नेमकं कशासाठी, शरद जोशींनी देशातील एकमेव सीतेच्या मंदिराच्या जिर्णोद्वाराची जबाबदारी घेतली होती.

मंदिर वहीं बनाऐंगे चा नारा भारतीय जनता पक्षाने आपल्या २०१४ च्या जाहिरनाम्यात देखील दिला होता. रामाचं मंदिर बांधणं सध्याचा सर्वात मोठ्ठा राजकिय प्रश्न असावा. असो, पण तुम्हाला माहित आहे का भारतात सीतेचं देखील मंदिर आहे. तस रामाच्या मंदिरात सीता असतेच की, पण या ठिकाणची सीता रामाबरोबर नाही. हनुमान आहे पण तो दूरवर हाय पाय बांधून आडव्या पडलेल्या अवस्थेत. मंदिरात आहे ती फक्त सीता आणि तिची दोन मुलं लव आणि कुश.

ही कथा रामायणानंतरची..

अमरावती जिल्ह्यातल्या रावेरी ता. राळेगाव जि. अमरावती येथे सीतेचं मंदीर आहे. याबाबत गावकरी सांगतात की, “गरोदर असणाऱ्या सीतेला रामाने वनामध्ये सोडून दिेलं. त्यानंतर सीता वाल्मिकी आश्रमात राहू लागली. रामायणाच्या काळात उल्लेख करण्यात आलेलं वाल्मिक आश्रम हे सध्याच्या रावेरी गावात होतं. सीताने याचठिकाणी लव आणि कुशास जन्म दिला. त्यानंतर तिने गावकऱ्यांना गहू मागितले मात्र कोणीही गहू देण्यास तयार झालं नाही. सीतेनं गावकऱ्यांना शाप दिला की या गावात कधीच गहू पिकणार नाही. पुढे रामाने अश्वमेध योजला. अश्वमेधाचा घोडा अडवण्याचं काम देखील लव आणि कुशाने याच गावात केलं. त्यासाठी त्यांनी हनुमानाला देखील बांधून ठेवलं. लंकापार करणारा महाबली हनूमानची मुर्ती याठिकाणी हातपाय बांधलेल्या अवस्थेत आडवी आहे हे विशेष.”

रावेरी गावात असणाऱ्या या सीतेच्या मंदीराबद्दल अनेक वेगवेगळ्या आख्यायिका सांगितला जातात. सीतेच्या मंदीराची देखील राममंदिराच्या दिवशीच भरते. सहनशील असणारी सीता गहू दिला नाही म्हणून गावकऱ्यांना शाप देते हे देखील अनेकांना पटत नाही पण कथा काहीही असो फक्त सीतेच असणार हे मंदिर अनेकांच्या मते भारतातलं एकमेव मंदिर आहे हे नक्की.

 

२०१० साली देखील देशभर राममंदीराचा घोष चालू होता. याकाळात या सीतेच्या मंदिराची मात्र पुर्णपणे दुरावस्था झाली होती.  विदेहाचा जनककुलोत्पन्न राजा सीरध्वज जनक यास जमीन नांगरताना सीता मिळाली होती अशी आख्यायिका सांगितली जाते. याचं भान ठेवूनच शेतकरी नेते शरद जोशी सीतेच्या मंदिराच्या जिर्णाद्वारासाठी पुढे आले.  त्यांनी खासदार निधी व आपल्या व्यक्तीगत खर्चातून मंदिराचा जिर्णोद्वार पुर्ण केला.

2 Comments
  1. ATUL S. MANDAVGANE says

    DISTRICT YAVATMAL AAHE

Leave A Reply

Your email address will not be published.