शरद पवारांना विधानसभेतून बाहेर काढण्यात आलं !

शरद पवार. गेली ५० वर्ष राजकारणात नेहमीच विजयी पहात आलेले माणूस. साहजिक शरद पवारांच्या बाबतीत अशी कोणती घटना घडली असेल हे पचवण जड जाईल. पण थोडीच हा किस्सा आत्ताचा आहे. हा किस्सा तेव्हाचा जेव्हा शरद पवार हे नाव महाराष्ट्राच्या मातीला माहित व्हायचं होतं. तेव्हा शरद पवार कॉलेजच्या राजकाणात गाजत होते. पुढं राजकारणातच काहीतरी करु अस आजच्याच तरुणासारखं स्वप्न पहात होते. 

1958 साली शरद पवार बारामतीहून पुण्याला आहे. कॉलेजवयात ते राजकारणाकडे ओढले गेले. त्यातूनच मुंबई कशी असते. मुंबईत काय काय आहे असा विचार सुरू झाला. शरद पवार आणि चार पाच वर्गमित्रांनी मुंबई फिरायचा प्लॅन केला. 

तेव्हा शरद पवार यांच्या वर्गात धनाजीराव जाधव होते. ते पुण्याच्या अगोदर मुंबईतच रहायला असल्याने त्यांना मुंबईची संपुर्ण माहिती होती. साहजिक मुंबईतच समुद्र,विमानतळ, ट्राम आणि विधानसभा पाहण्याच निश्चित करण्यात आलं. वर्गमित्र धनाजीराव जाधव यांचे वडिल हे शेकापचे मोठ्ठे नेते असल्याने विधानभवनाच्या प्रेक्षक गॅलरीचा पास काढणं देखील त्यांना अवघड गेलं नाही. 

IMG 20181104 135623
पुण्याच्या बीएसीसी कॉलेजमधील शरद पवार यांचे मित्र बी.एम.वाणी (धुळे),हुकुमचंद डागळे (बार्शी), आणि जी. आर.शिंदे (मनमाड)

शरद पवार या आठवणीबद्दल महाराष्ट्र विधानमंडळच्या स्मृतिगंधच्या लेखात सांगतात, 

“आम्ही प्रेक्षक गॅलेरीत गेलो. सभागृहात मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण, विरोधी पक्षाच्या बाजूला एस.एम.जोशी, आचार्य अत्रे आदी मान्यवर पहायला मिळाली. महत्वाच्या विषयावर चर्चा असल्याने माझं सर्व लक्ष चर्चेकडे होतं.सहजच मी एक पाय दुसऱ्या पायावर टाकून चर्चा ऐकू लागला. ते पाहून तोच प्रेक्षक गॅलेरीतील विधीमंडळाचा कर्मचारी माझ्याकडे आला व त्याने मला सांगितले की, पायावर पाय ठेवून बसण्यास परवानगी नाही.”

शरद पवार दोन्ही पाय सरळ करुन बसले. पण चर्चा ऐकताना पुन्हा त्यांनी पायांवर पाय ठेवला. पुन्हा त्या विधानमंडळाच्या कर्मचाऱ्याने ते पाहिले व शरद पवारांना दरडावले की, तुम्हाला एकदा सांगितले तरी तुम्ही खबरदारी घेत नाही सबब तुम्ही प्रेक्षक गॅलरीच्या बाहेर जा ! 

शरद पवारांनी त्यांना माफी मागितली पण त्याने प्रेक्षक गॅलेरीतून बाहेर जाण्यास सांगितले. 

शरद पवार प्रेक्षक गॅलेरीतून उठले व जाता जाता त्याला म्हणाले,

“आत्ता पुन्हा विधानसभेत येईल ते प्रेक्षक गॅलेरीत बसण्यासाठी नाही तर सभागृहात बसण्यासाठीच.” 

तसा तो कर्मचारी शरद पवारांच्याकडे पाहून हसला व म्हणाला,

“सभागृहात बसण्यासाठी आल तर आपण कसे बसावे, काय बोलावे यावर माझा अधिकार नाही, पण आपण आपला शब्द पुरा केला त्यावेळेस सेवेत असलो तर आपणास सलाम करेन व सभागृहाचा रस्ता दाखवेन.”

हे ही वाचा – 

Leave A Reply

Your email address will not be published.