दिलीप कुमार आणि सायराबानोच्या प्रकरणात मध्यस्थी करणारे शरद पवार !

शरद पवार, बाळासाहेब ठाकरे अशी नावे आली की सोबत किस्से येतात. बऱ्याचदा हे किस्से राजकारणाचे असतात. पण काही निवडक किस्से असे असतात की आपल्याला शॉक बसतो. अरे इथेही. हिच दोन नावे. किस्सा वाचतो आणि म्हणतो चालायच…!
तर असाच एक किस्सा शरद पवार, दिलीप कुमार आणि सायराबानोचा.
दिलीप कुमार आणि शरद पवार हे चांगले दोस्त. बॅरिस्टर रजनी पटेल यांच्यामुळे शरद पवार आणि दिलीप कुमार यांची मैत्री झाली. बर हि मैत्री फक्त मैत्रीपुरती मर्यादित न राहता तिन्ही कुटूंब जवळ आली. दोघांपुरती असणारी मैत्री कुटूंबाची झाली. या मैत्रीत बॅरिस्टर रजनी पटेल या प्रमुख धागा होत्या. देशात, परदेशात सुट्या घालवायला शरद पवार यांच कुटूंब दिलीप कुमार यांच्या कुटूंबासोबत जावू लागलं तर दिलीप कुमार देखील शरद पवारांचा पाहूणचार घेण्यासाठी येवू लागले.
दिलीप कुमार तेव्हा साठीमध्ये होते. तेव्हा अचानक बातम्या आली की दिलीप कुमार याने अस्मा नावाच्या एका महिलेसोबत निकाह केला आहे. अस्मा हैद्राबादमध्ये रहायची. ति घटस्फोटीत होती. दिलीप कुमार यांना मुल होत नसल्याने त्यांनी निकाह केल्याची चर्चा होवू लागली.
तसा हा प्रश्न दिलीप कुमार यांचा खाजगी प्रश्न होता. दिलीप कुमार मुस्लीम असल्याने त्यांनी दूसरा निकाह करणं देखील कायदेशीरदृष्ट्या चुकिच अस काहीचं नव्हतं. पण वर्तमानपत्र आणि मासिकांमधून हा विषय जोरात चर्चा झडू लागल्या. दिलीप कुमारांनी हे प्रकरण सुरवातीला एका राजकिय नेत्यासारखं नाकारलं पण इंडियन एक्सप्रेसने त्यांनी ज्या मशिदीमध्ये निकाह लावला होता तिथला निकाहनाम्याची मुळ प्रतच ती आपल्या वर्तमानपत्रात छापली.
या प्रकरणात सायराबानो आणि दिलीप कुमार यांचे संबध विकोपाला गेले. आत्ता या नाजूक प्रकरणात शरद पवार आणि बॅरिस्टर रजनी पटेल यांनी मधस्थी केली. प्रकरण सुरळीत झालं आणि शरद पवार आणि दिलीप कुमार यांची मैत्री अजूनच घट्ट झाली…
मग अस अचानक काय झालं की ती मैत्री पुर्वीसारखी राहिली नाही..
या घटनेच कारण शरद पवार आपल्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्रात नमुद करतात.
ते म्हणतात,
“मुंबई बॉम्बस्फोटात संजय दत्त याच्याविषयी थोडंस सबुरीचं धोरण स्वीकारावं, अशी विनंती करण्यासाठी सुनिल दत्त सोबत दिलीप कुमार आले होते. संजय दत्त विरोधात पुरावा एवढा ठोस होता की मी कोणताही हस्तक्षेप करण्यास नकार दिला. आज आमच्या घरच्यांच एकमेकांकडे जाणं होतं पण आमच्या दोघांच्या मैत्रीत मात्र अंतर आलं आहे.”
हे ही वाचा.