाद मधून ते शिकलेले आहेत. शार्क टॅंकच्या माध्यमातून अशनीरने आजवर blue pine industries, booz scooters, tagz foods, skippi pops, raising superstars, beyond snack, motion breeze, event beep ,the yarn bazar, bamboo india, find your kicks india, Aas vidyalaya, Hotya, Restock आणि In a can अशा कंपनिंमध्ये इन्व्हेस्ट केलेली आहे.

2) अनुपम मित्तल

शार्क टॅंक इंडियाच्या शार्क लिस्टमध्ये दुसरे शार्क म्हणून ओळखले जातात अनुपम मित्तल. अनुपम मित्तल हे शादी डॉट कॉम- पीपल ग्रुपचे संस्थापक आणि सीईओ आहेत. अनुपमने बोस्टन कॉलेज, अमेरिकेतून आपलं शिक्षण पूर्ण केलंय. 1997 मध्ये अनुपमने सगाई. कॉम नावाने ऑनलाइन वेडिंग सर्व्हिसची सुरवात केली जी नंतर 1999ला शादी डॉट कॉम मध्ये रूपांतर झाली. अनुपम मित्तल यांनी शार्क टँकच्या माध्यमातून heart up my sleeves, coslq, revamp moto, skipi pops, vivalyf innovations- easy life, meatyour, arrcoat surface textures, loka, Annie, cara green, the yarn bazar, cocofit, bamboo india, let’s try, find your kicks india आणि in a can अशा कंपणींमध्ये गुंतवणूक केलेली आहे.

3) विनिता सिंह

शार्क विनिता सिंह या शुगर कॉस्मेटिक्सची सीईओ आणि को फाउंडर आहे. सोबतच या इकॉनॉमिक टाइम्स आणि फॉरचूनच्या 40 अंडर 40मध्येही नामांकित स्थानी विराजमान आहे. शार्क टँकच्या माध्यमातून विनिता यांनी आजवर blue pine industries, booz scooters, heart up my sleeves, NOCD, Coslq आणि skippi pops मध्ये इन्व्हेस्ट केलेलं आहे.

4) नमिता थापर

शार्क नमिता थापर एक ग्लोबल फार्मा कंपनी emcure pharmaceutical च्या executive director आहेत. थापर या भारतातील महिला आरोग्य आणि सोयीसुविधा बाबतीत जागरूक असतात. कोविड काळात नमिता थापर यांनी uncondition yourself with namita thapar नावाचा talk शो चालवला होता. शार्क टँकमध्ये नमिता यांनी आजवर bummer ,skippi pops, menstrupedia, altor, NUutjob, darda, mauli lifestyle, Annie, the renal project, cocofit, beyond water, find your kicks india, Aas vidyalaya, weStocks आणि In a can मध्ये इन्व्हेस्ट केलेलं आहे.

5) अमन गुप्ता

या लिस्टमध्ये पाचवे शार्क आहे अमन गुप्ता हे boat चे को फाउंडर आणि CMO आहेत. Boat चे हेडफोन आणि इअरफोन हे आजही भारतीय लोकांच्या पसंतीस टॉपला आहे. शार्क टँकमध्ये इन्व्हेस्टमेंटचं बोलायला गेलं तर blue pine industries, peeschute, Bummer, revamp moto,skippi pops, raising superstars, beyond snack, altor, ariro, nuutjob,meatyour, eventbeep, farda, loka, the yarn bazar, the renal project, hammer lifestyle, cocofit,beyond water, let’s try find your kicks india, westocks, आणि IN a can मध्ये इन्व्हेस्ट केलेलं आहे.

6) पियुष बंसल

पियुष बंसल हे लेनस्कार्ट डॉट कॉमचे फाऊंडर आणि सीईओ आहेत. सप्टेंबर 2019 पर्यंत लेनस्कार्टचे भारतभर 70 पेक्षा जास्त शहरात दुकानं होती. दिल्लीमध्ये यांची मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी दर महिन्याला जवळपास 3 लाख ग्लास बनवते. पियुष बंसल यांनी शार्क टॅंकच्या माध्यमातून vivalyf innovations – easy life, ariro, road bounce, the state plate, beyond water, find your kicks india, Aas vidyalaya, weStocks, PNT आणि In a can मध्ये इन्व्हेस्ट केलेलं आहे.

7) गजल अलघ

शेवटचा शार्क म्हणून ओळखले जातात ते म्हणजे गजल अलघ mamaearth च्या फाउंडर आणि चीफ इंनोव्हेशन ऑफिसर आहे. Mamaearth हा पहिला भारतीय ब्युटी ब्रँड आहे जो आपल्या उत्पादनात toxic chemicals मिसळत नाही. पण गजल अजून शार्क टॅंक मध्ये पूर्णपणे उतरलेले नाही.

तर हे आहेत शार्क टॅंक इंडियाचे तगडे शिलेदार.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.