नक्की खरा फोटो कोणता…? 

अन्वय नाईक यांच्या आत्महत्येसंदर्भात काल अर्णब गोस्वामी यांनी पोलीसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. भारतीय जनता पक्षाने ही तर आणिबाणी म्हणतं शिवसेनेला लक्ष केलं. 

दोन वर्षांपूर्वीची केस रिओपन करण्यामागचे कारण काय असा प्रश्न भाजपचे लोक विचारू लागले तर आत्महत्येच्या प्रकरणात अर्णबला अटक होत असेल तर यामागे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा येतोच कुठे हा प्रश्न देखील विचारण्यात येऊ लागला. 

दोन्ही बाजूने हे वाद विवाद घडत असतानाच, सोशल मिडीयावर मात्र अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक व अन्वय नाईक यांची मुलगी आज्ञा नाईक यांचे शरद पवारांसोबतचे फोटो व्हायरल करण्यात आले. 

नेमके हे फोटो खरे का खोटे हा प्रश्न देखील विचारण्यात आला. 

भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून तसेच अर्णब गोस्वामीला पाठींबा देणाऱ्यांकडून हा फोटो व्हायरल करण्यात आला. यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता व मुलगी आज्ञा दिसत आहेत. 

Screenshot 2020 11 05 at 3.44.33 PM

या फोटोस प्रत्युउत्तर म्हणून दूसरा फोटो देखील सोशल मिडीयावर पोस्ट करण्यात आला. 

Screenshot 2020 11 05 at 3.52.29 PM

आत्ता हे दोन्ही फोटो पाहिल्यानंतर, भिडू लोकांच्या चक्कीत जाळ होवू लागला व ते आम्हाला विचारू लागले नेमका खरा फोटो कोणता.. 

तर अक्षता नाईक व आज्ञा नाईक गेल्या दोन वर्षांपासून आपल्या केसचा पाठपुरावा करण्यासाठी विविध व्यक्तींच्या भेट घेत आहेत. याच भेटीत त्या शरद पवारांना भेटल्याचं मुलगी आज्ञा नाईक यांची फेसबुक प्रोफाईल पाहील्यानंतर लक्षात येत. 

३ मे २०१९ रोजी आज्ञा नाईक यांनी  स्वत:च्या फेसबुक प्रोफाईलवरून शेअर केलेला फोटो,

WhatsApp Image 2020 11 05 at 3.39.49 PM 1

मुलगी आज्ञा नाईक यांच्या फेसबुकवर २०१९ च्या मे-जून महिन्यादरम्यान हे फोटो पोस्ट करण्यात आलेले आहेत. 

आज्ञा नाईक यांच्या फेसबुक प्रोफाईलवरून दिनांक ५ मे २०१९ रोजी हा फोटो शेअर करण्यात आला, हाच फोटो सध्या व्हायरल होत आहे.

WhatsApp Image 2020 11 05 at 3.39.49 PM

दिनांक २४ मे २०१९ रोजी आज्ञा नाईक यांच्या फेसबुक प्रोफाईलवरून खालील फोटो शेअर करण्यात आला होता.

WhatsApp Image 2020 11 05 at 3.39.48 PM

 

तर अखेरचा फोटो दिनांक ८ जून २०१९ रोजी शेअर करण्यात आला तो फोटो,

WhatsApp Image 2020 11 05 at 3.39.47 PM

 

आज्ञा नाईक यांच्या फेसबुक प्रोफाईलची पोस्ट खालीलप्रमाणे.

मात्र महत्वाचा व लक्षात घेण्यासारखा मुद्दा म्हणजे अक्षता नाईक व आज्ञा नाईक यांनी आपली केस कशाप्रकारे दाबण्यात येत आहे व केस रिओपन करावी म्हणून वारंवार पाठपुरावा केल्याच्या गोष्टी बातम्यांमध्ये प्रकाशित करण्यात आल्या होत्या.

आज्ञा नाईक व अक्षता नाईक यांनी शरद पवारांची भेट देखील याच विषयावर घेतलेली. ही भेट काही गुप्ततेचा विषय नव्हता. आम्हाला न्याय मिळावा म्हणून हे कुटूंब सातत्याने वेगवेगळ्या नेत्यांच्या भेटी घेवून पाठपुरावा करत होते. 

 

Leave A Reply

Your email address will not be published.