६ महिन्यांची मुदत देणाऱ्या डॉक्टरांना पवार म्हणाले, अजून पन्नास वर्ष तरी मला काही होणार नाही.. 

दिल्लीच्या अपोलो हॉस्पीटलमध्ये शरद पवारांवर केमोथेरेपी चालू होती. या काळात पवारांच्या तोंडातून सर्व दात काठून टाकण्यात आले होते. छोट्या सुईने तोंडाच्या आतला भाग जाळला जायचा. त्याच्यामुळे शरद पवारांचे ओठ आणि जीभ भाजून गेली होती. पाणी प्यायचं असेल तरी भूल देवूनच पाणी प्यायला लागायचं. तोंडातून रक्त पडायचं..

अशा अवस्थेत एक ३० वर्षाचा डॉक्टर शरद पवारांच्या जवळ आला. त्यांना म्हणाला खूप कमी दिवस राहिलेत. तुमचं काही कामे असतील तर संपवून घ्या. कुटूंबाला वेळ द्या…. 

शरद पवारांनी त्या डॉक्टरला त्याचं वय विचारलं. शरद पवार त्याच्याकडे डोळे रोखून म्हणाले, 

तुझं वय ६०-७० होईपर्यन्त मला काही होणार नाही. 

दोन दिवासंपूर्वी पित्ताशयाचा त्रास होवू लागल्यानंतर शरद पवारांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. काल त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याची माहिती देण्यात आली. अशा वातावरणात शरद पवारांच्या तब्येतीबाबत अनेकजण वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होवू लागले. अशातच आज सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांचा फोटो फेसबुकवर शेअर केला. 

https://www.facebook.com/supriyasule/posts/4088774674487832

या फोटोवर अनेकांनी लढण्याची प्रेरणा अशा आशयाच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. शरद पवार अनेक संकटांवर मात करुन कशा प्रकारे उभा राहिले त्याचे किस्से सांगण्यात येवू लागले.

अशातलाच एक प्रसंग म्हणजे शरद पवार कॅन्सरसारख्या मृत्यूच्या दाढेतून परत आल्याचा प्रसंग. 

२००४ सालच्या लोकसभा निवडणूकांसाठी शरद पवारांनी अर्ज दाखल केला होता. प्रचाराचा मौसम होता. दरम्यानच्या काळात शरद पवारांचे मित्र डॉ. रवी बापट देखील त्यांच्यासोबत असत. शरद पवारांच्या गालात आतल्या बाजूने एक गाठ आलेली होती. पवारांनी डॉ. बापटांना ही गोष्ट सांगितली. तेव्हा बापटांनी तात्काळ ब्रीच कॅंडीतून बायोप्सी करुन घेण्याचा सल्ला दिला. 

निवडणूका तोंडावर होत्या. शरद पवारांनी बायोप्सी केली. डॉ. शरदिनी डहाणूकर व बापट यांनी रिपोर्ट आल्यानंतर कॅन्सरची खात्री पटली. 

तात्काळ बापट यांचा सल्ला घेवून उपचार करण्यासाठी पवारांनी प्रधान डॉक्टरांची भेट पक्की केली. रिपोर्ट पाहून प्रधान डॉक्टरांनी त्यांना ॲडमीट होण्याचा सल्ला दिला. 

ऑपरेशन करण्यात आला. डाव्या गालाचा संपूर्ण भाग काढून तिथे मांडीची त्वचा लावण्यात आली. जबडा मिटता देखील येत नव्हता. या काळात टेनिस बॉलच्या आकाराचा एका गोळा जबड्यात ठेवण्यात आला. 

रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर पवारांनी त्याही अवस्थेत प्रचार दौऱ्यात भाग घेतला. बोलता येत नव्हतं. तोंडातून रक्त यायचं. तरिही पवार प्रचार करत असत. 

प्रचार संपला आणि पवार पुढच्या उपचारांच्या मागे लागले. दिल्लीतील अपोलो हॉस्पीटलमध्ये त्यांची केमोथेरपी सुरू करण्यात आली. या काळात प्रचंड वेदना होत असत. तोंडातून रक्त येईल. पवार म्हणतात या काळात या काळात प्रचंड वेदना होत. त्यावर उपाय म्हणून मी कामात लक्ष गुंतवलं.. 

पुढचे उपचार न्यूयॉर्क मधील स्लोन केटरिंग रुग्णालयात झाले. मुळचे मिरजेचे असणारे मेहता डॉक्टर यांनी त्यांच्यावर उपचार केले. 

पवार या आठवणींबद्दल सांगताना म्हणतात, सुरवातीच्या काळात त्यांनी मला तीन महिन्यांनी यायचा सल्ला दिला. नंतर तो सहा महिने झाला, त्यानंतर वर्षातून एकदा व नंतर कधीच येण्याची आवश्यकता नसल्याचं सांगितलं.,.

पवार म्हणतात, 

कर्करोगाचं निदान झाल्यानंतर माझी पहिली प्रतिक्रिया होती ती म्हणजे आपण दोन हात करायचे आणि जिंकायचं…

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.